दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
गद्दाराची अवस्था,” रुसूबाई रुसू,कोपऱ्यात जाऊन बसू,”- उद्धव ठाकरे,
काल बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने मुंबईत शिवसेनेचे दोन मेळावे पार पडले.या मेळाव्यात उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर चिखलफेक करत स्थानिक स्वराज्य समितीच्या निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले.यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले.त्यामुळे महाविकास आघाडी किती काळ टिकेल,याविषयी साशंकता निर्माण झाली आहे.
काल अंधेरी येथे शिवसेना ( उबाठा ) व वांद्रे येथे शिवसेनेची ( एकनाथ शिंदे ) जाहीर सभा झाल्या.या सभेत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अफझलखान म्हणून संभावना करत मातीत तुम्हाला गाडून टाकू,असा घणाघाती हल्ला चढवला.आमच्या पाठीत सुरा भोसकला तर आम्ही वाघनखे बाहेर काढू.तुमच्याकडून आम्हाला हिंदुत्व शिकायची गरज नाही.बाबरी पडल्यानंतर माफी कोणी मागितली,बाबरी पाडणे,ही मोठी चूक होती,असे कोण म्हणाले,याची अमित शहा शहानिशा करा.आम्ही पळपुटेपणा करणारे नाहीत.त्यामुळे तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू नका,असा सज्जड दम दिला.ते पुढे म्हणाले,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्यासाठी शिवसैनिकांचा माझ्यावर प्रचंड दबाव येत आहे.पण हा निर्णय माझ्या शिवसैनिकांनी घ्यायचा आहे.ज्या दिवशी माझी खात्री होईल,की आपले शिवसैनिक या अफझलखानाला रोखू शकतात,त्यादिवशी मी नक्की याविषयी निर्णय घेईन.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडताना ते म्हणाले,आज या गद्दाराची अवस्था कशी झाली आहे बघा,मुख्यमंत्रीपद मिळाले नाही,” चला गावाला,” मंत्रिमंडळात योग्य वाटा मिळाला नाही,” चला गावाला,” चांगली खाती मिळाली नाहीत,” चला गावाला,” पालकमंत्री वाटपात आपल्यावर अन्याय झाला,” चला गावाला ” असे हे या गद्दाराचे ” चला गावाला,” अस सतत सुरू आहे.या गद्दाराची अवस्था सध्या ” रुसू बाई रुसू,कोपऱ्यात जाऊन बसू आणि डोळ्यात आंसू,” अशी झाली आहे.ज्या गद्दारानी आपल्या आईच्या कुशीवर वार केले,त्यांना कदापि माफ करू नका.अमित शहाजी तुम्हाला महाराष्ट्र कदापि काबीज करता येणार नाही.पैश्याच्या बळावर तुम्ही खरेदी कराल,पण हा सह्याद्री दिल्लीच्या मदतीला धावून जाणारा आहे,पण गद्दाराना सोबत घेऊन तुम्हाला महाराष्ट्र ताब्यात घेता आला.पण तो तुम्हाला स्वतःच्या ताकदीवर कधीही ताब्यात घेता येणार नाही.

