दिपक मोहिते,
महोत्सवात सर्वसाधारण नैपुण्य ढाल
वि.वा.चॅरिटेबल ट्रस्टकडे,
२६ ते ३१ डिसें.दरम्यान झालेल्या ३५ व्या कला क्रीडा महोत्सवाची सांगता काल नववर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देऊन करण्यात आली.
या महोत्सवात सर्वसाधारण नैपुण्य ढाल
वि.वा.चॅरिटेबल ट्रस्टला देण्यात आली,तर कला विभागाची विशेष नैपुण्य ढाल विरार येथील एक्सपर्ट इंटरनॅशनल हायस्कुल आणि क्रीडा विभागाची विशेष नैपुण्य ढाल विरारच्या वि.वा.चॅरिटेबल ट्रस्टला देण्यात आली.या महोत्सवात सर्वात जास्त सुवर्ण पदक पटकावणाऱ्या श्रद्धा भोईरला गोल्डन गर्लचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
या महोत्सवाची सांगता रात्री १२.०० वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली.त्यावेळी मैदानावर हजारोच्या संख्येने प्रेक्षक नव्या वर्षाच्या स्वागतासाठी उपस्थित होते.१२.०० वाजता फटाक्याच्या आतषबाजीने नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. महोत्सवच्या सांगता समारंभाला माजी आमदार आणि महोत्सवाचे प्रणेते माजी हितेंद्र ठाकूर,क्षितिज ठाकूर,राजेश पाटील, पालिका आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार,माजी खा.बळीराम जाधव,माजी महापौर नारायण मानकर,प्रवीण शेट्टी,प्रकाश वनमाळी उत्कर्षच्या मुख्याध्यापिका मुग्धा लेले आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

