- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
वसंत भोईर,वाडा, वाड्यात ” भाजपा सदस्यता,” अभियानाला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद, जगात क्रमांक १, चा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून राज्यभर नव्याने सदस्य नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे.वाड्यात युवा मोर्चाच्या वतीने दोन दिवसापूर्वी ” भाजपा सदस्यता,” अभियानास वाडा येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात प्रारंभ करण्यात आला.या अभियानास तालुक्यातील तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सध्या आपला भारत देश जगासोबत स्पर्धा करत आहे.तसेच विविध क्षेत्रामध्ये प्रगती करत आहे.देशाच्या विकासात युवा वर्गाचा हातभार लागला जात आहे.त्यासाठी युवकांनी मोठ्या संख्येने भाजपात सामील व्हावे,असे आवाहन जेष्ठ नेते बाबाजी काठोळे यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करतांना केले आहे. यावेळी विविध पक्षांतील तरुणांनी मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. याप्रसंगी जेष्ठ नेते…
वसंत भोईर,वाडा, बळीराजाची लूट सुरूच: भराईला पोते नाहीत,साठवणुकीला जागा नाही, तालुक्यात सुरू असलेल्या भातखरेदी केंद्रांना महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास मंडळाच्या उदासीन कारभाराचे ग्रहण लागल्याने भात खरेदीचा पुरता भोजवारा उडाला आहॆ.त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या मनस्ताप सहन करावा लागत आहे. महाराष्ट्राच्या सहकारी आदिवासी विकास महामंडळातर्फे वाडा तालुक्यात परळी,मानिवली,गो-हे, गुहिर, पोशेरी,कोनसई,सारशी,खैरे -आंबिवली येथे भातखरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.परंतु या केंद्रांवर भात भरण्यासाठी लागणारे पोतीच उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना अनेक दिवस हेलपाटे मारून ही भात विक्री करता येत नाही.तसेच या केंद्रावरील कर्मचारी शेतकऱ्यांना उडवा उडवीची उत्तरे देऊन अपमानित करत असल्याच्या अनेक शेतकरी तक्रारी करत आहेत.केंद्रावर भात घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना भाताची प्रतवारी ठरविताना नुकसान सोसावे…
वसंत भोईर,वाडा, अनधिकृत बांधकामांना महसूल विभागाचे अभय, तालुक्यातील घोणसई ग्रामपंचायत हद्दीतील आलमायटी ऑटो कंपनीचे अनधिकृत बांधकामाचे प्रकरण ताजे असतानाच आता वरले ग्रामपंचायत हद्दीतील टिना रबर अँन्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे अनधिकृत बांधकाम देखील चर्चेचा विषय बनला आहॆ.शिवसेनेचे चर्मोद्योग कामगार सेनेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष भरत गायकवाड यांनी हे प्रकरण उघडकीस आणले असून:त्यांनी कंपनीवर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिका-यांकडे एका तक्रारीद्वारे केली आहे. तालुक्यातील वरले ग्रामपंचायत हद्दीत ” टिना रबर अँन्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड,” ही कंपनी आहे.या कंपनीची गट नंबर ७१/२ क्षेत्र ४२ हजार ६०० चौ.मी.व गट नंबर क्षेत्र १० हजार ५५० असे एकूण ५३ हजार १५० चौ.मी.एवढी जागा असून त्यांनी सदरची जागा बिनशेती करून घेतली…
संजय नेवे,विक्रमगड, स्थानिक वाणाचे संवर्धन,या विषयावर शेतकऱ्यांना परिपूर्ण मार्गदर्शन, विक्रमगड तालुक्यातील मौजे-भानपुर येथे आज स्थानिक वाणांचे संवर्धन व कडधान्य पिके/वाल या विषयावर शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. विक्रमगड भागात मोठ्या प्रमाणात पारंपरिक पद्धतीने भातशेती करण्यात येते तसेच रब्बी पिके घेण्यात येतात.या पिकांचे संवर्धन कसे करावे याविषयी आज झालेल्या या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटन आ.हरीचंद्र भोये यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जलताराचे भुमी पुजन करण्यात आले.तसेच स्व. गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदानाचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.पिक स्पर्धा लाभार्थीना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास संदिप पावडे सभापती कृषी व पशू संवर्धन,यशवंत कनोजा सभापती,सरपंच पूनम म्हसकर,प्रमुख मार्गदर्शक भरत कुसारे केव्हिके कोसबाड…
दीपक मोहिते, पालघर तालुक्यात बालचित्रकला स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न, स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वसई विकासिनी दृककला महाविद्यालय,वसई ( पूर्व ) आयोजित बाल चित्रकला स्पर्धा २०२४-२५,काल पालघर येथील आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या म. नी.दांडेकर हायस्कूलमध्ये यशस्वीरित्या पार पडली. स.१०:०० ते दुपारी १२:३० दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत पालघर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा,कर्णबधिर शाळा,अनुदानित व विनाअनुदानित शाळा,केंद्रीय विद्यालय,अशा विविध ५० शाळेतील एकूण ६७५ विद्यार्थी सहभागी झाले होते.या उपक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना कलाक्षेत्रातील करिअरच्या संधींविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.ललित कला विभागाचे वैभव ठाकूर,उपयोजित कलेचे वर्षा गावडे,युटिलिटी अभ्यासक्रमाचे कल्पेश कामत, व इंटिरियर डिझाईनिंग अँड डेकोरेशनचे ध्रुवीन सोनी यांनी स्लाईड शोद्वारे विद्यार्थ्यांसह पालक व कलाशिक्षकांना माहितीपूर्ण…
