Author: दीपक मोहिते

सुरेश काटे,तलासरी, सावित्रीच्या लेकींनी आत्मनिर्भर होऊन समाज परिवर्तन घडवावे- प्राचार्य डॉ. राजपूत, आदिवासी प्रगती मंडळ संचलित कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तलासरी येथे सांस्कृतिक विभाग आणि महिला विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व प्राचार्य डॉ.बी.ए.राजपूत यांच्या मार्गदर्शनाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास नीता विवेकानंद देसले,केंद्रप्रमुख आमगाव,या वक्त्या म्हणून उपस्थित होत्या.तसेच प्रा.डॉ.बी.ए. राजपूत,महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ.अर्जुन होन, उपप्राचार्य डॉ.आर.एन.पवार तसेच सांस्कृतिक विभाग आणि महिला विकास विभागाचे सर्व सदस्य उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.ए.राजपूत यांनी प्रस्ताविकात त्यांच्या कवितेद्वारे सावित्रीबाईंच्या कार्याचा आढावा अत्यंत प्रभावीपणे मांडला. सावित्रीबाईंच्या पुरोगामी विचारांचे महत्त्व व तळागाळातील शिक्षणाची…

Read More

वसंत भोईर,वाडा, स्थानिक पेंढा व्यापारी संगनमताने करतात शेतकऱ्यांची लूट, वाडा तालुक्यात विभागवार पेंढा खरेदी केंद्राची गरज, तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा पावसाच्या भितीने भात कापणीसोबत घाईघाईने झोडणीलाही सुरुवात केली आहे.झोडणी करून शेतात ठेवलेल्या पेंढ्याला चांगला भाव मिळेल,या अपेक्षेने शेतकऱ्यांनी पेंढा व्यवस्थित रचून ठेवला आहे.मात्र पेंढा खरेदी करणारे स्थानिक व्यापारी लबाडीने भाव कमी करण्यासाठी शकल लढवत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना कमी किमतीत आपला पेंढा विकावा लागत असल्याचे चित्र सध्या तालुक्यात पाहायला मिळत आहे. तालुक्यातील स्थानिक पेंढा खरेदी करणारे छोटे-मोठे व्यापारी संगनमत करून हेतुपूर्वक काही दिवस पेंढा खरेदीकडे पाठ फिरवत आहेत.तसेच मुंबई व वसई शेजारील पट्ट्यात म्हशींच्या तबेल्यांचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहेत.तेथे पेंढ्याला मोठ्या प्रमाणात मागणी…

Read More

दीपक मोहिते, राज का रण ? उंदराची पळापळ सुरू सुरू झाली आहे ; पक्षनिष्ठा गेली तेल लावत… सत्तांतर झाले की पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सैरभैर होत असतात,त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी देखील ” आपलं काय होणार ?” या भितीमुळे पळ काढत असतात.वसई तालुक्यात सध्या असेच चित्र पाहायला मिळत आहे.महानगरपालिकेचे अनेक वरीष्ठ अधिकारी आपली बदली करून घेण्यासाठी विरार ते मंत्रालय,अशा चपला झिजवत आहेत.तर अनेक कार्यकर्ते व माजी नगरसेवक हवेच्या दिशेने आपली पाठ फिरवण्याच्या तयारीत आहेत.यालाच आपण ” घर फिरलं,की वासेही फिरतात,” अस म्हणतो. राजकारणात कोण कोणाचा नसतो,या उक्तीप्रमाणे पराभूत पक्षाचे कार्यकर्ते व नगरसेवक देखील त्याला अपवाद नाहीत,हे लवकरच वसई-विरारकर नागरिकांना अनुभवायला मिळणार…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” हे असंच चालायचं ” ही मानसिकता,आता बदलायला हवी, राज्यात कुपोषण व अन्य आजाराने मृत्यूमुखी पडणाऱ्या बालकांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही.अशा स्थितीत गरोदर महिलांच्या मृत्यू होण्याच्या घटना वारंवार घडू लागल्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व वैद्यकीय व्यवस्था व्हेन्टीलेटरवर गेल्याचे दिसून आले आहे.या आठवड्यात विक्रमगड व जव्हार,या दोन तालुक्यात दोन गरोदर महिलांचे वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे झालेले मृत्यू पालघरवासियांचे मन सुन्न करून गेले.या दोन्ही घटनांची चौकशी करण्यात येणार आहे.पण या चौकशीतून फारसे काही निष्पन्न होणार नाही.कारण ग्रामीण भागातील व्यवस्था पार गंजली आहे.ज्या अधिकाऱ्यांवर व्यवस्थेची जबाबदारी देण्यात आली आहे.त्यांची मने मेली आहेत, त्यामुळे जनतेला त्यांच्याकडून फारशा अपेक्षा…

