- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
अनिल वैद्य,नाशिक, शिल्प समागम मेळाव्याच्या माध्यमातून कारागीरांना मिळतेय उभारी-आठवले केंद्र शासन व सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या माध्यमातून प्रत्येक राज्यातील शहरांमध्ये शिल्प समागम मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे.या प्रदर्शनाच्या माध्यमातून अनुसूचित जाती, स्वच्छता मित्र कर्मचारी, विमुक्त जमती व मागासवर्गीय प्रवर्गातील करागीरांना रोजगार मिळून त्यांनी तयार केलेल्या उत्पादित मालाला हक्काची बाजारपेठ मिळून त्यांच्या कलात्मक गुणांना उभारी मिळत आहे,असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. आज शहरातील डोंगरे वसतिगृह मैदानात शिल्प समागम मेळावा २०२५ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नॅशनल सफाई कर्मचारी फायनान्स ॲण्ड डेव्हलमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य व्यवस्थापक सुरेश कुमार व अधिकारी उपस्थित होते.केंद्रीय सामाजिक…
तीन दिवसीय एआय आणि रोबोटिक्स कार्यशाळेचे आयोजन, बीएमसीडब्ल्यूएसच्या सहकार्याने तीन दिवसीय एआय आणि रोबोटिक्स वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले.सदर कार्यक्रम एसटी/एससी जमातीतील मागासलेल्या वर्गासाठी आयोजित करण्यात आला होता.पहिल्या सत्रांचे आयोजन आयटीआय तलासरी येथे श्रीमती शाल्मली पाटील (राऊत) यांच्या सहकार्याने पार पडला.पुढील कार्यक्रम आयटीआय विक्रमगड आणि वाडा तालुक्यातही करण्यात येणार आहेत. ही कार्यशाळा इस्रो प्रमाणित प्रशिक्षक यांनी आयोजित केली आणि आयआयटी दिल्ली यांच्या सहकार्याने पार पडला.विद्यार्थ्यांना रोबोटिक्स प्रकल्पांवर प्रत्यक्ष अनुभव घेता आला.या कार्यक्रमांतर्गत पालघर जिल्ह्यातील ५०० हुन विद्यार्थी सहभागी झाले होते.
दीपक मोहीते, ” पालकमंत्रीपदाचे गौडबंगाल, ” पालकमंत्रीपदासाठी मंत्र्यांच्या हाणामाऱ्या कशासाठी ? नेमकं काय दडलंय या पदामध्ये ? गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून जीवघेण्या हाणामाऱ्या सुरू आहेत.या पालकमंत्रीपदात असं काय दडलंय आहे ? ज्यासाठी मंत्री व पक्षाचे ज्येष्ठ नेते एकमेकांच्या उरावर बसत आहेत.चला खोलात शिरून पाहूया,नेमकं काय दडलंय ते…. पालकमंत्री म्हणजे एका जिल्ह्याचा मुख्यमंत्री, जिल्हा विकास नियोजन समितीला मिळणाऱ्या निधीची विल्हेवाट लावण्याचा ठेका,या पालकमंत्रीकडे असतो.हे पद मिळाले की चारी बाजूने पैश्याचा ओघ सुरू होतो.एक पालकमंत्री वर्षभरात कमीतकमी १०० कोटींची माया कमवू शकतो.जिल्हा विकास नियोजन समिती म्हणजे निधी वाटपाचे दुकान असते.ठराविक टक्के द्या आणि आपल्या तालुक्यासाठी निधी मिळवा.मिळालेला निधी कामासाठी वापरा…
संजय नेवे,विक्रमगड, विक्रमगड येथे रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत संवाद अभियान संपन्न, पालघर जिल्यांचे पोलिस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतुन पोलिस व जनतेशी संवाद साधता यावा हा दृष्टीकोन समोर ठेवुन जनसंवाद अभियान अंतर्गत पालघर जिल्हा पोलिस दल जिल्हा वाहतुक शाखा व विक्रमगड पोलिस कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त विक्रमगड येथे जनसंवाद मेळाव्याचे आज आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे उपस्थित होते. रस्त्यावर अपघात का व कसे होतात,याला कोण जबाबदार आहे ? त्यामुळे सुरक्षितरित्या वाहन चालवा व वाहतुकीचे काटेकोर पालन करा,असे आवाहन यावेळी पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे यांनी केले.तसेच पालघर जिल्ह्यात…
नवीन पाटील,सफाळे इअरफोनचे वेड विद्यार्थीनीच्या जीवावर बेतले… कॉलेज तसेच शाळकरी तरुण तरुणींमध्ये इअरफोनच्या सहाय्याने गाणी ऐकणे किंवा कॉलवर तासनतास बोलणे,हे फॅड मोठ्याप्रमाणात वाढले असून आता ते त्यांच्या जीववर बेतू लागले आहे. पश्चिम रेल्वेच्या सफाळे स्थानकाजवळ असलेल्या रेल्वे फाटकात कानाला इअरफोन लावून फाटक ओलांडणाऱ्या एका विद्यार्थिनीला रेल्वेएक्सप्रेसची धडक बसून आपले प्राण गमवावे लागले. वैष्णवी रावल राहणार माकणे,सफाळे ( पश्चिम ) असे या मयत विद्यार्थिनीचे नाव आहे.वैष्णवी ही सफाळे येथील इंग्लिश माध्यमाच्या शाळेत इयत्ता नववीमध्ये शिकत होती.काल दुपारी एक ते दीडच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे माकणे येथून सफाळे येथील ट्यूशनमध्ये जाण्यास निघाली.कानात इअरफोन घालून ती सफाळे स्थानकाजवळ असलेल्या बंद रेल्वे फाटक ओलांडत असताना…
