- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर : खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार….
- ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज,
- भारतीय संविधानाचे देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान,
- मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात,
- प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक….
- अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली,
- ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार, कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता,
- कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,
Author: दीपक मोहिते
सुरेश काटे, तलासरी, तलासरीत मिनी मॅरेथॉन २०२५,स्पर्धेचे आयोजन, दरवर्षी 3 ऑगस्ट रोजी आदिवासी प्रगती मंडळ तलासरी,आयोजित कॉ.शामराव परुळेकर स्मृती प्रित्यर्थ मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन काल करण्यात आले होते.या स्पर्धेचे यंदाचे हे १२ वे वर्ष आहे. या स्पर्धेत संस्थेच्या सर्व शाखांमधून एकूण ३४० विद्यार्थी सहभागी झाले होते. ही मिनी मॅरेथॉन प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक व वरिष्ठ महाविद्यालयात अशा ४ गटात घेण्यात आली. मॅरेथॉनचे उद्घाटन आ.विनोद निकोले,नगराध्यक्ष सुरेश भोये व रावजी कुऱ्हाडा यांच्या हस्ते कॉ.शामराव परुळेकर,कॉ. गोदावरी परुळेकर व स्व.कॉ.लहानू कोम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. स्पर्धेत सहभागी स्पर्धक विद्यार्थ्यांना आ.विनोद निकोले यांनी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी प्राचार्य डॉ.बी.ए. राजपूत,संदीप वावरे व सर्व…
वाड्यात आठवडाभर पावसाची दांडी,शेतकरी चिंतेत, वाड्यात गेल्या आठवड्या पासून पावसाने दांडी मारली असून भात लागवड केलेली शेतजमिनी सध्या कोरड्या पडल्या आहेत.शेतजमीन पावसाअभावी सुकून भेगा पडून रोपाची मुळं तुटण्याची भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत. भात लागवड केल्याच्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाल्यामुळे शेतजमिनी पूर्णतः सुकून तडकू लागल्या आहेत.भातरोपे कोमजून गेली आहेत.याचा विपरित परिणाम भात पिकावर होण्याची शक्यता आहे.पाऊस काही दिवसात पडला नाही,तर भातशेतीचे मोठे नुकसान होईल अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. वाडा तालुक्यात सध्या गरवी भातशेतीच्या तुलनेत हळवार भातशेती मोठ्या प्रमाणात करण्यात येते.यात मोठे क्षेत्र वनपट्ट्यात येत असून रानमाळासह डोंगरदऱ्यातही मोठ्या प्रमाणावर हलवार भातपिकाची लागवड केली जाते.हलवार शेतजमीन ही पावसावर…
दीपक मोहिते, ” विध्वंस,” भाग क्र.२, त्यावेळी कटकारस्थाने झाली नसती तर आज हिरवीगार वसई पाहायला मिळाली असती…. त्यावेळी तयार करण्यात आलेला प्राधिकरणाचा विकास आराखडा काही आर्किटेक्टस यांनी मिळवला,त्यातील तरतुदीचा बारकाईने अभ्यास केला.हा विकास आराखडा वसई/विरार उपप्रदेशाला हानिकारक असल्याचे त्यांचे ठाम मत बनले.प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी उपप्रदेशाची भौगोलीक रचना लक्षात न घेता तसेच वातानुकूलित कार्यालयात बसून तयार केला होता.तसा आरोप देखील अनेक सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळी केला होता.सरकारने या आराखड्यात चांगलीच हातचलाखी करत बराचसा हिरवा भाग घरबांधणीसाठी मोकळा करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले. हा विकास आराखडा बिल्डरधार्जिणा असल्याचा आरोप अनेक सामाजिक संघटनांनी केला,त्यानंतर वसईकर नागरीकामध्ये असंतोष खदखदू लागला. पाणी,सांडपाणी निचरा, मल:निसारण,डंपिंग ग्राउंड,प्रशस्त रस्ते,इ.पायाभूत…
सुरेश काटे,तलासरी तलासरीत मोकाट जनावरांच्या गळ्यात रेडियमचे पट्टे, तलासरी भागात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे फिरत असून ही जनावरे महामार्गांवर तसेच गावागावातील रस्त्यावर फिरत असतात,तसेच रात्रीच्या सुमारास रस्त्यावर बसत असतात.त्यामुळे अपघाताचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढले आहे. रस्त्यावरून भरधाव येणाऱ्या वाहनामुळे या जनावरांचा अपघात होतो. महामार्गावर या मोकाट फिरणाऱ्या जनावरामुळे गेल्या काही वर्षात अनेक अपघात होऊन वाहनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महामार्गाच्या परिसरातील हिरवा चारा खाण्यासाठी ही जनावरे दिवस रात्र फिरत असतात.या मोकाट फिरत असलेली जनावरे अपघातात मृत्यूमुखी पडू नयेत,यासाठी या मोकाट जनावरांच्या गळ्यात रेडियमचे पिवळे पट्टे बांधण्यात आले आहेत. जेणेकरून गळ्यातील रेडियम पट्टे चमकून रात्री वाहन चालक सावध होतील व अपघात…
