सुरेश काटे,तलासरी,
तलासरीत रंगल्या कब्बडी स्पर्धा,
जनसवांद अभियान अंतर्गत,तलासरी पोलिस स्टेशन आणि तलासरी तालुका इंडस्ट्रिज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरीय कब्बडी स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या असून या कब्बडी स्पर्धाचे उदघाटन आ.विनोद निकोले यांनी केले आणि सुरुवातीच्या सामन्यात एका बाजूने कब्बडी सर्व्हिस टाकून आ. विनोद निकोले यांनी कब्बडी मधील आपले नैपून्य दाखवून दिले.यावेळी तलासरी तालुका इडस्ट्रिअल असो.अध्यक्ष अजित नार्वेकर,नगराधक्ष सुरेश भोये, उपनगराध्यक्ष सुभाष दुमाडा,पोलीस निरीक्षक विजय मूतडक,तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते
तसेच या आयोजित कब्बडी स्पर्धाना विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
क्रीडा गुणांना वाव मिळावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या कब्बडी स्पर्धा मध्ये पालघर जिल्ह्यातील सोळा संघ सहभागी झाले होते.

