वसंत भोईर,वाडा,
पैसे देणारे पीक आहे जवस, तरीही शेतकऱ्यांची पाठ का ?
जवस पीक,हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे तेलबिया पीक म्हणून ओळखले जाते. जवसचा उपयोग तेल काढणे आणि धागा निर्मितीसाठी देखील केला जातो.जवस हे पौष्टिक असून,यातून आठ प्रकारची प्रथिने,कार्बोदके, जीवनसत्वे व खनिजे मिळतात. जवस तेलात ५८ % ओमेगा तीन,ओमेगा सहा, कोलेस्ट्रॉल आणि ऑटी ऑक्सिड असतात.
जवसला बाजारात चांगली मागणी असते.भावही चांगला आहे परंतु वाडा तालुक्यात जवस पीक घेतलं जात नाही. कृषी विभागाकडून तेलबिया पीक लागवडीकडे शेतकऱ्यांना वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.हे पीक घेताना अडचणी येत असल्याने हे पीक शेतकरी तयार नसतात.
विविध ठिकाणी कमी अधिक प्रमाणात दर आढळून येतात.जवस पिकाला दहा ते बारा हजार रु.प्रति क्विंटल इतका दर मिळतो.
तालुक्यात जवसाचे पीक काही शेतकरी घेतात. त्यामुळे या पिकाची पेरणी एकदम अत्यल्प आहे.
जवस उत्पादक शेतकऱ्यांना मळणी यंत्र उपलब्ध होत नाही.एक पद्धतीने खळे करून मळणीचे काम होत होते.मात्र,यामध्ये बैलजोडी आणि मजुरांची गरज भासते.बैलजोडी व मजूर मिळत नाही अशा अडचणीचा सामना करावा लागतो.
-काळूराम पाटील,शेतकरी
उत्पादन अपेक्षित होत नाही जवसाकडे पीक म्हणून बघितले जात नाही. शेतकऱ्यांचा नगदी पीक घेण्याकडे कल असतो.रब्बी हंगामात भाजीपाला,हरभरा, वाल अशी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.
-प्रदीप गोरे, शेतकरी