जव्हार, प्रतिनिधी, आदिवासी कोकणा जमात सत्कार सोहळा संपन्न, आदिवासी कोकणा जमात प्रतिष्ठान, पालघर यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच सन २०२३ ते २०२५ या कालावधीत शासकीय सेवेत रुजू झालेल्या कोकणा समाजातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा भव्य सत्कार सोहळा नुकताच आचार्य भिसे हायस्कूल कासा येथे उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,जयपाल मुंडा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यसैनिक रेवजीभाई चौधरी आणि क्रांतिवीर देवाजी राऊत यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप साठे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आ.हरिश्चंद्र भोये,आदिवासी समाजातील पालघर जिल्ह्यातील पहिले सनदी अधिकारी डॉ.अजय…
दीपक मोहिते, निवडणुकीचे बिगुल वाजले, लाडक्या बहिणी योजनेचे श्रेय एकट्याने लाटण्याचा शिंदे यांचा प्रयत्न ; भाजपमध्ये तीव्र नाराजी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून या निवडणुका तीन टप्यात होणार असल्याचे संकेत मिळाल्यानंतर राजकीय पक्षाच्या हालचालींना चांगलाच वेग आला आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कामाला लागले आहेत.काल त्यांनी पालघर येथे पक्षाचे वरिष्ठ नेते,पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती.या बैठकीला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली,तसेच मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षाच्या काळात आपण कसं काम केलं यावर त्यांनी आपला फोकस ठेवला.त्यांच्या भाषणाचा ८० टक्के वेळ,हा आपण मुख्यमंत्री म्हणून किती…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” नेहरुंचा आधार घेऊन आणखी किती दिवस काढणार ? शहा व मोदीना जळी स्थळी नेहरूच दिसतात…. पहलगामचे हत्याकांड व त्यानंतर झालेले भारत – पाक युद्ध,त्यासाठी राबवण्यात आलेले ऑपरेशन सिंदूर व त्यानंतर अचानक झालेला युद्धविराम,यावर चर्चा करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात मोदी यांच्या सरकारने १६ तास राखून ठेवले होते.पण या चर्चेदरम्यान विरोधकांनी मोदी सरकारची लक्तरे वेशीला टांगली गेली.विरोधकांनी चढवलेल्या हल्ल्याला मोदी,राजनाथसिंग व अमित शहा हे तिघे तोंड देऊ शकले नाहीत. युद्धात ज्या काही घडामोडी घडल्या,त्यावर चर्चा करण्याऐवजी हे तिघेही नेहरू,सरदार पटेल,इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीत त्यांनी काय केले ? यावर भर देत राहिले.नेहरूंची जेवढी आठवण काँग्रेसजन करत नाही,त्याहीपेक्षा तिप्पट पटीने हे…
दीपक मोहिते, ” विध्वंस,” भाग क्र.१, वसईकर आजही मरण यातना भोगतच आहेत… एकेकाळी निसर्गरम्य अशा कृषीप्रधान तसेच वैभवशाली वसईचे काँक्रीटच्या जंगलात रूपांतर करण्याचे पाप कोणी कोणी केले ? हे नव्या पिढीला कळायला हवे,म्हणून हा लेखप्रपंच… नरवीर चिमाजी आप्पाच्या पदस्पर्शाने पावन झालेली वसईनगरीची ओळख ऐतिहासिक नगरी अशी होती.१९६० पर्यंत या वैभवशाली वसईत सर्वकाही आलबेल होते.स्थानिक भूमिपुत्र शेतीवाडी व बागायती उत्पन्नावर आपला चरितार्थ चालवायचे.पहाटे पहिली लोकल पकडून शेतकरी आपला शेतमाल घेऊन दादर गाठत असत.मोगरा,कागडा, पालेभाज्या व अन्य भाज्यांना दादरच्या बाजारात चांगला भाव मिळत असे.” वसईची भाजी,” या नावाने त्याची विक्री होत असे.यातून मिळणाऱ्या पैश्यात वसईकर आनंदी जीवन जगत होते.या वैभवशाली वसईची १९६०…
वसंत भोईर,वाडा वाडा- भिवंडी महामार्गाच्या काँक्रिटीकरणाला ब्रेक, वाडा- भिवंडी महामार्गाची अत्यंत दुरावस्था झाली असून या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. शासनाने या मार्गासाठी आठशे कोटीचा निधी मंजूर करून या कामाचा ठेका ईगल कंपनीला दिला आहे.परंतु,झालेल्या कामाचे बिल शासनाकडून अदा करण्यात न आल्याने या कंपनीने काम बंद केले आहे. गेल्या सहा दिवसापासून हे काम बंद झाले असुन या रस्त्यावर सध्या खड्ड्याचे सम्राज्य निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी त्याची अवस्था बिकट झाली आहे.मडक्याचा पाडा येथील एका तरुणाचा खड्ड्यांमुळे मृत्यू झाला.हा संपूर्ण महामार्गच खड्डेमय झाला असून वाहनचालक मेटाकुटीस आले आहेत. प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराविरोधात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाने आक्रमक पवित्रा घेत…
सुरेश काटे,तलासरी माकपाच्या कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश, तलासरी तालुका भाजपचे माजी अध्यक्ष तसेच डहाणु विधानसभा संयोजक विनोद मेढा यांच्या नेतृत्वाखाली तलासरी तालुक्यातील उपलाट पडवळपाडा येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काल भाजपात प्रवेश केला. भारतीय जनता पार्टी तलासरी, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तलासरी येथे हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला.माकपाचे विलास वाघात,सुरेश वाघात यांच्यासह जवळपास २५ कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपाचे जि.प.चे माजी सदस्य सुरेंद्र निकुंभ, जेष्ठ नेते बबला धोडी,वडवली सवणे गावाचे उपसरपंच सुनिल टोकरे,नगरसेवक गटनेता राजेश हाडळ,झरी गावाचे उपसरपंच अरविंद भावर,महेंद्र गोवारी,संतोष रांधे,वासू घुटे,शैलेश पाह, सुरेश पडवले,गणपत झाटीया यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
