सचिन पाटील,विरार
वसई विरार शहरात ठिकठिकाणी रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरु,
अतिवृष्टीमुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर उपाययोजना करण्यासाठी वसई विरार शहर महापालिका प्रशासनाकडून युद्धपातळीवर पावले उचलण्यात येत आहेत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे शहरात ठिकठिकाणी रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू झाले आहे.
वसई विरार शहरात खड्डे बुजवण्याचे काम प्राधान्याने सुरू करण्यात आले असून या आठवड्यात आतापर्यंत ८५४ खड्डे खडीकरण डांबरीकरणाने बुजवण्यात आले आहेत.वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर चालू असून खड्डेमुक्त प्रवासाचा चांगला अनुभव देण्यासाठी सर्व विभाग समन्वयाने कार्यरत आहेत.नागरिकांनी महानगरपालिकेला सहकार्य करावे,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

