संजय नेवे,विक्रमगड,
स्थानिक वाणाचे संवर्धन,या विषयावर शेतकऱ्यांना परिपूर्ण मार्गदर्शन,
विक्रमगड तालुक्यातील मौजे-भानपुर येथे आज स्थानिक वाणांचे संवर्धन व कडधान्य पिके/वाल या विषयावर शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला.
विक्रमगड भागात मोठ्या प्रमाणात पारंपरिक पद्धतीने भातशेती करण्यात येते तसेच रब्बी पिके घेण्यात येतात.या पिकांचे संवर्धन कसे करावे याविषयी आज झालेल्या या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटन आ.हरीचंद्र भोये यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जलताराचे भुमी पुजन करण्यात आले.तसेच स्व. गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदानाचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.पिक स्पर्धा लाभार्थीना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास संदिप पावडे सभापती कृषी व पशू संवर्धन,यशवंत कनोजा सभापती,सरपंच पूनम म्हसकर,प्रमुख मार्गदर्शक भरत कुसारे केव्हिके कोसबाड सांबर कृषी सहाय्यक बुंधे , सुरेश गावित,टोकरे मॅडम कुऱ्हाडा आदी मान्यवर उपस्थित होते.

