वाड्यात ८ कि.मी.लांबीच्या रस्त्याची झाली दुरुस्ती,
वाडा तालुक्यातील निंबवली – पालसई रस्ता अत्यंत खराब झाला असून जागोजागी खड्डे पडले होते.त्यामुळे स्थानिक नागरिक व वाहन चालक हैराण झाले होते.रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी भाजपचे पालघर उपजिल्हाध्यक्ष कृष्णा भोईर व माझी सभापती अरुण गौंड यांनी पुढाकार घेतला.त्यांनी स्थानिक खदाण मालकांच्या मदतीने ८ कि.मी. रस्त्याची खड्डे भरले.
तालुक्यातील निंबवली- पालसई हा रस्ता प्रचंड रहदारीचा असुन अनेक गावांना व बाजारपेठेस जोडणारा मुख्य रस्ता आहे.या रस्त्यावर प्रवास करतांना वाहन चालकांसह नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.तसेच जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता.सदर बाब लक्षात घेऊन येथील स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन हा रस्ता खड्डे भरून सुस्थितीत केला.
मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग व भिवंडी- वाडा राज्यमार्गावर वाहतूक कोंडी झाल्यास गुजरात व मुंबई कडे जाणारी वाहने याच मार्गावरून जात असतात. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक झाला होता.सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार लेखी मागणी करुन सुद्धा दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे येथील नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.
मुंबई – बडोदा महामार्गाचे
काम करणारी ऍपको कंपनी कडून ग्रेडर,रोलर व जे.के. स्टोन कंपनीकडून जीएसबी खडी,जेसीबी आदींची मदत घेऊन ८ की.मी.लांबीचा रस्ता व्यवस्थित करण्यात आला आहे.

