Author: दीपक मोहिते

नदीम शेख,पालघर, जनतेच्या कामाना सर्वोच्च प्राधान्य द्या – पालक सचिव डॉ.सोनिया सेठी, शासकीय कार्यालयामध्ये येणाऱ्या नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या लवकरात लवकर निकाली काढाव्यात.शासकीय अधिकार आणि कर्मचारी यांनी जनतेच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश पालक सचिव तथा अप्पर मुख्य सचिव ( मदत व पुनर्वसन ) डॉ.सोनिया सेठी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे १०० दिवस कृती आराखड्यासंदर्भात श्रीमती डॉ.सेठी यांनी आढावा बैठक घेतली.बैठकीला जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे,निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे,उपजिल्हाधिकारी विजया जाधव,महेश सागर , तुषार माळी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आढावा घेतल्यानंतर पालक सचिव श्रीमती डॉ.सेठी…

Read More

मनिष धानू,डहाणू, डहाणू – सायवन येथे महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत सायवन येथे महिला मेळावा उत्साहात पार पडला. जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी,डहाणू पंचायत समिती सभापती प्रविण गवळी पंचायत समिती सदस्य पिंटी बोरसा,रायपूर सरपंच प्रकाश जाधव, सायवन प्रा.आ.केंद्राचे डॉ. राठोड,उपसरपंच विलास गिंभल तसेच ग्रामपंचायत सदस्य व विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधींच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला. यावेळी महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच आरोग्य व बालविकास विषयक मार्गदर्शन करण्यात आले.महिलांना विविध योजनांची माहिती देऊन त्यांना स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. बालविवाहाचे दुष्परिणाम व कमी वयात लग्न न करण्याचे महत्त्व अंगणवाडी सेविकांनी पथनाट्याद्वारे प्रभावीपणे सादर केले.महिलांच्या आरोग्यासंबंधी जागृतीसाठी प्राथमिक आरोग्य…

Read More

नवीन पाटील,सफाळे, आजी व आजोबा हेच जीवनाचे खरे मार्गदर्शक – जॉन रोझारीयो, निःस्वार्थ प्रेम आणि अमर्याद मायेचा ओढा असणार नातं म्हणजे ” नातवंड व आजी-आजोबांचं,” नातं असतं.वयाने मोठे अनुभवसंपन्न असणारे आजी-आजोबा हेच आपल्या जीवनाचे खरे मार्गदर्शक असतात,असे भावनात्मक उद्गार तारापूर विद्या मंदिर,बोईसर शाळेच्या प्राचार्य जॉन रोझारीओ यांनी काढले. ” सांस्कृतिक व रचनात्मक,” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते पालक आपल्यावर रागावतात,शिक्षा करतात वेळ प्रसंगी मार ही देतात,परंतु आपले लाड,हट्ट पुरवणारे, कौतुक करणारे आजी आजोबाचं असतात,असे ते पुढे म्हणाले,हे नातं म्हणजे आनंदाचा खजिना असून उतारवयात आपण त्यांचं आरोग्य जपलं पाहिजे. आपल्या व्यस्त दिनचर्येमधून काही वेळ त्यांच्यासाठी दिला…

