- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर : खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार….
- ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज,
- भारतीय संविधानाचे देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान,
- मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात,
- प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक….
- अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली,
- ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार, कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता,
- कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” ओबीसी कोट्यातून सरसकट आरक्षण हवे,” या मागणीचे काय झाले ? मराठ्यांच्या आरक्षण प्रश्नी गेले पाच दिवस सुरू असलेल्या लढ्याला न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर पूर्णविराम मिळाला.या लढ्यात कोण जिंकले व कोण हरले ? हा आज ना उद्या वादाचा मुद्दा ठरू शकतो.कारण,मराठ्यांचे नेते मनोज जरांगे यांनी आम्हाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मिळावे,यासाठी आपल्या जीवाची बाजी लावून धरली होती.ती मागणी पूर्ण झाली नाही,त्यामुळे जरांगे पाटील जिंकले,असे म्हणता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रश्नी हस्तक्षेप करावा,यासाठी सरकारने पडद्याआड ज्या हालचाली केल्या,त्या यशस्वी ठरल्या. हे आंदोलन बेकायदेशीर ठरवण्यासाठी ज्यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या,त्यांच्या नावावरून नजर टाकल्यास या प्रकरणी नक्की काय घडले असणार…
दीपक मोहिते, शासनाच्या निर्णयाने मराठा समाजाने हुरळून जाता कामा नये, हैदराबाद गॅझेट नेमकं काय आहे ? हैद्राबाद गॅझेट हे १८८४ साली निजामशाही सरकारकडून प्रकाशित केलेला अधिकृत अहवाल आहे.या गॅझेटमध्ये १८८१ च्या जनगणनेवर आधारित माहिती नोंदवण्यात आली होती.त्यावेळी हैद्राबाद राज्यात असलेला औरंगाबाद ( सध्याचे छत्रपती संभाजीनगर ) जिल्हा, त्यामधील वैजापूर आणि इतर तालुके यामध्ये विविध जाती-समुदायांची लोकसंख्या नमूद करण्यात आली होती. यात कुणबी समाजाची लोकसंख्या वैजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात असल्याचा उल्लेख आहे.मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाचे म्हणणे असे की,मराठा समाज आणि कुणबी समाज यांचे ऐतिहासिक नातं आहे.त्यामुळे मराठ्यांना कुणबी समाजाशी जोडून ओबीसी आरक्षण मिळावे,त्यासाठी हे गॅझेट ते ऐतिहासिक पुरावा म्हणून…
दीपक मोहिते, तिसरे महायुद्ध दक्षिण आशिया खंडात होण्याची शक्यता, गेल्या ७५ वर्षात अमेरिकेला अनेक देशात मानहानी पत्करत माघार घ्यावी लागली. त्यामध्ये अफगाणिस्तान, व्हियेतनाम,इराक,या देशांचा समावेश होता. सोव्हीयत रशियाचे विघटन झाल्यानंतर अमेरिकेने मध्यपूर्व देशात विस्तारवादी धोरण राबवण्यास सुरुवात केली. मात्र त्यांना याप्रकरणी फारसे यश मिळाले नाही.या देशातील कट्टरवादी टोळ्यांनी अमेरिकेची डाळ शिजू दिली नाही. सैन्यावर होणारा अमाप खर्च व आपल्या जवानांचे जाणारे बळी,अशा दोन कारणामुळे अमेरिकन जनतेमध्ये रोष वाढला व अमेरिकेने या देशातील आपले सैन्य माघारी बोलावले. पण त्यानंतरही अमेरिकेची खुमखूमी काही कमी झाली नाही. पण रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्हाल्दीमीर पुटीन यांच्या कणखरपणापुढे त्यांचे काही चालले नाही.रशियाला अधिक कमकुवत करण्यासाठी अमेरिकेने “…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” जरांगे पाटलांनी मुंबईकर जनतेची सहानुभूती गमावली, मराठ्यांचे नेते जरांगे पाटील यांना त्यांच्याच साथीदारांनी सध्या अडचणीत आणले असून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.जरांगे पाटील यांनी लाखो आंदोलकांना मुंबई आणून आपली ताकद दाखवून दिली.पण आता त्यांनी न्यायालय व मुंबईकरांची सहानुभूती पार गमावली आहे.आरक्षणाचा प्रश्न हा कधीही ताकदीच्या जोरावर सुटू शकणार नाही,हे जरांगे पाटील यांनी लक्षात घ्यायला हवे होते. मुंबई शहर हे गेल्या चार दिवसापासून कोमात गेले आहे.मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून दिवसाकाठी कोट्यवधी रु.आर्थिक उलाढाल होत असते.मुंबई म्हणजे अंतरवाली सराट नव्हे,हे शहर दररोज फक्त दोन तास झोपत असते.अशा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहराचे आर्थिक व्यवहार सलग चार दिवस…