पीडीटीएस मैदानावर फुटबॉल स्पर्धेचा थरार : स्पर्धेला शानदार सुरुवात, बोईसर संदीप जाधव बोईसरच्या पीडीटीएस मैदानावर फुटबॉलप्रेमींना आजपासून थरारक सामने पाहायला मिळणार आहेत. हार्दिक फाउंडेशनच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या ओपन फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन आज सकाळी बोईसर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिरीष पवार यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील तब्बल १६ संघ सहभागी झाले आहेत.अनेक प्रख्यात खेळाडू आणि चमूचा सहभाग हे या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले आहे. पीडीटीएसच्या मैदानावर पहिल्यांदाच अशा प्रकारच्या ओपन फुटबॉल स्पर्धेचे आयोजन होत असल्याने बोईसरच्या क्रीडाविश्वाचे नाव सर्वत्र दुमदुमत आहे. आज झालेल्या उद्घाटन सोहळ्याला आरती ड्रग्स कंपनीचे मालक उदय पाटील, पालघर जिल्हा नियोजन समिती सदस्य…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” पराभवाला बाप नसतो, विजयाला अनेक बाप असतात,पण पराभव हा कायम पोरका असतो.पराभवातून शहाणपण येत असते,असं म्हंटलं जातं.पण हल्ली पराभवातून शहाणं होण्यास कोणी तयार नाही.विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अनेक राजकीय पक्षात सध्या जे काही घडत आहे,ते पाहता पराभवाला बाप नसतो,हेच खरं असंच म्हणावं लागेल.सेनेचे राजापूर विधानसभेचे पराभूत उमेदवार राजन साळवी व उद्धव ठाकरे या दोघांमध्ये रंगलेला कलगीतुरा खूप काही सांगून गेला.साळवी यांनी आपल्या पराभवाची कारणमिमांसा करताना, ” माझ्या पराभवाला संजय राऊत व माजी खासदार विनायक राऊत,हे दोघे जबाबदार, ” असल्याचा आरोप केला.त्यानंतर साळवी व ठाकरे या दोघांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला.झालेल्या पराभवाची जबाबदारी,ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी समजून प्रत्येकाने…
जव्हार प्रतिनिधी, स्वच्छता अभियानावरील नाटिकेने खोच शिक्षण परिषदेत भरला रंग, जिल्हा परिषद शाळा नवीवाडी येथे नुकत्याच पार पडलेल्या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानावर सादर केलेली नाटिका उपस्थितांचे मन जिंकून बक्षीस मिळवण्यात यशस्वी ठरली.या नाटिकेसाठी शाळेचे मुख्याध्यापक नितिन आहेर आणि सहकारी शिक्षिका यांनी विशेष मेहनत घेतली.परिषदेसाठी तयार करण्यात आलेल्या प्रसन्न वातावरणाचे विविध स्तरांतून कौतुक झाले. केंद्रप्रमुख दिलीप आवारी, विषयतज्ञ जाधव,दत्ता घोडके, प्रकाश पाटील,दिपक तांदळे,जयराम वाघ आणि प्रमुख पाहुणे आपा तुमडे यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक करत त्यांना बक्षीस प्रदान केले.शाळा तयारीचे देखिल शिक्षकांनी कौतुक केले. कार्यक्रमादरम्यान,चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे “सावित्रीबाई फुले” आणि ” पाणी,” या विषयांवर प्रभावी भाषण सादर…
जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे शिव छत्रपती समाज सेवा मंडळाचा ४१ वा वर्धापनदिन साजरा, वाडा,जव्हार, मोखाडा,विक्रमगड, डहाणू, शहापूर तालुक्याच्या दुर्गम भागातील आदिवासी लोकांसाठी निस्वार्थपणे गेली ४० वर्षे सामाजिक व शैक्षणिक,सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या शिवछत्रपती समाज सेवा मंडळाचा ४१ वा वर्धापन दिन व संस्थापक पुरुषोत्तम पाटील यांचा ७४ वा वाढदिवस मोखाडा,जव्हार, भिवंडी,वसई भागात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. मोखाडा तालुक्यातील महात्मा ज्योतिबा फुले आश्रमशाळा आशे येथे ४३५ विद्यार्थ्यांना मैत्री फाउंडेशन बोरीवलीतर्फे ब्लॅंकेट,बेडशीट,कंपास, मिठाई वाटप करून पुरुषोत्तम पाटील यांचा आश्रमशाळेतर्फे वाढदिवस साजरा करण्यात आला.तसेच जव्हार दुर्गम भागातील कर्मवीर भाऊराव पाटील आश्रमशाळा वावर वांगणी येथील ४२६ आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मंडळातर्फे अन्नदान मैत्री फाउंडेशन तर्फे ब्लॅंकेट,चादर,…
जव्हार प्रतिनिधी, भारती विद्यापीठ इंग्रजी माध्यम शाळा,जव्हार येथे ” सावित्री उत्सव,” साजरा. नव्या वर्षातील पहिला उत्सव म्हणून ३ जाने.रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस ” सावित्री उत्सव,” म्हणून भारती विद्यापीठ इंग्रजी माध्यम शाळा जव्हार,येथे उत्साहात साजरा करण्यात आला.शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम यांच्या सूचनांचे पालन करीत हा नवीन उपक्रम महान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती करून देण्यासाठी येणाऱ्या पिढीतील मुला-मुलींकरिता महत्वपूर्ण ठरत आहे. या कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक अर्जुनकुमार राठोड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली.या कार्यक्रमांमध्ये शाळेतील विद्यार्थिनीं सहभागी झाल्या होत्या.यावेळी प्रत्येक विद्यार्थिनींने आपल्या कपाळावरती सावित्रीबाई फुले यांच्या…