दिपक मोहिते, ” हल्लाबोल २,” बाळासाहेबांच्या विचारांचे मारक,आता त्यांचे स्मारक बांधायला निघाले आहेत – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जे लोक बाळासाहेबांच्या विचाराचे मारक आहेत,ते बाळासाहेबांचे स्मारक काय बांधणार ? अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला.ते वांद्रे येथे बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त झालेल्या जाहीर सभेत बोलत होते. त्यांच्या या जाहीर सभेपुर्वी शिवसेना ( उबाठा ) यांची अंधेरी येथे झाली.या जाहीर सभेत,पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे व अमित शहा यांच्यावर जहरी टीका केली.त्यानंतर शिंदे यांनी आपल्या जाहीर सभेत त्याचा समाचार घेतला.यावेळी पलटवार करताना शिंदे म्हणाले,ज्यांनी बाळासाहेबांचे विचार व अस्मिता सोडली,अशा लोकांनी आम्हाला शिकवू नये,आम्ही घरात बसून राजकारण केले नाही.गेल्या…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” गद्दाराची अवस्था,” रुसूबाई रुसू,कोपऱ्यात जाऊन बसू,”- उद्धव ठाकरे, काल बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने मुंबईत शिवसेनेचे दोन मेळावे पार पडले.या मेळाव्यात उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर चिखलफेक करत स्थानिक स्वराज्य समितीच्या निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले.यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले.त्यामुळे महाविकास आघाडी किती काळ टिकेल,याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. काल अंधेरी येथे शिवसेना ( उबाठा ) व वांद्रे येथे शिवसेनेची ( एकनाथ शिंदे ) जाहीर सभा झाल्या.या सभेत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अफझलखान म्हणून संभावना करत मातीत तुम्हाला गाडून टाकू,असा घणाघाती…
संजय लांडगे, वाडा, वाड्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त फळ वाटप व रक्तदान शिबीर, हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त वाड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना (उबाठा) वाडा तालुका व शहर शाखेच्या वतीने आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त वाडा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळं वाटप करण्यात आले. तर पालघर जिल्हा उपप्रमुख प्रकाश केणी यांच्या निवासस्थानी आयोजीत कार्यक्रमात ज्योती ठाकरे, निलेश गंधे,भास्कर दळवी, वर्षा गोळे,डी.बि.पाटील आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पाटील, यांनी केले. तसेच कुडूस विभागात शिवसेनेचे ( उबाठा ) गोविंद पाटील यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिरात ५६ हून अधिक तरुणांनी रक्तदान केले.
सुरेश काटे,तलासरी, तलासरीत रंगल्या कब्बडी स्पर्धा, जनसवांद अभियान अंतर्गत,तलासरी पोलिस स्टेशन आणि तलासरी तालुका इंडस्ट्रिज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरीय कब्बडी स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या असून या कब्बडी स्पर्धाचे उदघाटन आ.विनोद निकोले यांनी केले आणि सुरुवातीच्या सामन्यात एका बाजूने कब्बडी सर्व्हिस टाकून आ. विनोद निकोले यांनी कब्बडी मधील आपले नैपून्य दाखवून दिले.यावेळी तलासरी तालुका इडस्ट्रिअल असो.अध्यक्ष अजित नार्वेकर,नगराधक्ष सुरेश भोये, उपनगराध्यक्ष सुभाष दुमाडा,पोलीस निरीक्षक विजय मूतडक,तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच या आयोजित कब्बडी स्पर्धाना विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. क्रीडा गुणांना वाव मिळावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या कब्बडी…
अविनाश मढवी,नालासोपारा, ४१ अनधिकृत इमारतीवर कारवाई : आज दिवसभरात, ७ इमारती जमीनदोस्त, नालासोपारा येथे आज २०० कुटुंबांनी आपली घरे गमावली,मनपाच्या अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने बुलडोझरच्या साहाय्याने बेकायदेशीर इमारती पाडल्या. नालासोपारा येथे आज ३४ बेकायदेशीर बांधकामे पाडण्यात येत आहेत.ही कारवाई मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात येत आहे.प्रशासनाने आज बेकायदेशीर बांधकाम हटवताना सुरक्षा राखण्यासाठी ४०० हून अधिक पोलिस तैनात केले आहेत.या कारवाईनंतर,या वसाहतीत अनेक वर्षांपासून राहणारी सुमारे २०० कुटुंबे बेघर होण्याची शक्यता आहे. वसई-विरार महानगरपालिकेने या ३४ इमारतींमधील रहिवाशांना २२ जाने.२०२५ पर्यंत घरे रिकामी करण्याची नोटीसही बजावली होती. नालासोपारा पूर्वेस लक्ष्मी नगर,अग्रवाल नगरी येथे डंपिंग ग्राउंड आणि एसटीपी प्लांटसाठी राखीव असलेल्या जमिनीवर…