Read More

जव्हार प्रतिनिधी, मातेसह बाळाचाही मृत्यू , अचानक मृत्यू कसा झाला कुटुंबीयांची चौकशीची मागणी. मोखाडा तालुक्याची गरोदर महिलेच्या मृत्यूची घटना ताजी असतांना जव्हार येथे एका महिलेची प्रसूती होत असताना अचानक तिचा व बाळाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जव्हारच्या उपजिल्हा रुग्णालयात काल रात्री घडली आहे.ती महिला सुरवातीला चांगली होती, स्वतःहून प्रसुती करिता गेली असताना तिचा अचानक मृत्यू कसा झाला, याबाबत सखोल चौकशी करावी,अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. विक्रमगड तालुक्यातील गालतरे येथील कूंता वैभव पडवळे वय ३१ वर्ष,या महिलेला प्रसूतीकरिता जव्हार उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिचा नियमित विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होता.मात्र येथे योग्य त्या वैद्यकीय सुविधा नसल्याने,तुम्ही तिला…

Read More

वसंत भोईर,वाडा, पैसे देणारे पीक आहे जवस, तरीही शेतकऱ्यांची पाठ का ? जवस पीक,हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे तेलबिया पीक म्हणून ओळखले जाते. जवसचा उपयोग तेल काढणे आणि धागा निर्मितीसाठी देखील केला जातो.जवस हे पौष्टिक असून,यातून आठ प्रकारची प्रथिने,कार्बोदके, जीवनसत्वे व खनिजे मिळतात. जवस तेलात ५८ % ओमेगा तीन,ओमेगा सहा, कोलेस्ट्रॉल आणि ऑटी ऑक्सिड असतात. जवसला बाजारात चांगली मागणी असते.भावही चांगला आहे परंतु वाडा तालुक्यात जवस पीक घेतलं जात नाही. कृषी विभागाकडून तेलबिया पीक लागवडीकडे शेतकऱ्यांना वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.हे पीक घेताना अडचणी येत असल्याने हे पीक शेतकरी तयार नसतात. विविध ठिकाणी कमी अधिक प्रमाणात दर आढळून येतात.जवस पिकाला दहा ते…

Read More

दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” महायुती व महाविकास आघाडीमध्ये सध्या प्रचंड अस्वस्थता, विधानसभा निवडणुकीनंतर महायुती व महाविकास आघाडीमध्ये प्रचंड मरगळ आली आहे.या निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळूनही त्यांचे मंत्री व आमदारांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.शिवसेनेचे एकनाथ शिंदे कुठे गायब झाले आहेत देवजाणे,तर अजित पवार पक्षांतर्गत घडामोडीमुळे प्रचंड तणावाखाली आले आहेत.धनंजय मुंडे व वाल्मिक कराड,या दोघांमुळे त्यांच्या पक्षाची प्रतिमा पार डागळली गेली आहे.पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे त्यांनी थेट अजित पवार यांना आव्हान दिले आहे.मराठा आरक्षण प्रश्नी पक्ष बॅकफूटवर गेला असताना आता छगन भुजबळ यांना डावलल्यामुळे ओबीसी समाज देखील त्यांच्या पक्षापासून दुरावण्याची शक्यता आहे.आज त्यांची अवस्था “…

