दिपक मोहिते,
” हल्लाबोल २,”
बाळासाहेबांच्या विचारांचे मारक,आता त्यांचे स्मारक बांधायला निघाले आहेत – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,
जे लोक बाळासाहेबांच्या विचाराचे मारक आहेत,ते बाळासाहेबांचे स्मारक काय बांधणार ? अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला.ते वांद्रे येथे बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त झालेल्या जाहीर सभेत बोलत होते.
त्यांच्या या जाहीर सभेपुर्वी शिवसेना ( उबाठा ) यांची अंधेरी येथे झाली.या जाहीर सभेत,पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे व अमित शहा यांच्यावर जहरी टीका केली.त्यानंतर शिंदे यांनी आपल्या जाहीर सभेत त्याचा समाचार घेतला.यावेळी पलटवार करताना शिंदे म्हणाले,ज्यांनी बाळासाहेबांचे विचार व अस्मिता सोडली,अशा लोकांनी आम्हाला शिकवू नये,आम्ही घरात बसून राजकारण केले नाही.गेल्या अडीच वर्षात आमच्या सरकारने जी कामे केली,ती लक्षात घेऊन लोकांनी आम्हाला भरभरून मॅडेट दिले.आम्हाला खुर्चीपेक्षा स्वाभिमान महत्वाचा आहे.तो स्वाभिमान आम्ही जपला,सत्तेला लाथ मारून आम्ही बाहेर पडलो.
गेल्या अडीच वर्षात मी राजकारण हा समाजकारणाचा एक भाग समजून काम केले.आज बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर त्यांनी आपली पाठ थोपटली असती.खुर्चीसाठी त्यांचे विचार सोडणाऱ्याची काय अवस्था झाली आहे.” सांगता येत नाही,आणि सांगताही येत नाही,” ना घरका,ना घटका,” अशी त्यांची परीस्थिती झाली आहे.आता ते लोक स्वबळावर निवडणुका लढण्याचे सांगत आहे.पण त्यासाठी मनगटात ताकद असावी लागते.” कंबरेचे सोडून,आता डोक्याला गुंडाळले आहे,” न्यायालय व निवडणूक आयोग यांनी शिवसेना व धनुष्यबाण आपल्याकडे सोपवले आहे.याच लोकांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत फेक नॅरेटिव्ह पसरवून विजय मिळवला पण विधानसभा निवडणुकीत लोकांनी त्यांना योग्य ती जागा दाखवली.आपल्या सरकारने गेल्या अडीच वर्षात अनेक विकासाभिमुख योजना राबवल्या,लाडक्या बहीण योजनेने महिलांना दिलासा मिळाला,त्या आमच्या भगिनी विधानसभा निवडणुकीत आपल्या पाठीशी उभ्या राहिल्या.जे लोक बाळासाहेबांच्या विचाराचे मारक आहेत,ते आता बाळासाहेबांचे स्मारक बांधायला निघाले आहेत, ते काय बांधणार स्मारक ? असा सवाल करत शिंदे यांनी आपली जबाबदारी वाढली आहे,त्यादृष्टीने आपण सर्वांनी कामाला लागले पाहिजे,असे आवाहन शिवसैनिकाना केले.

