संजय लांडगे, वाडा,
वाड्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त फळ वाटप व रक्तदान शिबीर,
हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त वाड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शिवसेना (उबाठा) वाडा तालुका व शहर शाखेच्या वतीने आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त वाडा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळं वाटप करण्यात आले. तर पालघर जिल्हा उपप्रमुख प्रकाश केणी यांच्या निवासस्थानी आयोजीत कार्यक्रमात ज्योती ठाकरे, निलेश गंधे,भास्कर दळवी, वर्षा गोळे,डी.बि.पाटील आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पाटील, यांनी केले.
तसेच कुडूस विभागात शिवसेनेचे ( उबाठा ) गोविंद पाटील यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिरात ५६ हून अधिक तरुणांनी रक्तदान केले.

