Author: दीपक मोहिते

जव्हार प्रतिनिधी, दिवाळी फराळ व घरगुती साहित्य विक्रीला उत्स्फूर्त प्रतिसाद. जव्हार तालुक्यातील ग्रामीण महिला स्वावलंबनाचा सुगंध पसरवत आहेत.महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ( उमेद ) आणि पंचायत समिती जव्हार तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष,जव्हार यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांनी पंचायत समिती आवारात आकर्षक ” दिवाळी महोत्सव स्टॉल प्रदर्शन,” भरवले आहे.या ठिकाणी जव्हार तालुक्यातील एकूण १० महिला बचत गट सहभागी झाले असून,पारंपरिक दिवाळी फराळ,बांबू,आकाश कंदील, रंगीबेरंगी पणत्या,सुगंधित अगरबत्ती,रांगोळी,झाडू, साड्या,तोरण अशा अनेक घरगुती व उपयुक्त वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.या सर्व वस्तू महिलांनी घरगुती पद्धतीने प्रेमाने तयार केल्या असून,त्यांच्या दर्जेदार व पारंपरिक स्वादामुळे ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष,जव्हार यांच्यावतीने…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” महाविकास आघाडी सोबत जाणे,बहुजन विकास आघाडीला परवडणारे नाही, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर शिवसेना ( उबाठा ) व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही पक्ष आता एकत्र येण्याच्या तयारीत आहेत.पालघर जिल्ह्यात हे दोन्ही पक्ष बहुजन विकास आघाडीला सोबत घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत.अशाप्रकारचा निर्णय झाल्यास त्यातून काय व कशाप्रकारचे आउटपुट मिळेल,हे आजच्या घडीला सांगता येणार नाही.पण असा निर्णय झाल्यास बहुजन विकास आघाडीला त्याचा फटका बसण्याची शक्यता मात्र अधिक आहे. सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष माजी आ.हितेंद्र ठाकूर या दोघांचे एकमेकांशी किती सख्य आहे,हे जगजाहीर आहे.अशा परिस्थितीत त्यांची होणारी आघाडी या निवडणुकीत…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” राज्य निवडणूक आयोगाची बैठक ; काहीही निष्पन्न होणार नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सध्या बिगुल वाजलं असून सारे राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे.मतदारयादीतील गैरप्रकार प्रकरणी निवडणूक आयोग सध्या अडचणीत आले आहे.विरोधी पक्षाने या प्रश्नी दाखवलेली एकजूट ही प्रशंसनीय ठरली आहे.स्वातंत्र्यानंतरच्या काळात प्रथमच निवडणूक आयोगाच्या कारभारावर काळे ढग जमल्याचे पाहायला मिळाले.विरोधकांच्या रेट्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला नमते घेत काल सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घ्यावी लागली.या बैठकीत काही प्रमुख नेत्यानी मतदारयादीतील अनेक गैरप्रकाराकडे आयोगाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.पण या बैठकीतून चांगले काही निष्पन्न होईल,असे वाटत नाही. एकेकाळी तत्कालीन निवडणूक आयुक्त स्व.टी.एन.शेषन यांनी आपल्या निष्पक्ष कारभाराने जगाचे लक्ष वेधून घेतले होते,तोच…

Read More

तलासरी प्रतिनिधी, विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय लावावी – प्रा.डॉ.राजपूत, आदिवासी प्रगती मंडळ संचालित,कॉ.गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे ग्रंथालय व माहितीशास्र विभागाअंतर्गत, भारतरत्न माजी राष्ट्रपती.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन ” वाचन प्रेरणा दिन, ” म्हणून साजरा करण्यात आला. विद्यार्थी व समाजाच्या इतर घटकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी,त्यांना प्रेरणा मिळावी व वाचनाचे महत्व कळावे,या हेतूने दरवर्षी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येतो.त्यासाठी आज येथे या वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या सभागृहात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.ए.राजपूत यांनी आपल्या मनोगतात अतिशय प्रतिकूल परीस्थितीत स्वप्नांचा पाठलाग करत ध्येय कसे गाठावे,यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम होय.त्यांनी यावेळी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश…

Read More

वसंत भोईर,वाडा भाताचे भारे बांधण्याच्या बंध विक्रीतून मिळतोय आदिवासींना रोजगार, शेतकऱ्यांसाठी भाताचे भारे बांधण्यासाठी लागणारे बंध ( बांबूपासून तयार केलेला दोर ) विक्रीतून अनेक आदिवासी कुटुंबियांना किमान दोन महिने चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील चारशेहून अधिक कुटुंबांचे उपजिविकेचे हे एक साधन बनले आहे. भात कापणी हंगामाला सुरुवात झाल्याने येथील आदिवासींचा बंध विक्रीच्या व्यवसायाला सुरुवात झाली आहे,तर गेल्या वर्षी परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणावर भाताचे नुकसान केल्याने अनेक शेतकऱ्यांनी बंधचा वापर केला नव्हता.यंदा मात्र भात पिकाचे चांगले उत्पन्न आल्याने भारे बांधण्यासाठी बंधची मागणी वाढली आहे. बहुतांश शेतकरी ५०० ते १००० बंध खरेदी करतात. त्यामुळे वाडा,विक्रमगड तालुक्यातील शेकडो आदिवासींना चालू वर्षी चांगला…

