- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, महानगरपालिकेतील २९ गावे ; १६ ते २० डिसें.दरम्यान सलग सुनावणी, वसई विरार शहर महानगरपालिकेमधील ५५ गावांपैकी ३१ मे २०११ रोजीच्या शासन अधिसूचनेनुसार वसई विरार शहर महानगरपालिकेतून वगळलेली २९ गावे महानगरपालिका हद्दीत पुनश्चः समाविष्ट करण्याबाबत १४ फेब्रु.२०२४ रोजी अधिसूचना प्रसिद्ध करणेत आली होती. त्यानुसार १४ फेब्रू.२०२४ ते १४ मार्च २०२४ या कालावधीमध्ये एकूण ३१ हजार ३८९ इतक्या हरकती व आक्षेप नोंदी घेण्यात आलेल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे १६ डिसें.ते २० डिसें रोजी सकाळी १०.०० ते संध्या.५.३० वाजे. यावेळेत सदर हरकती अर्जावर सुनावणी ठेवण्यात आली आहे. सदर सुनावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांचे पत्रानुसार वसई विरार शहर महानगरपालिके मार्फत…
संजय नेवे,विक्रमगड, खा.डॉ.हेमंत सवरा यांनी घेतली केंद्रीय जलशक्तीमंत्री सी.आर.पाटील यांची भेट, दिल्लीत हिवाळी अधिवेशना दरम्यान केंद्रीय जलशक्तीमंत्री सी.आर.पाटील यांची खा.सवरा यांनी दिल्ली येथे भेट घेतली. जलजीवन मिशन हा ग्रामीण भारतातील सर्व घरांना वैयक्तिक नळ कनेक्शनद्वारे सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा पंतप्रधानांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे.पालघर जिल्ह्यात दरवर्षी तीव्र पाणीटंचाई निर्माण होत असते.त्यावर उपाययोजना करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील अनेक भागात जलजीवन मिशनचे काम सुरू आहे.परंतु जिल्ह्यांतील काही भागांचा जलजीवन मिशन योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला नाही.त्यामुळे जिल्ह्याच्या पाण्याच्या प्रश्नाने अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. तसेच अनेक पाणीपुरवठा योजना रखडल्या आहेत.आवश्यक निधीची कमतरता असून वेळोवेळी केंद्राकडे मागणी करण्यात आली आहे.जिल्ह्यातील अनेक विहिरी,या…
जव्हार प्रतिनिधी, आयरे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना दिले कायद्याचे ज्ञान, आयरे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान आणि स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन देण्यासाठी जव्हार पोलीस विभागातर्फे विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते.या सत्रात पोलीस कर्मचाऱ्यांनी विविध महत्त्वाच्या विषयांवर माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना कायद्याची ओळख व जबाबदारीची जाणीव करून दिली. पोलीस शिपाई प्रदीप विटकर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी विविध पदांची माहिती दिली.त्यांनी पोलीस भरती प्रक्रिया,शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व,तसेच अभ्यासाची योग्य पद्धत,यावर सखोल मार्गदर्शन केले. शिवाय,मोबाईलचा मर्यादित वापर,विनापरवाना वाहन चालवण्याचे दुष्परिणाम, आणि अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी बाळगणे याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण केली. हेमंतकुमार डामसे यांनी पोक्सो कायद्याविषयी माहिती देताना बालविवाहाचे दुष्परिणाम,त्याची सामाजिक व कायदेशीर…
नवीन पाटील, सफाळे, पिकअप टेम्पो- बाईकच्या अपघातात एक ठार,दोन जखमी, मनोर मार्गावर गुरूवारी भीषण अपघात झाला आहे.या अपघातात एका दुचाकीवरून जात असलेल्या भाऊ बहिणींपैकी भावाचा मृत्यू झाला आहे.तर बहीण गंभीर जखमी झाली आहे. या व्यतिरिक्त आणखी एक दुचाकीस्वार देखील गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.विशाल यादव,असे या अपघातातील मृत दुचाकीस्वार तरूणाचे नाव आहे. पालघर तालुक्यातील मनोर येथील धुपोंडापाडा येथे राहणारे विशाल चांदमल यादव ( १९ ) आणि त्याची बहीण डिंपल चांदमल यादव ( २२ ) हे दोघे दुचाकीने पालघरच्या दिशेने निघाले होते. पालघर- मनोर मार्गावर गोवाडे गावाच्या हद्दीत एका वळणावर भरधाव पिकअप टेम्पोने विशाल यादव चालवत असलेल्या दुचाकीला मागून जोरात धडक…
संदीप लहांगे,डहाणू, जिल्हा परिषद शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा संपन्न, पालघर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे शाळांतील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा २०२४-२५ पालघर आर्यन हायस्कूलचे मैदान येथे पार पडल्या.मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे,अध्यक्ष प्रकाश निकम,कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संदीप पावडे,समाज कल्याण समिती सभापती मनीषा निमकर व जिल्हा परिषद सदस्य निता पाटील,सारिका निकम,भावना विचारे,पंचायत समिती सभापती शैला कोळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धा पार पडल्या,. या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांचे मी मनापासून कौतुक करतो,तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या, त्यांना सांभाळणाऱ्या शिक्षकांची जबाबदारी ही त्यांच्या पालकांपेक्षा मोठी असून त्या शिक्षकांचे करावे तितके कौतुक कमी आहे, हे शिक्षक या समाजातील…
