सुरेश वैद्य,पालघर
जव्हार येथे २० ऑगस्ट रोजी जनता दरबाराचे आयोजन,
वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली २0 ऑगस्ट रोजी सकाळी ११. ०० वाजता जव्हार येथील शासकीय विश्राम गृह समोर असलेल्या रेड सॉईल रिसॉर्ट येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.या जनता दरबारामध्ये नागरिकाच्या समस्या व अडचणी जाणून घेण्यासाठी पालकमंत्री गणेश नाईक नागरिकाशी थेट संवाद साधणार आहेत.
नागरिकांनी आपल्या समस्या
व प्रश्नाचे निराकरण करुन घेण्यासाठी जव्हार येथे २० ऑगस्ट रोजी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी केले आहे.
या जनता दरबारामध्ये नागरिकांच्या तक्रारी अर्जाचे निवारण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख उपस्थित राहणार आहेत.यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारामध्ये नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला होता.
या जनता दरबारामध्ये नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपल्या समस्या किंवा प्रश्नाचा निपटारा करून घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.इंदुराणी जाखड यांनी केले आहे.

