जव्हार प्रतिनिधी,
स्वच्छता अभियानावरील नाटिकेने खोच शिक्षण परिषदेत भरला रंग,
जिल्हा परिषद शाळा नवीवाडी येथे नुकत्याच पार पडलेल्या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानावर सादर केलेली नाटिका उपस्थितांचे मन जिंकून बक्षीस मिळवण्यात यशस्वी ठरली.या नाटिकेसाठी शाळेचे मुख्याध्यापक नितिन आहेर आणि सहकारी शिक्षिका यांनी विशेष मेहनत घेतली.परिषदेसाठी तयार करण्यात आलेल्या प्रसन्न वातावरणाचे विविध स्तरांतून कौतुक झाले. केंद्रप्रमुख दिलीप आवारी, विषयतज्ञ जाधव,दत्ता घोडके, प्रकाश पाटील,दिपक तांदळे,जयराम वाघ आणि प्रमुख पाहुणे आपा तुमडे यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक करत त्यांना बक्षीस प्रदान केले.शाळा तयारीचे देखिल शिक्षकांनी कौतुक केले.
कार्यक्रमादरम्यान,चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे “सावित्रीबाई फुले” आणि ” पाणी,” या विषयांवर प्रभावी भाषण सादर करून उपस्थित शिक्षकांची दाद मिळवली.त्यानंतर जिल्हास्तरीय नियोजनाच्या अनुषंगाने गटशिक्षणाधिकारी वसंत महाले यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र प्रमुख दिलीप आवारी यांनी विविध विषयांवर सखोल चर्चा करत विस्तृत माहिती दिली.यामध्ये विषय कामकाज पत्रिका वाचन,स्कूल सेफ्टी व सुरक्षा प्रशिक्षण,हॅकथॉन व रंगोत्सव उपक्रम नोंदणी,यू-डायस प्लस,अपार आयडी,आणि सर्व प्रणालींवरील अद्ययावत माहिती यांचा समावेश होता.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप आवारी यांनी केले, सूत्रसंचालन नितिन आहेर यांनी केले,तर आभार प्रदर्शन दत्ता घोडके यांनी मानले.यावेळी ज्योती नाथ जाधव,शिक्षण प्रेमी आपा तुमडे,मंजुळा तुमडे,भास्कर तुमडे आदि उपस्थित होते.

