- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
अश्विन नाईक रत्नागिरी, ” गोड आठवण, ” साने गुरुजी ; असामान्य समाजसुधारक व आदर्श स्वातंत्र्यसेनानी साने गुरुजींची आज जयंती,त्यांचा जन्म २४ डिसें.१८९९ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या खेड्यात झाला.त्यांचे वडील हे कोर्टात काम करत असत,पण घरची आर्थिक स्थिती मात्र बेताचीच होती.साने गुरुजींवर त्यांच्या आईच्या शिकवणीचा लहानपणापासून मोठा प्रभाव होता.त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर केलेल्या संस्कारामुळे गुरुजींचा जीवनविकास होत गेला.त्यांनी इंग्रजी साहित्यामध्ये एम.ए.ची पदवी मिळवली व ते शिक्षकी पेशात स्थिरावले.त्यांनी पहिली नोकरी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील प्रताप हायस्कुल येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे नोकरी केली. त्यांनी आपल्या कार्यकाळात शाळेच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वावलंबन,सेवावृत्ती,या विषयीचे धडे दिले.१९२८ साली त्यांनी ” विद्यार्थी,” हे मासिक सुरू…
अनिता घाणेकर,पुणे, ” फ्रंटलाईन,” ” पुणे तेथे खूप काही उणे,” म्हणायची पाळी पुणेकरांवर आली आहे…. आपण पुणे या ऐतिहासिक व विद्यानगरी विषयी आजवर खूप काही ऐकत आलो.अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असलेले हे शहर आता निरनिराळया कारणामुळे सतत प्रकाशझोतात येत असते.” ” पुणे तेथे काय उणे ? ” ही म्हण गेली अनेक वर्षे प्रचलित होती.पण आता ” पुणे तेथे,खूप काही उणे,” असे म्हणायची पाळी पुणेकरांवर आली आहे. पुणे जिल्हा हा प.महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून ओळखला जातो.या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे.पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. या जिल्ह्यात आंबेगाव,इंदापूर,खेड,जुन्नर,दौंड,पुणे शहर,पुरंदर,बारामती,भोर,मावळ मुळशी,राजगड,शिरूर व हवेली,असे चौदा तालुके…
दीपक मोहिते, ” मनपा निवडणुकीचे वेध,” स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका : राज्याचे लक्ष २२ जाने.रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सूनावणीकडे,” लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर आता राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत.गेल्या चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे.ही व्यवस्था आणखी काही काळ सुरू ठेवणे,योग्य होणार नाही.त्यामुळे राज्य सरकार आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात,यासाठी प्रयत्नाला लागले आहे.या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात २२ जाने.२०२५ रोजी सुनावणी होणार आहे. या सूनावणीमध्ये जर न्यायालयाने निवडणुका घेण्यासंदर्भात निर्णय दिल्यास राज्यातील २९ महानगरपालिका,२५७ नगरपालिका,२६ जिल्हा परिषदा,२८९ पंचायत समित्या व २७ हजार ९०० ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होईल. महायुतीमधील घटक…
दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” राष्ट्रीय शेतकरी दिन ; शासकीय पातळीवर शुकशुकाट, ” जगाचा पोशिंदा,” अशी ओळख असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी २३ डिसें.राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करण्यात येतो.या दिनी देशभरातील अन्नदात्याच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व आदर व्यक्त करण्यात येतो.मात्र यंदा या दिनी सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला.आपले राज्यसरकार खातेवाटप व मंत्र्यांना बंगले वाटप या प्रक्रियेत अडकून पडले होते.मुख्यमंत्री व त्यांच्या सहकारी मंत्र्यांना कदाचित या दिनाचे महत्व वाटले नसावे. दरवर्षी या शेतकरी दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते,पण गेल्या काही वर्षात केंद्र व राज्य सरकार या प्रश्नी प्रचंड उदासीन असल्याचे दिसून आले आहे.आपल्या देशाची ओळख ही कृषिप्रधान देश अशी आहे.५२…
सुहास जोशी,औरंगाबाद, संतोष देशमुख हत्या : ९ जाने.रोजी राज्यातील ग्रामपंचायती बंद पाळणार, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषधार्थ राज्यातील सर्व ग्रामपंचायती ९ जाने.रोजी बंद पाळणार आहे,अशी माहिती अखिल भारतीय सरपंच परिषदेने दिली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसें.रोजी हत्या करण्यात आली होती.त्यानंतर सरपंच परिषदेने देशमुख कुटुंबीयांची काल भेट घेतली.महाराष्ट्रात प्रथमच एवढ्या अमानुष,अमानवीय पद्धतीनं ही हत्या झाली असून यामधील आरोपींवर कारवाई करावी,अशी मागणी त्यांनी यावेळी केली.राज्यात परत कोणाचीही अशी हिंमत होणार नाही,अशा पद्धतीचे कडक शासन आरोपींना करावे,अशी मागणी सरपंच परिषदेने केली आहे. संतोष देशमुखांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायती येत्या ९ जाने.या दिवशी बंद राहतील,अशी माहिती सरपंच परिषदेचे अध्यक्ष…
