सुरेश काटे,तलासरी,
आशागड येथे सात दिवसीय विशेष निवासी शिबिर संपन्न,
आदिवासी प्रगती मंडळ संचालित कॉ.गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,तलासरी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिर कॉ.शामराव परुळेकर माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आशागड येथे २४ ते ३० डिसें.२०२४,या कालावधीत संपन्न झाले.
या निवासी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य अजितदादा नार्वेकर, कॉ.गोदावरी शामराव परुळेकर वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.ए.राजपूत,तसेच कॉ.शामराव परुळेकर माध्यमिक विद्यालयाचे चे मुख्याध्यापक काकड सर उपस्थित होते.
या निवासी शिबिरात विद्यार्थ्यांचे 7 ग्रुप तयार करण्यात आले.या ग्रुपची नावे सूर्यफूल,मोगरा,जास्वंद, सदाफुली,गुलाब,चंपा,चमेली अशी होती.या सात ग्रुपनुसार नावीन्यपूर्ण सदाबहार उपक्रम राबवण्यात आले.
अंधश्रद्धा निर्मूलन,माणुसकी चोरीला गेली,सायबर क्राईम, झाडे लावा,झाडे जगवा, व्यसनमुक्ती,महिला सुरक्षा समक्षीकरण,हागणदारी मुक्त गाव इ.विषयावर आशागड पंचक्रोशीत पथनाट्य सादर करण्यात आले.या पथनाट्यातून विद्यार्थ्यांनी सामाजिक जनजागृती केली.
विद्यार्थ्यांसाठी दररोज बौद्धिक सत्र आयोजित करण्यात आले होते.यामध्ये पंचायत राज व्यवस्था,करिअर काउन्सलिंग,पॅरा मेडिकल कोर्सेस,एच.आय.व्ही.एड्स जनजागृती,वाचन संस्कृती इ. विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.यातून विद्यार्थ्यांची बौद्धिक जडणघडण तर झालीच त्याचबरोबर विद्यार्थांना जे प्रश्न भेडसावत होती,त्याची उत्तरे उपस्थित मान्यवरांनी दिली.
सोबत रोज सकाळी व्यायाम,योगा,प्रार्थना,रा.से.यो. गीतच्या माध्यमातून शारीरिक व मानसिक सुदृढता विद्यार्थ्यांत रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
रा.से.यो.स्वयंसेवकांनी रोज गावात जाऊन श्रमदान करून श्रमप्रतिष्ठा हे मूल्य स्वत:सहित समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला.शोष खड्डे,कॉलेज परिसराची स्वच्छता,कॉलेज चे ग्राउंड स्वच्छ केले.तसेच गावातील मंदीर परीसर स्वच्छ केला,रस्ते स्वच्छ केले,इ. श्रमदानाची कामे विद्यार्थ्यांनी गावात केली.
कार्यक्रमाच्या समारोपाच्या दिवशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.ए.राजपूत, अजितदादा नार्वेकर,रुपेश राणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.या निवासी शिबिरातून आत्मसात केलेल्या सर्व सवयी विद्यार्थ्यांनी भावी आयुष्यात नियमित ठेवाव्या,असे आवाहन प्राचार्य डॉ.बी.ए.राजपूत यांनी यावेळी केले.
या शिबिरात विद्यार्थ्यांनी स्वयं-शिस्त,वेळेचे व्यवस्थापन,वक्तशीरपणा, सांघीक कार्य,संवाद कौशल्य, गट समन्वय आणि सांस्कृतिक जागरूकता आत्मसात केली. या निवासी शिबिरात एकूण १०० स्वयंसेवक सहभागी झाले होते.प्रा.डॉ.सचिन राऊत आणि प्रा.शेफाली गहला कार्यक्रम अधिकारी यांनी या शिबिराच्या यशस्वितेसाठी विशेष प्रयत्न केले.कॉ. शामराव परुळेकर माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आशागड येथील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.

