- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मी ज्या नालासोपारा मतदारसंघातून येतो…
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, बॉटम लाईन, नॅशनल डेस्क युद्धविराम ; जगाचा जीव भांड्यात पडला… इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध अखेर काल रात्री थांबलं व जगाने या निर्णयामुळे मनापासून आनंद व्यक्त केला आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशानी सामंजस्याची भूमिका स्विकारत युद्धाविराम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या ४० दिवसापासून सुरु असलेला संघर्ष अखेर काल रात्री थांबला. दोन्ही देशांमध्ये आता शस्त्रसंधी झाली आहे. दोन्ही देशांनी सैन्य कारवाया दोन आठवड्यांसाठी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री, सय्यद अब्बास अराघची, यांनी देखील एक्सवर ट्विट करुन सकारात्मक प्रतिसाद दिला दिला आहे. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा…
दीपक मोहिते, ” शिक्षणाच्या आयचा घो,” शिक्षक घरी येणार, विद्यार्थ्यांना ऍडमिशन करून देणार, सरकारचे डोके फिरलंय.. राज्याच्या शिक्षण विभागाचा गोंधळी कारभार, हा गेल्या काही वर्षापासून सुरु आहे. त्याचे वर्णन करायचे झाल्यास, ” तुघलकी कारभार, ” असंच करावे लागेल. राज्यातील शिक्षण व्यवस्थेची स्थिती लक्षात घेता शिक्षण विभागाचा कारभार कसा सुरु आहे, हे आपल्याला पावलोपावली अनुभवायला मिळत आहे. जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची खालावत चाललेली पटसंख्या, त्यामुळे बंद पडणाऱ्या शाळा, अपुरा शिक्षकवर्ग, शिक्षकांवर शिक्षणेतर कामाची सक्ती व शिक्षणाचा सुमार दर्जा, अशा अनेक ज्वलंत समस्या आ वासून उभ्या ठाकल्या असताना, आपले शिक्षण विभाग नको ते उपदव्याप करण्यात मग्न आहे. नव्याने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील स्थानिक…
दीपक मोहिते, पुरोगामी राज्य अशी ओळख असलेले राज्य आता वेगळ्या वळणावर, पुरोगामी महाराष्ट्राचा चेहरा आता पूर्णतः काळवंडला असून दररोज काहींना काही राजकीय घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांचा अपघाती मृत्यू, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील जीवघेणे राजकारण,भोंदूबाबा अशोक खरात याच्या उलाढाली, व त्याच्या नादी लागणारे मंत्री, महिला आयोगाच्या अध्यक्षाचा तडकाफडकी राजीनामा, त्यांच्या तीन मंत्र्यांची प्रकरणे, यामुळे फडणवीस यांच्या सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगली गेली आहेत. राज्याच्या राजकारणाचे किती अध:पतन होत आहे, हे आपल्याला पावलोपावली जाणवू लागले आहे. या सरकारच्या राज्यात भ्रष्टाचार इतका बोकाळला आहे की, ज्या मतदारांनी आपले विश्वस्त म्हणून ज्यांना निवडून दिले. तीच मंडळी सध्या लुटारू तसेच गुंडाच्या भूमिकेत वावरू लागले…
दीपक मोहिते, बॉटमलाईन, अखेर अमेरीका गुडघ्यावर आली, ट्रम्पवर अमेरिकन जनतेचा वाढता दबाव, अमेरिका – इराण या दोन देशा दरम्यान सुरु असलेल्या युद्धात तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, हे युद्ध लवकरात लवकर थांबले पाहिजे, अशा निष्कर्षाप्रत आले आहेत. त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेत सौम्यपणा आता सौम्यपणा आला आहे. त्यांच्यामध्ये अचानक असा आश्चर्यकारक बदल कसा झाला? यावर एक नजर टाकुया… अगदी दोन दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे तेलनिर्मिती प्रकल्प उध्वस्त करू धमकी देण्यास सुरुवात केली होती. मात्र इराणने त्यांच्या धमक्याना धूप न घालता हॉर्मुझ सामुद्रधुनी कायमची बंद करू तसेच ज्या आखाती देशात अमेरिकेचे लष्करीतळ आहेत, ते आम्ही बेचीराख करू,…
दीपक मोहिते, बॉटमलाईन नॅशनल डेस्क धोकादायक रेल्वेप्रवास ; कायमस्वरूपी तोडगा हवा, गेल्या काही वर्षात मुंबई ते थेट डहाणू परिसरात नागरीकरणाला प्रचंड वेग आला असून पालघर जिल्ह्याची लोकसंख्या हां हां म्हणता जवळपास ५० लाखाच्या घरात पोहोचली आहे. नागरीकरणाचा हा वेग लक्षात घेऊन राज्य सरकार, जिल्हा प्रशासन,स्थानिक स्वराज्य संस्था व रेल्वे मंत्रालय, यांनी संयुक्तपणे नियोजन करण्याची गरज होती.पण त्यादृष्टीने पावले उचलण्यात आली नाही.