अविनाश मढवी,नालासोपारा,
४१ अनधिकृत इमारतीवर कारवाई : आज दिवसभरात, ७ इमारती जमीनदोस्त,
नालासोपारा येथे आज २०० कुटुंबांनी आपली घरे गमावली,मनपाच्या अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने बुलडोझरच्या साहाय्याने बेकायदेशीर इमारती पाडल्या.
नालासोपारा येथे आज ३४ बेकायदेशीर बांधकामे पाडण्यात येत आहेत.ही कारवाई मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात येत आहे.प्रशासनाने आज बेकायदेशीर बांधकाम हटवताना सुरक्षा राखण्यासाठी ४०० हून अधिक पोलिस तैनात केले आहेत.या कारवाईनंतर,या वसाहतीत अनेक वर्षांपासून राहणारी सुमारे २०० कुटुंबे बेघर होण्याची शक्यता आहे. वसई-विरार महानगरपालिकेने या ३४ इमारतींमधील रहिवाशांना २२ जाने.२०२५ पर्यंत घरे रिकामी करण्याची नोटीसही बजावली होती.
नालासोपारा पूर्वेस लक्ष्मी नगर,अग्रवाल नगरी येथे डंपिंग ग्राउंड आणि एसटीपी प्लांटसाठी राखीव असलेल्या जमिनीवर ४१ बेकायदेशीर इमारती बांधण्यात आल्या होत्या.मुंबई उच्च न्यायालयाने या इमारती बेकायदेशीर घोषित केल्या होत्या आणि त्या पाडण्याचे आदेश दिले होते.यापूर्वी ७ बेकायदेशीर इमारती पाडण्यात आल्या.या कारवाईत ५० हून अधिक कुटुंबे बेघर झाली.
यापैकी काही इमारती अत्यंत जीर्ण झाल्या होत्या.गेल्या वर्षी नोव्हें.२०२४ मध्ये, वसई-विरार महानगरपालिकेने यापैकी ७ इमारती पाडल्या होत्या.तथापि,उर्वरित ३४ इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांनी कारवाईच्या निषेधार्थ आपली घरे रिकामी केली नाहीत.त्यामुळे त्यानंतर कारवाई थांबवण्यात आली.
न्यायालयाने ३१ जाने.पर्यंत केलेल्या कारवाईचा अहवालही महापालिकेकडून मागितला आहे.अशा परिस्थितीत,या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी,महापालिकेने आधीच पोलिस प्रशासनाकडून कारवाईसाठी पोलिस बळ मागवले होते.सदर पाडकामाची कारवाई सलग होणार आहॆ.प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही गेले होते,परंतु दुर्देवाने तेथेही त्यांची निराशा झाली.

