दिपक मोहिते,
न्यूजलाईन,
इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या नावाची घोषणा ; मोजतबा खामेनेई यांच्याकडे सत्ता,
इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचा हवाई हल्ल्यात मृत्यू झाला आहे. त्यांच्यानंतर त्यांचे क्रमांक २ चे सुपुत्र मोजतबा खामेनेई यांची देशाचे नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ फेब्रु.रोजी तेहरानवर झालेल्या हवाई हल्ल्यात अली खामेनेई व यांच्या आठ ज्येष्ठ नेत्यांचा खात्मा झाला. त्यामुळे देशाचे नेतृत्व कोणाकडे सोपवण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अमेरिका व इस्त्रालय या दोघांनी युद्ध पुकारल्यामुळे नवीन नेतृत्वाची निवड तातडीने करण्याची गरज लक्षात घेऊन मोजताबा खामेनेई यांची निवड करण्यात आली. पण त्यांची ही निवड तात्पुरती स्वरूपाची आहे. इराणच्या कायद्यात वारसा हक्काने सत्तेचे नेतृत्व मिळत नाही. त्यामुळे सध्याचे युद्ध संपले की नवीन चेहरा प्रमुखपदी असेल. इराण व इराक युद्धात त्यांनी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्पसचे सदस्य म्हणून महत्वपूर्ण कामगिरी बजावली होती. प्रगत धार्मिक शिक्षण घेतलेले ते धर्मगुरु आहेत. अलीकडच्या काळात त्यांना ” आयातुल्ला, ” ही पदवी देण्यात आली. बऱ्याच काळापासून इराणच्या सत्तेच्या वर्तुळात त्यांचा महत्वाची व्यक्ती म्हणून वावर आहे.
मोजतबा खामेनेई यांचा जन्म ८ सप्टेंबर १९६९ मध्ये मशहद शहरात झाला. त्यांचं शिक्षण धार्मिक वातावरणात झालं. इराण-इराक युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी रिव्होल्युशनरी गार्डमध्येही काम केलं होतं. ते दीर्घकाळापासून आपल्या वडिलांच्या अत्यंत जवळचे होते.
देशाच्या अनेक मोठ्या निर्णयांमध्ये त्यांची पडद्या आडून महत्त्वाची भूमिका असायची. त्यांनी कधीही कोणतंही मोठं सरकारी पद भूषवलं नसले तरी, ते आपल्या पित्याचे विश्वासू सल्लागार होते. लष्कर आणि निमलष्करी दलांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. या संबंधाचा वापर करत त्यांनी अनेक महत्वाच्या कारवाया केल्या. आक्रमक व धाडसी अशी त्यांची ओळख असून, त्यांना जर पुढे चाल मिळाली तर मध्य पूर्वेत कायम अशांतता राहील व अमेरिका, इस्त्रायल व इराण या तिघांमध्ये कधीच समझोता होणार नाही.
२००९ मध्ये झालेल्या निदर्शनांच्या वेळीही मोजतबा खामेनेई यांचं नाव चर्चेत आलं होतं. आंदोलने कठोरपणे दडपून टाकण्यात त्यांनी भूमिका बजावली होती.
१९७९ च्या क्रांतीच्या वेळी घराणेशाहीच्या आधारावर सत्ता देण्यास विरोध करण्यात आला होता. त्यामुळे काही लोक त्यांच्या निवडीवर आतापासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. सध्या लष्करी पाठबळामुळे मोजतबा खामेनेई यांना एक प्रबळ नेते मानले जात आहे.
पुढील सर्वोच्च नेत्यामध्ये राजकीय क्षमता, नैतिक अधिकार आणि इस्लामिक रिपब्लिकशी निष्ठा असणे अनिवार्य आहे. या शर्यतीत काही महत्त्वाची नावे चर्चेत आहेत.
ते सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा आहे.पडद्यामागून मोठी सूत्रे हलवणारा मोजताबा इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स आणि बसिज दलाचा अत्यंत जवळचा मानला जातो. मात्र, इराणमध्ये राजेशाहीला विरोध करून क्रांती झाली असल्यामुळे , पित्यानंतर मुलाकडे सत्ता जाणे ( घराणेशाही ) धर्मगुरुंना मान्य होणार नाही. तसेच ते उच्च श्रेणीतील धर्मगुरू नसल्यामुळे तांत्रिक अडचणीही येऊ शकतात.
खामेनींचे अत्यंत विश्वासू आणि अनुभवी व्यक्तिमत्व. अराफी सध्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सचे उपाध्यक्ष आहेत. ते तंत्रज्ञानात प्रगत असून त्यांना अरबी आणि इंग्रजी भाषांचे उत्तम ज्ञान आहे. खामेनींचा त्यांच्यावर मोठा विश्वास होता, परंतु सुरक्षा यंत्रणांशी त्यांचे संबंध चांगले नाहीत.
ते कट्टर पुराणमतवादी गटाचे प्रतिनिधित्व करतात. पाश्चिमात्य देशांचे कट्टर विरोधक असलेले मिरबाघेरी धर्मासाठी होणाऱ्या संघर्षात मोठी जीवितहानी झाली तरी ती योग्य मानतात. त्यांच्या टोकाच्या भूमिकेमुळे ते कायम चर्चेत असतात.
इस्लामिक रिपब्लिकचे संस्थापक अयातुल्ला खोमेनी यांचे नातू. कुटुंबाच्या वारशामुळे त्यांना मोठी मान्यता असली, तरी सुधारणावादी विचारसरणीमुळे त्यांना सत्तेपासून दूर ठेवले जाण्याची शक्यता आहे. २०१६ मध्ये त्यांना निवडणुकीसाठी अपात्र ठरवण्यात आले होते.
असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सचे पहिले उपाध्यक्ष. ते खामेनींच्या जवळचे असले तरी त्यांचा देशांतर्गत प्रभाव मर्यादित आहे आणि लष्कराशी त्यांचे जवळचे संबंध नाहीत.