प्रतिनिधी,जव्हार, नवीवाडी शाळेचा प्रेरणादायी स्वच्छता उपक्रम, जिल्हा परिषद पालघर मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे यांच्या प्रेरणेतून आणि नवीवाडी शाळेचे मुख्याध्यापक नितीन आहेर यांच्या पुढाकाराने ग्रामीण फर्स्ट डेव्हलपमेंट फाउंडेशन संस्थेच्या सहकार्याने नवीवाडी शाळेत विशेष स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना हात धुण्याच्या योग्य पद्धतीचे शास्त्रीय प्रशिक्षण मिळाले.शाळेत दररोज राबवला जाणारा “ हात धुवा,” उपक्रम अधिक प्रभावी बनवण्यासाठी संस्थेच्या परिवर्तन टीमने विशेष प्रयत्न केले.टीममधील अरुणा गायकवाड,निशा जाधव,आणि संध्या वाजे यांनी विद्यार्थ्यांसमोर स्वच्छतेवर आधारित आकर्षक नाटिका सादर केली.या नाटिकेतून विद्यार्थ्यांना हात धुण्याचे महत्त्व प्रभावीपणे समजावून सांगण्यात आले.यानंतर, टीमने स्वतः हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखवले आणि विद्यार्थ्यांकडूनही प्रात्यक्षिक करून घेतले.स्वच्छतेबाबत अधिक जागृतीसाठी लॅपटॉपवर स्वच्छतेशी…
जव्हार,प्रतिनिधी, कनसरी दिनदर्शिका २०२५ चा प्रकाशन सोहळा संपन्न. पालघर जिल्हा आदिवासी सेवा संस्था,मुख्यालय जव्हार च्या वतीने दरवर्षीप्रमाणे कनसरी दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन नुकतेच संस्थेचे उपाध्यक्ष लक्ष्मण लोहार यांच्या विक्रमगड येथील निवासस्थानी संपन्न झाले.या प्रकाशन सोहळ्याचे उद्घाटन राहुल धूम सेवानिवृत्त गटविकास अधिकारी, आणि पालघर जिल्हा आदिवासी सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ धर्मा डोके यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विक्रमगड पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक अर्जुन सुरूम, विक्रमगडचे माजी उपनगराध्यक्ष भालचंद्र मोरघा, डॉ. सदाशिव पवार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. कनसरी दिनदर्शिका २०२५ हे एक विशेष प्रकाशन असून, ते आदिवासी संस्कृतीवर आधारित आहे.या दिनदर्शिकेत…
वसंत भोईर,वाडा, रोटरी क्लब ऑफ मुंबईतर्फे पाणी आणि शेतीवर आधारित प्रकल्पांचे लोकार्पण, रोटरी क्लब ऑफ मुंबई दहिसर यांनी वाडा तालुक्यातील खुपरी – भोईरपाडा येथे एक उल्लेखनीय सामाजिक प्रकल्प राबवला.त्यांनी हँड पंप बोरिंगमध्ये सुधारणा करून सोलर एनर्जीवर मोटर बसवून मोफत पाण्याची सोय उपलब्ध करून दिली.त्यामुळे स्थानिक महिलांचा वेळ आणि श्रम मोठ्या प्रमाणात वाचला आहे. या प्रकल्पाला सीता फाउंडेशनचा सीएसआर फंड लाभला आहे.येत्या वर्षभरात अजून दोन बोरिंगची सुधारणा करण्यात येणार आहे. तसेच चारणवाडी येथील शेतकऱ्यांना आंबा,काजू,पेरु, लिंबू,या फळांच्या ५०० झाडांचे वाटप करण्यात आले आहे.शेतकऱ्यांना फळझाडांतून शाश्वत उत्पन्न मिळण्यासाठी या उपक्रमाची मदत झाली आहे. या कार्यक्रमास कंपनीचे डायरेक्टर धवल व्यास,सदस्य ललित तिवारी, रमेश,शमा,आणि…
संजय लांडगे,वाडा, वाड्यात महाविकास आघाडीकडून अमित शहा यांचा निषेध, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अवमानकारक शब्द वापरल्याप्रकरणी त्यांचा वाडा येथे निषेध करण्यात आला. यावेळी त्यांचा राजीनामा घेण्यात यावा,अशी मागणी महाविकास आघाडी वाडा शहर व वाडा तालुका यांच्यातर्फे करण्यात आली आहे. आज वाडा शहरातील बस स्थानकासमोर महाविकास आघाडीच्या वतीने अमित शहा यांचा जाहीर निषेध करण्यात आला.संविधान निर्माते, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला संविधान देवून न्याय,बंधुता, समान स्वातंत्र्य दिले आहे. त्यांनी दिलेल्या संविधानावर देश चालत आहे.ज्या महामानवाने भारत देशाला संविधान दिले,त्या महामानवाबद्दल देशाचे गृहमंत्री अवमानकारक शब्द वापरून भारत देशाच्या आंबेडकरवादी विचार धारेचा अवमान केला असून,…
सुदर्शन पाटील, पालघर, सुशासन आठवडा कार्यशाळेचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते उद्घाटन दरवर्षी .25 डिसें.हा दिवस सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो.केंद्र शासनातर्फे 19 ते 24 डिसेंबर,2024 या कालावधीत “ सुशासन सप्ताह गांव की और,” साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने आज जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत सुशासन आठवडा निमित्ताने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यशाळेस अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनायक नराळे,निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे,प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे,पोलीस उपअधीक्षक संगिता शिंदे, तहसिलदार ( महसूल ) सचिन भालेराव,तहसिलदार ( सामान्य ) प्रमोद कदम…
