दीपक मोहिते,
महानगरपालिकेतील २९ गावे ; १६ ते २० डिसें.दरम्यान सलग सुनावणी,
वसई विरार शहर महानगरपालिकेमधील ५५ गावांपैकी ३१ मे २०११ रोजीच्या शासन अधिसूचनेनुसार वसई विरार शहर महानगरपालिकेतून वगळलेली २९ गावे महानगरपालिका हद्दीत पुनश्चः समाविष्ट करण्याबाबत १४ फेब्रु.२०२४ रोजी अधिसूचना प्रसिद्ध करणेत आली होती. त्यानुसार १४ फेब्रू.२०२४ ते १४ मार्च २०२४ या कालावधीमध्ये एकूण ३१ हजार ३८९ इतक्या हरकती व आक्षेप नोंदी घेण्यात आलेल्या आहेत.
त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे १६ डिसें.ते २० डिसें रोजी सकाळी १०.०० ते संध्या.५.३० वाजे. यावेळेत सदर हरकती अर्जावर सुनावणी ठेवण्यात आली आहे.
सदर सुनावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांचे पत्रानुसार वसई विरार शहर महानगरपालिके मार्फत १५ पथके व १ राखीव पथक कक्ष स्थापन केले आहे.एकूण ३१हजार ३८९ अर्जाची छाननी व सुनावणी करीता १५ पथकांचे प्रमुख म्हणून सुभाष जाधव, उपायुक्त यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे व पथक क्र.१ ते १५ पथकाकरिता सहा.आयुक्त/ प्र.सहा.आयुक्त,अधिक्षक, वरिष्ठ लिपिक, लिपिक-टंकलेखक व शिपाई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
तरी सदर सुनावणी करीता ज्या नागरिकांचे हरकती अर्ज असतील त्यांनी मा. जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे उपस्थित राहावे.

