सुरेश काटे,तलासरी
तलासरीत दहीहंडी उत्सव उत्सहात साजरा,
तलासरीत आज दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.तलासरीतील वनवासी कल्याण आश्रमच्या मुलीं,मुलांचे तसेच वसतिगृह मुलांचे गोविंदा पथक यांनी गावात नागरिकांनी तसेच राजकारण्यांनी बांधलेल्या दहीहंड्या फोडल्या.यावेळी डहाणू विधानसभा मतदार संघांचे आ.विनोद निकोले, माजी आ.श्रीनिवास वनगा, , पंचायत समिती माजी उप सभापती नंदकुमार हडळ, तलासरी नगर पंचायतीचे नगराध्यक्ष सुरेश भोये, उप नगराध्यक्ष सुभाष दुमाडा, तलासरी तहसीलदार अमोल पाठक,पोलीस निरीक्षक अजय गोरड तसेच नगर सेवक,पंचायत समिती,जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
तलासरी नाक्यावर माकपाच्या स्टुडन्ट फेडारेशनच्या दहीहंडी उत्सवात सर्व सहभागी गोविंदा पथकांना पारितोषिके तसेच आ.विनोद निकोले यांनी प्रत्येकी पाच हजाराचे प्रोत्साहन पारितोषिके,तसेच शिवसेना शिंदेगटाचे तलासरी तालुका अध्यक्ष आशीर्वाद रिंजड आणि शहर अध्यक्ष हरेश पाटकर यांनी आयोजित करण्यात आलेल्या दही हंड्या फोडणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकास अकरा हजार एकशे अकरा रु.बक्षीस ठेवले होते.
दरवर्षी तलासरी भागात दही हंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो, गावापाड्यातही दही हंड्या उभारण्यात येत असतात.त्या गावातील तरुणांच्या पथकाकडून फोडण्यात येतात,यावेळी गावातील तरुण तरुणी आपल्या पारंपरिक तारफा वाद्यावर नृत्य करतात. तलासरी नाक्यावर गोविंदा पथकाने केलेल्या तारपा नृत्यात मान्यवरांनी गोविंदा पथका बरोबर ताफा नृत्याचा आनंद घेतला.
दही हंडी उत्सव शांततेत कोणतीही दुर्घटना न होता पार पडला.यावेळी तलासरी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

