संजय नेवे,विक्रमगड,
विक्रमगड येथे रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत संवाद अभियान संपन्न,
पालघर जिल्यांचे पोलिस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतुन पोलिस व जनतेशी संवाद साधता यावा हा दृष्टीकोन समोर ठेवुन जनसंवाद अभियान अंतर्गत पालघर जिल्हा पोलिस दल जिल्हा वाहतुक शाखा व विक्रमगड पोलिस कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त विक्रमगड येथे जनसंवाद मेळाव्याचे आज आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे उपस्थित होते.
रस्त्यावर अपघात का व कसे होतात,याला कोण जबाबदार आहे ? त्यामुळे सुरक्षितरित्या वाहन चालवा व वाहतुकीचे काटेकोर पालन करा,असे आवाहन यावेळी पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे यांनी केले.तसेच पालघर जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हेगारी वाढली असून सायबर गुन्हेगारी टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचे त्यांनी आवाहन केले.या कार्यक्रमांमध्ये हेल्मेटचे वाटप करण्यात आले.
तसेच आरोग्य शिबीर व शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी,पोलिस व जनतेमध्ये रस्त अपघात बाल विवाह प्रतिबंध सायबर क्राईम,महिला विषयक कायदे,कुपोषण व अंधश्रध्दा निर्मुलन आदी विषयांवर जनजागृती करण्याकरीता पालघर जिल्ह्यातील युट्युब कलाकरांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
गणपत पिंगळे उपविभागीय पोलिस अधिकारी जव्हार, विनायक नरळे अप्पर पोलिस निरिक्षक प्रभारी अधिकारी वाहतुक शाखा पालघर आदी मान्यवर उपस्थित होते.

