सुदर्शन पाटील, पालघर,
सुशासन आठवडा कार्यशाळेचे
जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते उद्घाटन
दरवर्षी .25 डिसें.हा दिवस सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो.केंद्र शासनातर्फे 19 ते 24 डिसेंबर,2024 या कालावधीत “ सुशासन सप्ताह गांव की और,” साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने आज जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत सुशासन आठवडा निमित्ताने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यशाळेस अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनायक नराळे,निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे,प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे,पोलीस उपअधीक्षक संगिता शिंदे, तहसिलदार ( महसूल ) सचिन भालेराव,तहसिलदार ( सामान्य ) प्रमोद कदम जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भांबरे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यशाळेस मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी बोडके म्हणाले की,शासनस्तरावर विविध नाविण्यपूर्ण योजना राबवण्यात येतात.या नाविण्यपूर्ण योजना सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी असल्याने त्यांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचली पाहीजे, याची जाणीव सर्व शासकीय यंत्रणांना असणे गरजेचे आहे. तसेच जिल्हा प्रशासन राबवत असलेल्या विविध नाविण्यपूर्ण योजनांची नोंद शासनस्तरावर होणे गरजेचे आहे,त्यासाठी हा सुशासन आठवडा राबवण्यात येतो.सुशासन सप्ताहाचा एक भाग म्हणून प्रशासन गांव की ओर अभियान राबवण्यात येत असून ” प्रशासन गांव की ओर, ” अभियानात सर्व शासकीय विभागांनी सक्रिय सहभागी होऊन नागरिकांना पारदर्शक व तत्पर सेवेचे वितरण करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले आहे.या सप्ताहात प्रशासनाच्या नवनवीन संकल्पना व उपक्रमांद्वारे नागरिकांच्या सार्वजनिक तक्रारींचे निवारण तसेच ऑनलाईन सेवा व सेवा वितरण अर्जाचा निपटारा करण्यात येणार आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले
या कार्यशाळेत जिल्हा पोलीस अधीक्षक,पालघर जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून जिल्ह्याच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी असणाऱ्या विविध संकल्पना व उपक्रमांचे सादरीकरण केले.तहसिलदार ( महसूल ) सचिन भालेराव यांनी आभार प्रदर्शन केले.