Read More

दीपक मोहिते, नालासोपारा येथे उर्वरित ३६ अनधिकृत इमारतीवरील तोडक कारवाई सुरु, नालासोपारा पूर्वेस आरक्षित असलेल्या शासकीय जमिनीवर बांधण्यात आलेल्या ३६ अनधिकृत इमारतीवर तोडक कारवाई सुरू झाली आहे.विधानसभा निवडणुकीपूर्वी ५ इमारती वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने जमिनदोस्त केल्या होत्या.पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर महानगरपालिकेच्या कारवाईला स्थगिती देण्यात आली.आजपासून उर्वरित ३६ इमारतीवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या विविध विकाकामासाठी आरक्षित असलेल्या जमिनीवर समाजकंटकांनी थेट ४१ अनधिकृत इमारती बांधल्या व त्यामधील सदनिका गोरगरीब कुटुंबाना विकल्या.या जमिनीचा मूळ मालक व महानगरपालिका या दोघांमध्ये वाद होता,त्यामुळे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते.मात्र जमिनीवर मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकामे झाल्याचे लक्षात आल्यानंतर न्यायालयाने…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” दावोस दौरा : तुमच्या – आमच्या पैश्यावर राज्यकर्त्यांचे पर्यटन, गेल्या काही वर्षात जगभरातील बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या राज्यात गुंतवणूक करावी,आपले प्रकल्प सुरू करावेत,यासाठी स्वित्झर्लंड या निसर्गरम्य देशातील दावोस येथे जाण्याचे सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्री व उद्योगमंत्री याना सध्या वेडं लागले आहे.त्यांच्या या प्रत्येक दौऱ्यात ४० ते ५० लाख कोटींची गुंतवणुक होणार असल्याचे हे नेते बेंबीच्या देठापासून कोकलत असतात.पण प्रत्यक्षात गेल्या १५ वर्षात किती गुंतवणूक आली,किती उद्योगधंदे सुरू झाले व किती रोजगार निर्मिती झाली ? हा एक संशोधनाचा विषय ठरू शकतो. आपल्या कार्यकाळात परकीय गुंतवणूक आली,हे दाखवण्यासाठी आपले राज्याचे मुख्यमंत्री व उद्योगमंत्री दरवर्षी तुमच्या आमच्या पैशाने दावोस या नावाजलेल्या…

Read More

सचिन परब,विरार व.पं.समितीच्या कृषी व पशुसंवर्धन विभागातर्फे शेतकऱ्यांना प्रशिक्षण, वसई तालुक्यातील शेतकरी व पशुपालकांना शेतीनिष्ठ व शेतीपूरक व्यवसायात अधिकची माहिती व्हावी,म्हणून वसई पंचायत समितीच्या कृषी आणि पशु विभागातर्फे विरार पूर्व भागातील पारोळ येथे दोन दिवसीय शेतकरी मेळावा व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, आज मेळाव्याचा दुसरा दिवस आहॆ.या उपक्रमामध्ये शेतकऱ्यांना व पशुपालकांना आधुनिक शेती पद्धत व पाळीव जनावरांचे आधुनिक यशस्वी संगोपन,पिकांवर कोणते प्रक्रिया उद्योग करता येतात,दूध उत्पादनात वाढीसाठी प्रयत्न,दुग्धजन्य पदार्थ व त्यापासून इतर पदार्थ प्रक्रिया,तसेच शेती पूरक व्यवसाय,कुक्कुटपालन , शेळीपालन याविषयी शेतकऱ्यांना परिपूर्ण माहिती देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहॆ.यावेळी विषमुक्त सेंद्रिय शेतीने समाजाचे हित कसा साधू शकतो,याबाबत…

Read More

दीपक मोहिते, समान नागरी कायदा ; उत्तराखंड पहिले राज्य, देशभरात समान नागरी कायदा लागू करण्याच्या दिशेने उत्तराखंड राज्यसरकारने पहिले पाऊल टाकले आहे.उत्तराखंड राज्याच्या भाजप सरकारने सदर कायदा लागू करण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे.नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या कायद्यातील नियमांना मंजुरी देण्यात आली आहे.त्यामुळे उत्तराखंड सरकार येत्या २६ जाने. पर्यंत राज्यात या कायद्याची अंमलबजावणी सुरू करेल,अशी शक्यता आहे.राज्याचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी तसे संकेत दिले आहेत. राज्यमंत्रीमंडळाने कायद्यातील ज्या नियमांना मंजुरी दिली आहे,त्यामध्ये सर्व जाती-धर्मातील नागरिकांची विवाह नोंदणी,घटस्फोट,वारसा हक्क,लिव्ह अँड रिलेशनशिप आदी नोंदणीविषयक बाबींचा समावेश आहे.हा कायदा राज्यात राहणाऱ्या सर्व नागरिकांना लागू होणार आहे.तसेच राज्यातील सर्व जाती-धर्मातील व्यक्तींना या कायद्यातील…

