अनिल वैद्य,नाशिक,
शिल्प समागम मेळाव्याच्या माध्यमातून कारागीरांना मिळतेय उभारी-आठवले
केंद्र शासन व सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या माध्यमातून प्रत्येक राज्यातील शहरांमध्ये शिल्प समागम मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे.या प्रदर्शनाच्या माध्यमातून अनुसूचित जाती, स्वच्छता मित्र कर्मचारी, विमुक्त जमती व मागासवर्गीय प्रवर्गातील करागीरांना रोजगार मिळून त्यांनी तयार केलेल्या उत्पादित मालाला हक्काची बाजारपेठ मिळून त्यांच्या कलात्मक गुणांना उभारी मिळत आहे,असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
आज शहरातील डोंगरे वसतिगृह मैदानात शिल्प समागम मेळावा २०२५ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी नॅशनल सफाई कर्मचारी फायनान्स ॲण्ड डेव्हलमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य व्यवस्थापक सुरेश कुमार व अधिकारी उपस्थित होते.केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, शिल्प समागम मेळा प्रदर्शनात एकूण १०० स्टॉल्स लावण्यात आले आहेत.या मेळ्यात आसाम,बिहार,गुजरात, हरियाणा,कर्नाटक, केरळ,मध्यप्रदेश,राजस्थान, उत्तरप्रदेश व महाराष्ट्र या दहा राज्यातील कारगीर,हे त्यांनी तयार केलेल्या अनेक गृहपयोगी व कलाकुसरीच्या वस्तू विकण्यासाठी आले आहेत.नाशिककरांनी या मेळाव्यास कुटुंबासह भेट द्यावी,असे आवाहन सामाजिक न्यायमंत्री आठवले यांनी केले.
ते पुढे म्हणाले,केंद्र शासनाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठीही अशा प्रदर्शन मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे.अनुसूचित जाती,स्वच्छता मित्र कर्मचारी,विमुक्त जमाती व मागासवर्गीय प्रवर्गासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहे.त्यांच्या मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे, स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून आपले ध्येय गाठावे,असे मार्गदर्शन केंद्रीय मंत्री आठवले यांनी केले.
यावेळी सामूहिक न्यृत्य व गायन,अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादकरीकरण झाले.

