तीन दिवसीय एआय आणि रोबोटिक्स कार्यशाळेचे आयोजन,
बीएमसीडब्ल्यूएसच्या सहकार्याने तीन दिवसीय एआय आणि रोबोटिक्स वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले.सदर कार्यक्रम एसटी/एससी जमातीतील मागासलेल्या वर्गासाठी आयोजित करण्यात आला होता.पहिल्या सत्रांचे आयोजन आयटीआय तलासरी येथे श्रीमती शाल्मली पाटील (राऊत) यांच्या सहकार्याने पार पडला.पुढील कार्यक्रम आयटीआय विक्रमगड आणि वाडा तालुक्यातही करण्यात येणार आहेत.
ही कार्यशाळा इस्रो प्रमाणित प्रशिक्षक यांनी आयोजित केली आणि आयआयटी दिल्ली यांच्या सहकार्याने पार पडला.विद्यार्थ्यांना रोबोटिक्स प्रकल्पांवर प्रत्यक्ष अनुभव घेता आला.या कार्यक्रमांतर्गत पालघर जिल्ह्यातील ५०० हुन विद्यार्थी सहभागी झाले होते.