संजय लांडगे,वाडा शहर, गुरुनाथ लहांगे यांना दिल्ली येथे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान, वाडा तालुक्यातील मेघवालपाडा येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या गुरुनाथ लहांगे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक व समाजिक कार्यातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिल्ली येथील राजेंद्र भवन येथे प्रसिद्ध बाबू जगजीवनराम कला संस्कृती आणि साहित्य ऍकेडमीतर्फे वीर बिरसा मुंडा राष्ट्रीय सन्मान पद व आदर्श शिक्षक,२०२४ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. गुरुनाथ भागोजी लहांगे मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा मेघवालपाडा तथा अध्यक्ष आदिवासी शिक्षक संघटना वाडा,सचिव प्राथमिक शिक्षक समन्वय समिती,वाडा यांना शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल लोकसभेच्या माजी सभापती मीराकुमार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.गुरुनाथ भागोजी लहांगे,हे…
वसंत भोईर,वाडा ग्रामीण, भाताला हमीभाव कागदावरच ; अद्याप भातखरेदी सुरूच झाली नाही… गेल्या काही वर्षापासून शेतीव्यवसाय अनिश्चिततेच्या वातावरणात हेलकावे खात आहे.पावसाचे उशिराने आगमन,अतिवृष्टी,अवकाळी पाऊस,परतीच्या पावसाचा फटका,नापिकी व सरकारचे कृषीविषयक दिशाहीन धोरण, इ.कारणामुळे शेती व्यवसाय उतरणीला लागला आहे.अशा परिस्थितीत सरकार उत्पादित शेतमालाला हमी भाव देणे व वेळेवर भातखरेदी केंद्रे सुरू करणे,या दोन महत्वाच्या बाबीकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे.त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. खाजगी बाजारपेठेत भाताला भाव मिळत नसल्यामुळे राज्य शासनाने पालघर जिल्ह्यात आदिवासी विभाग महामंडळाच्या माध्यमातून वाडा,मोखाडा तालुक्यातील १० खरेदी केंद्रे स्थापन केली आहेत.या खरेदी केंद्रावर सुमारे १ हजार ४६५ शेतकऱ्यांनी भात विक्रीसाठी नोंदणी केली.नोंदणी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना २…
वसंत भोईर,वाडा ग्रामीण, वाडा येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न, सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांचे ५२ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन वाडा पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे ह.वि.पाटील विद्यालय चिंचघर येथे नुकतेच आयोजित करण्यात होते.त्यास उदंड प्रतिसाद मिळाला. सदर विज्ञान प्रदर्शनात उच्च प्राथमिक गट व उच्च माध्यमिक गटाने विविध विषयांवर प्रयोगांची मांडणी केली होती.यामध्ये एकुण १०४ प्रयोगांची मांडणी करण्यात आली होती.शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा तसेच विद्यार्थ्यांसाठी वकृत्व व प्रश्नमंजुषा स्पर्धा यांचे आयोजन या विज्ञान प्रदर्शनात करण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन वाडा पंचायत समीतीच्या सभापती अस्मिता लहांगे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जि.प.सदस्या भक्ती वलटे,पं.स.सदस्य अमोल पाटील,सागर…
दीपक मोहिते, न्यूजलाईन, मासेमारी व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याची गरज… कोंकण महसूल महसुल विभागातील पालघर,रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग,या चार जिल्ह्यात शेती-बागायती सोबत मासेमारी व्यवसायही मोठ्या प्रमाणात करण्यात येतो.समुद्रकिनारी असलेल्या या चार जिल्ह्यात हजारो कुटुंबीय या मासेमारी व्यवसायावर आपला चरितार्थ चालवतात.समुद्रातील मत्स्य उत्पादनाने चारही जिल्ह्यात कोळी व मांगेला समाजाला आर्थिक वैभव मिळवून दिले.३० वर्षांपूर्वी मत्स्यउत्पादन हे माफक दरात विकण्यात येत असे व ते सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला परवडणारे होते.त्याकाळी मच्छिमारांना विपुल प्रमाणात मत्स्यउत्पादन मिळत असे,त्यामुळे ग्राहकांना ते वाजवी दरात विकणे शक्य होत असे.आज ती स्थिती उरली नाही,उत्पादनात घट व खर्चात वाढ,त्यामुळे माश्यांचे दर गगनाला पोहोचले आहेत, व ते ग्राहकांनाही परवडत नाही.उत्पादनात सतत घट का…
दीपक मोहिते, महानगरपालिकेच्या विकास कामांचा व योजनांचा आढावा, आज वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात आ.स्नेहा दुबे-पंडीत यांनी महानगरपालिकेची विविध विकास कामे व योजनांसंदर्भात महानगरपालिका अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. सदर आढावा बैठकीत महानगरपालिकेच्या विविध विभागातर्फे नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध सुविधा,लोककल्याणकारी योजना यांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांतर्फे आ.स्नेहा दुबे-पंडीत यांना देण्यात आल्या. त्याचबरोबर महानगरपालिकेची सुरु असलेली विकास कामे व महानगरपालिकेच्या पुढील योजना यासंदर्भात चर्चा करण्यात आली.आमदाराकडून महानगरपालिका अधिकाऱ्यांना विविध सूचना देण्यात आल्या व त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले. या आढावा बैठकीमध्ये प्रभारी आयुक्त रमेश मनाळे,अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, महानगरपालिकेचे सर्व उप-आयुक्त, सहा.आयुक्त व विभाग प्रमुख उपस्थित होते.