Read More

वसंत भोईर, वाडा दिवसभर काम,पण मिळेना पगार…किती दिवस बिनपगारी राबणार ? ग्रामपंचायत स्तरावर महत्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांचे मानधन थकीत राहिल्याने सेवक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शासनाने जरी मासिक आठ हजार रु.मानधन व दोन हजार रु.प्रवास व प्रोत्साहन भत्ता जाहीर केला असला,तरी प्रत्यक्षात अनेकांना हे मानधन अद्याप मिळालेले नाही. परिणामी,ग्रामरोजगार सेवक बिनपगारी काम करीत आहेत. ग्रामरोजगार सेवक हे ग्रामपंचायतीचे समन्वयक म्हणून काम करतात.वैयक्तिक लाभाच्या योजनापासून ते सार्वजनिक कामांच्या लेखाजोख्यापर्यंतची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असते. हे अर्धवेळ काम असले तरी प्रत्यक्षात त्यांना दिवसभर पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या कार्यालयात हजेरी लावावी लागते. दरम्यान,महिनो महिने मानधन न मिळाल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. परिणामी त्यांच्यापुढे…

Read More

दीपक मोहिते, ” राजकीय उलथापालथी,” बविआचे पदाधिकारी व कार्यकर्ते फोडण्याच्या प्रक्रियेला प्रचंड वेग, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात पक्ष सोडणे व दुसऱ्या पक्षात प्रवेश करणे,या अशा अवैध प्रक्रियेला चांगलाच वेग आला आहे.कोणत्याही परिस्थितीत आगामी निवडणुका जिंकायच्याच,या इर्षेने पेटलेल्या भाजपने महायुती सरकारमधील घटक पक्षासह इतर राजकीय फोडण्याचे जोरदार सत्र आरंभले आहे.त्यांच्या या उलाढालीला इतर पक्षातील नाराज पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून चांगलेच बळ मिळत आहे.एकीकडे भाजप,आपल्या पक्षाच्या विस्तारासाठी सातत्याने प्रयत्न करत असताना दुसरीकडे इतर पक्ष मात्र केवळ बघ्याच्या भूमिकेत असल्याचे पाहायला मिळत आहे.वसई तालुक्यात भाजपने गेल्या तीन महिन्यापासून बहुजन विकास आघाडीला चांगलेच लक्ष्य केले आहे.या काळात त्यांच्या पक्षाचे अनेक पदाधिकारी…

Read More

वसंत भोईर, वाडा ग्रामस्थानी तब्बल तीन तास रोखला खानिवली- कंचाड रस्ता, वाडा तालुक्यातील खानिवली – कंचाड रस्त्याची पूर्ण वाताहात होऊन ठिकठिकाणी पडलेल्या प्रचंड खड्ड्यांमुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा व अवजड वाहतूक बंद करा या मागणीसाठी काल देवळी फाटा येथे ग्रामस्थांनी रोको आंदोलन केले. दरम्यान वाड्याचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी आंदोलन स्थळी येऊन आंदोलकांना लेखी आश्वासन दिल्यानंतर हे रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले. खानिवली – कंचाड या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे.त्यामुळे या रस्त्यावर अपघात वाढले असून प्रवाशांच्या जीवाशी खेळ होत आहे.तत्पूर्वी अनेक वेळा अर्ज विनंती करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने आज अखेर या परिसरातील ग्रामस्थांनी…

Read More

दीपक मोहिते, वसई तालुक्यात मीटर रिक्षा सुरू होणार — आ.स्नेहा दुबे पंडित वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात वाढत्या लोकसंख्येमुळे आणि अपुऱ्या सार्वजनिक वाहन व्यवस्थेमुळे येथील नागरिकांना दैनंदिन प्रवासासाठी रिक्षावर अवलंबून रहावे लागत आहे. मात्र,वसई विरार शहरात अद्यापही मीटर रिक्षा नसल्याने शेअर रिक्षाशिवाय अन्य पर्याय उपलब्ध नाही.त्यातच शेअर रिक्षा सेवेच्या मनमानी भाडे आकारणे तसेच फक्त मुख्य रस्त्यावर शेअर रिक्षा चालवणे,इ.कारणामुळे वयोवृध्द नागरिक,महीला,विद्यार्थी यांना वसाहतीतील आतील भागामध्ये जाण्यासाठी पायी चालत जावे लागते.बऱ्याच वेळा सामानासह पायी चालत जाणे नागरिकांना अडचणीचे होत असते. मीटर रिक्षाच्या समस्येबरोबरच शहरामध्ये वाहनांची पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असतो.वसई – नालासोपारा-विरार या स्थानकांच्या बाहेरच्या भागात प्रचंड वाहतूक…

Read More

सचिन सावंत,वसई विविध पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश, वसई विधानसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.या सर्वांचे आ.स्नेहा दुबे पंडित यांनी स्वागत केले व पुढच्या राजकीय वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये शिवसेनेचे ( उबाठा ) जिल्हा सरचिटणीस ऍड.कुणाल कांदे,उपविभागप्रमुख निखिल हाटे,शाखाप्रमुख जयेश सोळंकी,सलमान साठे,फैझल काझी,शहराध्यक्ष ऍड. योगेश जाधव,ऍड.निलेश शिर्के,यतीन चोरघे,कौस्तुभ राऊत,विरल राजाणी,अकसना शेख,आकाश बोराणा, रोहित मालवणकर,सूरज माझी,जुबेर पठाण व ७० ते ८० कार्यकर्त्यांचा समावेश होता.याप्रसंगी भाजपचे पदाधिकारी संख्येने उपस्थित होते.

Read More