संजय नेवे,विक्रमगड,
खा.डॉ.हेमंत सवरा यांनी घेतली केंद्रीय जलशक्तीमंत्री सी.आर.पाटील यांची भेट,
दिल्लीत हिवाळी अधिवेशना दरम्यान केंद्रीय जलशक्तीमंत्री सी.आर.पाटील यांची खा.सवरा यांनी दिल्ली येथे भेट घेतली.
जलजीवन मिशन हा ग्रामीण भारतातील सर्व घरांना वैयक्तिक नळ कनेक्शनद्वारे सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा पंतप्रधानांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे.पालघर जिल्ह्यात दरवर्षी तीव्र पाणीटंचाई निर्माण होत असते.त्यावर उपाययोजना करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील अनेक भागात जलजीवन मिशनचे काम सुरू आहे.परंतु जिल्ह्यांतील काही भागांचा जलजीवन मिशन योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला नाही.त्यामुळे जिल्ह्याच्या पाण्याच्या प्रश्नाने अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. तसेच अनेक पाणीपुरवठा योजना रखडल्या आहेत.आवश्यक निधीची कमतरता असून वेळोवेळी केंद्राकडे मागणी करण्यात आली आहे.जिल्ह्यातील अनेक विहिरी,या नदीकाठावर असल्यामुळे त्या नदीवर चेक वॉटर हार्वेस्टिंग छोटे बंधारे बांधण्यात यावेत.तसेच पालघर जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेविषयी खा.सवरा यांनी सविस्तर चर्चा केली.केंद्र सरकारच्या जनजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून घराघरात पाणी पोहचले पाहिजे यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे डॉ.सवरा यांनी या भेटीनंतर माध्यमांना सांगितले.