Read More

वसंत भोईर,वाडा, चालू वर्षात प्लास्टिक बंदी स्वयंस्फूर्तीने आणूया आचरणात… सुख- दुःखाच्या अनेक आठवणींना मनात साठवून २०२४,या सरत्या वर्षांला आनंदाने निरोप देऊन २०२५च्या नवीन वर्षात चांगल्या गोष्टींपासून सुरुवात करुया.प्लास्टिक बंदीचा नवा संकल्प आचरणात आणून मानवी जीवनाच्या आरोग्यास घातक असलेल्या प्लास्टिकचा वापर नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने टाळावा.कायद्याच्या धाकापेक्षा नागरिकांच्या पुढाकाराने प्लास्टिक वापर निश्चितपणाने हद्दपार होऊ शकते.त्यामुळे प्लास्टिक बंदीच्या चळवळीत नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत,सुंदर भारत,मोहिमेला हातभार लावूया. तालुक्यातील बाजार पेठेत व्यापारी,फेरीवाले,भाजीपाला विक्रेते,मच्छी विक्रेते यांच्याकडून बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या तसेच थर्माकोलचा मोठ्या प्रमाणात खुलेआम वापर होत आहे.यामुळे स्वच्छ भारत,सुंदर भारत या मोहिमेला गालबोट लागत आहे.सरकारने घेतलेल्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची…

Read More

सुरेश काटे,तलासरी, आशागड येथे सात दिवसीय विशेष निवासी शिबिर संपन्न, आदिवासी प्रगती मंडळ संचालित कॉ.गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,तलासरी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिर कॉ.शामराव परुळेकर माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आशागड येथे २४ ते ३० डिसें.२०२४,या कालावधीत संपन्न झाले. या निवासी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य अजितदादा नार्वेकर, कॉ.गोदावरी शामराव परुळेकर वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.ए.राजपूत,तसेच कॉ.शामराव परुळेकर माध्यमिक विद्यालयाचे चे मुख्याध्यापक काकड सर उपस्थित होते. या निवासी शिबिरात विद्यार्थ्यांचे 7 ग्रुप तयार करण्यात आले.या ग्रुपची नावे सूर्यफूल,मोगरा,जास्वंद, सदाफुली,गुलाब,चंपा,चमेली अशी होती.या सात ग्रुपनुसार नावीन्यपूर्ण सदाबहार उपक्रम राबवण्यात आले. अंधश्रद्धा निर्मूलन,माणुसकी…

Read More

दिपक मोहिते, महोत्सवात सर्वसाधारण नैपुण्य ढाल वि.वा.चॅरिटेबल ट्रस्टकडे, २६ ते ३१ डिसें.दरम्यान झालेल्या ३५ व्या कला क्रीडा महोत्सवाची सांगता काल नववर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देऊन करण्यात आली. या महोत्सवात सर्वसाधारण नैपुण्य ढाल वि.वा.चॅरिटेबल ट्रस्टला देण्यात आली,तर कला विभागाची विशेष नैपुण्य ढाल विरार येथील एक्सपर्ट इंटरनॅशनल हायस्कुल आणि क्रीडा विभागाची विशेष नैपुण्य ढाल विरारच्या वि.वा.चॅरिटेबल ट्रस्टला देण्यात आली.या महोत्सवात सर्वात जास्त सुवर्ण पदक पटकावणाऱ्या श्रद्धा भोईरला गोल्डन गर्लचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या महोत्सवाची सांगता रात्री १२.०० वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली.त्यावेळी मैदानावर हजारोच्या संख्येने प्रेक्षक नव्या वर्षाच्या स्वागतासाठी उपस्थित होते.१२.०० वाजता फटाक्याच्या आतषबाजीने नवीन वर्षाचे स्वागत करण्यात…

Read More