Read More

जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे जेएसडब्ल्यू फाऊंडेशनच्या सहकार्याने आरोग्य शिबिराचे आयोजन, जेएसडब्ल्यू फाऊंडेशनचे सहकार्य आणि भक्ती वेदांत हॉस्पिटल,मिरा रोड येथील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जव्हार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आणि शासकीय आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. सदर शिबिराच्या आयोजनासाठी जिल्हा परिषद पालघर येथील जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष चौधरी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी,भक्ती वेदांत हॉस्पिटलचे डॉ.निखील राऊत,जेएसडब्ल्यू फाऊंडेशनचे आरोग्य व पोषण विभाग प्रमुख डॉ.आशिष जैन, असिस्टंट जनरल मॅनेजर डॉ. आलोक कुमार,तसेच जिंदाल स्टील कोटेड प्रॉडक्ट्स लिमिटेड तारापूरचे प्लांट हेड अजय खंडेलवाल यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. जेएसडब्ल्यू फाऊंडेशन गेल्या ९ वर्षांपासून जव्हार व पालघर परिसरात आरोग्य शिबिरे…

Read More

जव्हार प्रतिनिधी, ग्रामसंवाद सरपंच संघाच्या पालघर जिल्हाध्यक्षपदी निलेश भोये यांची निवड, ग्रामसंवाद सरपंच संघाच्या पालघर जिल्हा अध्यक्षपदी जुनी जव्हार ग्रामपंचायतीचे युवा सरपंच निलेश भोये यांची निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती संघाचे प्रदेशाध्यक्ष अजिनाथ धामणे यांच्या हस्ते करण्यात आली.ग्रामसंवाद सरपंच संघ हे राज्यातील ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेले एक प्रभावी संघटन आहे. सरपंच,उपसरपंच व सदस्यांना त्यांच्या अधिकार व कर्तव्यांची जाणीव करून देत शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी गावपातळीवर प्रभावीपणे करण्याचा संघाचा मुख्य उद्देश आहे.नवनियुक्त पालघर जिल्हाध्यक्ष निलेश भोये,हे आदिवासी आणि दुर्गम भाग असलेल्या जव्हार तालुक्यातील जुनी जव्हार ग्रामपंचायतीचे सरपंच असून त्यांनी आतापर्यंत आपल्या कार्यक्षेत्रात अनेक लोकाभिमुख कामे केली आहेत.शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी…

Read More

सुरेश काटे,तलासरी, तलासरीच्या कुर्झे धरणक्षेत्रात दुर्मिळ पक्षांचे वास्तव्य, पालघर जिल्ह्याला सध्या पक्षांचे वैभव लाभले आहे. समुद्र किनारा,खाडीपट्टा खारफुटीचा प्रवेश,मिठागरे, भातशेती,शहरी भाग,आर्द्र व मिश्र पानगळीचे जंगल येथे विविध पक्षी आले आहेत. त्यामुळे येथे पक्ष्यांची विविधता ही मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. दरवषी थंडी पडू लागली की येथे मोठ्या प्रमाणात परदेशातील पाहुणे स्थलांतर करून या भागात येतात.सध्या तलासरी तालुक्यातील कुर्झे धरण परिसरात पाहुण्या पक्ष्यांची वर्दळ वाढली आहे.विहार करणाऱ्या रंगीबेरंगी विविध जातीच्या आकर्षक पक्ष्यांच्या मनमोहक हालचाली पाहण्यासाठी परिसरात पक्षीप्रेमी येत आहेत.कुर्झे धरण परिसरात हिवाळी हंगामात विविध स्थलांतरीत पक्षांची गर्दी वाढते,त्यामध्ये जलचर पक्षांची संख्या अधिक असते.हिवाळ्याचा हंगाम अंतिम टप्यात आला असूनही पाहुणे पक्ष्यांचा मुकाम धरण…

Read More