शुभम सावंत,विरार
विरार येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा,
७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे आयोजित ध्वजारोहण समारोह कार्यक्रमात वसई विधानसभा मतदारसंघाच्या आ.स्नेहा दुबे पंडित या सहभागी झाल्या होत्या.या कार्यक्रमात वसई विरार महानगरपालिका आयुक्त अनिल पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी विधानसभा मतदारसंघाचे आ.राजन नाईक वसई विरार महानगरपालिका आयुक्त अनिल पवार व इतर विविध विभागाचे शासकीय अधिकारी, कर्मचारी,पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून माहिती अधिकार अर्ज स्विकृती विभाग,दिव्यांग कल्याण विभाग,आवक जावक टपाल विभाग,या विभागांचे उदघाटन करण्यात आले.या विभागामुळे नागरिकांना सुलभ सेवा मिळणार आहेत.आजचा हा कार्यक्रम देशाची अस्मिता आणि एकतेचे प्रतीक ठरला आहॆ.देशाचे स्वातंत्र्य,अखंडता आणि सार्वभौमता,यासाठी एकजूट होऊन,आपल्या देशाची सर्वतोपरी सेवा करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