त्याचे परिणाम मात्र या परिसरातील जनतेला भोगावे लागले व अद्याप ते भोगत आहेत. या सर्वांच्या उदासीनतेमुळे जीवघेणा रेल्वे प्रवास,राष्ट्रीय महामार्ग व अंतर्गत रस्त्याची दुरावस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांचा नियोजनशून्य कारभार हा येथील नागरिकांच्या पाचवीला पुजला आहे. पालघर जिल्हा हा मुंबईच्या…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” सोनम वांगचूक यांची अटक ; केंद्र सरकार पडले तोंडघशी, लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांची तब्बल १७० दिवसाची नजरकैद आणि अटकेनंतर १४ मार्च २०२६ रोजी सुटका करण्यात आली आहे. केंद्र सरकारने त्यांच्यावर लावलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा रद्द केला असून, जोधपूर तुरुंगातून त्यांना मुक्त करण्यात आले आहे. लडाखला सहाव्या अनुसूची आणि राज्य दर्जा मिळावा, या मागणीसाठी झालेल्या आंदोलनानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. केंद्र सरकारने लडाखमध्ये शांतता, स्थिरता आणि परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत असले तरी न्यायालयात हे प्रकरण टिकणार नाही, याची जाणीव झाल्यामुळे सरकारला ही उपरती तब्बल…
दीपक मोहिते, ” न्यूजलाईन,” युद्ध थांबण्यात जगाचे हित आहे… सहा वर्षांपूर्वी आलेल्या कोविड – १९ या जीवघेण्या रोगाने संपूर्ण जगाचे होत्याचे नव्हते केले होते. त्या अस्मानी संकटाला जगाने यशस्वीपणे तोंड दिले.पण अवघ्या दोन वर्षांच्या काळात किमान ५ लाख लोक मृत्युमुखी पडले.हे संकट मानवनिर्मित होते की निसर्गनिर्मित हे आजही गुलदस्त्यातच आहे. सध्या जे संकट जगावर घोंगावू लागले आहे,ते मात्र मानवनिर्मितच आहे. अमेरिका – इस्त्रायल विरुद्ध इराण यांच्यामध्ये सुरू असलेले युद्ध, हे जगाला वेठीस धरू पाहत आहे. या युद्धामुळे जगभरात तेल व नैसर्गिक वायूची होऊ घातलेल्या टंचाईने जगातील सर्वच देशांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आखाती देशातून येणारे तेल व नैसर्गिक वायूची वाहतूक…
दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” घराणेशाही ; पण कुठवर ? ” घराणेशाही,” ला आपल्या समाजव्यवस्थेत पूर्वी बिलकुल स्थान नव्हते, पण हल्लीच्या काळात राजकीय नेत्यांना ही घराणेशाही हवीहवीशी वाटू लागली आहे. कालांतराने ही इ घराणेशाही घराण्यातील लोकांच्या उरावर बसू लागल्यामुळे अनेक घराणी दुभंगत गेली. ही घराणेशाही सत्ता,राजकीय पक्ष सहकार,इ. क्षेत्रातील प्रचलित व्यवस्था मोडीत काढते. तरीदेखील ती राजकीय मंडळींना ती हवीशी वाटते. आपल्या आप्तस्वकीयाना संधी देताना राजकीय पक्षाचे नेते सारे काही गुंडाळून ठेवतात व स्वतःचा स्वार्थ साधत असतात. घराणेशाही कशाला म्हणतात,हे जाणून घ्यायचे झाल्यास आपल्याला पवार कुटुंबाकडे बोट दाखवायला लागेल. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, सुनेत्रा पवार आणि आता पार्थ…
दिपक मोहिते, न्यूजलाईन, इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या नावाची घोषणा ; मोजतबा खामेनेई यांच्याकडे सत्ता, इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचा हवाई हल्ल्यात मृत्यू झाला आहे. त्यांच्यानंतर त्यांचे क्रमांक २ चे सुपुत्र मोजतबा खामेनेई यांची देशाचे नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ फेब्रु.रोजी तेहरानवर झालेल्या हवाई हल्ल्यात अली खामेनेई व यांच्या आठ ज्येष्ठ नेत्यांचा खात्मा झाला. त्यामुळे देशाचे नेतृत्व कोणाकडे सोपवण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अमेरिका व इस्त्रालय या दोघांनी युद्ध पुकारल्यामुळे नवीन नेतृत्वाची निवड तातडीने करण्याची गरज लक्षात घेऊन मोजताबा खामेनेई यांची निवड करण्यात आली. पण त्यांची ही निवड तात्पुरती स्वरूपाची आहे.…
दीपक मोहिते, न्यूजलाईन, युद्धामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार, अमेरिका व इस्त्रायल यानी दोन दिवसापासून इराणची राजधानी तेहरानवर प्रखर बॉम्बहल्ले चढवले, या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी, त्यांचे नातेवाईक व अनेक ज्येष्ठ मंत्री यांचा खात्मा झाला. इराण, अणू कार्यक्रम राबवत असल्यामुळे त्यांच्यावर अमेरिकेने इस्त्रायलच्या मदतीने हे हल्ले केले, असे भासवण्यात येत असले तरी त्यामध्ये बिलकुल तथ्य नाही. अमेरिकेचा आखाती देशात असलेल्या तेलसाठ्यावर आपला कब्जा राहावा,यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेची इराक, इराण, सिरिया, अफगाणिस्तान, येमेन या तेलसंपन्न राष्ट्रावर वक्रदृष्टी आहे. सौदी अरेबिया, कुवेत, अबुधाबी व दुबई या देशांनी अमेरिकेशी मिळते जुळते घेतल्यामुळे आजच्या घडीला हे सारे देश सुरक्षित आहेत. इराण…