दीपक मोहिते, मराठी माणूस मागे का ? मराठी भाषा व मराठी अस्मिता या दोन्ही विषयी मराठी माणूस फार संवेदनशील आहे.सदर बाब आपल्याला मान्य असली तरी मराठी माणूस इतर समाजाच्या तुलनेत मागे आहे,याविषयी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.आपला मराठी समाज “ मागे,” पडण्याची एकूण २३ कारणे, १ ) कमी प्रवास – प्रवास केल्याने जग कळते, कल्पना सुचतात,मार्ग सापडतात व प्रगती होते. मराठी माणूस आर्थिक स्थितीमुळे फारसा प्रवास करताना दिसत नाही,अनेक औद्योगिक प्रदर्शनात मराठी माणूस दिसत नाही. २ ) अति राजकारण – मराठी माणूस राजकारण वेडा आहे.राजकीय नेत्यांच्या सभेला आपला कामधंदा सोडून लाखोंच्या संख्येने येणारा मराठी माणूसच असतो.यात व्यापारी समाजातला एक तरी माणूस…
जव्हार प्रतिनिधी, धोपटपाडा गावात रानभाज्यांचा मेळावा, जव्हार तालुक्यातील रायतळे ग्रामपंचायत क्षेत्रात धोपटपाडा येथे स्थानिक महिलांच्या पुढाकाराने रानभाज्यांचा मेळावा उत्साहात पार पडला. या अनोख्या उपक्रमात रानभाज्यांपासून बनवलेले विविध पारंपरिक पदार्थ सादर करण्यात आले.सदर रानभाज्या मेळाव्यात खुरसणीचा पाला,कोहरूळ, कुरडू, शिंद,करटोली,इ. जवळपास १७ प्रकारच्या विविध रानभाज्यांची मांडणी करण्यात आली होती. प्रत्येक स्टॉलवर त्या भाजीचे पौष्टिक गुणधर्म, औषधी फायदे आणि पाककृतीची माहिती देण्यात आली.गावातील ज्येष्ठ नागरिक,महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले. यावेळी वयम चळवळीचे अध्यक्ष विनायक थाळकर, भरत पाटारा व महेंद्र पाटारा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रानभाज्या महोत्सव हा कार्यक्रम पारंपरिक खाद्यसंस्कृती जपणे,आरोग्य व महिलांच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत आवश्यक…
वसंत भोईर, वाडा, त्या टायर रिसायकलिंग कंपनीला अखेर टाळे… तालुक्यातील कोनसई गावात टायर रिसायकलिंगच्या अनेक कंपन्या असून, या कंपन्यांमुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच या कंपन्याचे रासायनिक सांडपाणी आसपासच्या शेतीमध्ये जात असल्याने भात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे ही कंपनी बंद करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी गेल्या दोन वर्षापासून उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे केली होती. शेतकऱ्यांच्या या तक्रारीच्या अनुषंगाने प्रशासनाने या टायर कंपनीवर बंद करण्याची कारवाई केली आहे.या प्रदूषणकारी टायर कंपनी मुळे कोणसई गावातील ३० शेतकऱ्यांच्या ५० एकर भात शेतीचे तसेच सुमारे १५ लाखापर्यंत या आर्थिक नुकसान झाल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.या नुकसानीची प्रशासनाने पाहणी…
दीपक मोहिते, हल्लाबोल, आता सर्वसामान्य करदात्यानी एकत्र येऊन लढायला हवे… वसई तालुक्यात अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे.१७ निष्पाप लोकांचा बळी गेल्यानंतर आता महानगरपालिकेला जाग आली आहे.पण या इमारतीचे बांधकाम सुरू असताना अधिकारी,स्थानिक नगरसेवक,प्रभाग समितीचा सभापती,सहा.प्रभारी आयुक्त इतकी वर्षे झोपले होते का ? हा खरा प्रश्न आहे.आज या महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामाची संख्या सुमारे एक लाखाच्या घरात पोहोचली आहे.या प्रकरणी सरकारने सखोल चौकशी करून या समाजकंटकाच्या पाठीशी असलेले खरे चेहरे लोकांसमोर आणले पाहिजेत.एरवी समाजात व्हाईट कॉलर म्हणून वावरत असलेल्या लोकप्रतिनिधींचीही तपास यंत्रणेद्वारा चौकशी झाली पाहिजे. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या अनिलकुमार पवार याने एकट्याने शिक्षा भोगू नये,त्यांनी या लुटीमध्ये सामील…
दीपक मोहिते, मराठा आरक्षण ; आपले मणिपूर होता कामा नये, मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र रूप धारण करू लागला आहे.मराठ्यांचे नेते जरांगे पाटील हे ” जिंकू किंवा मरू,” अशा आवेशात आता मैदानात उतरले आहेत. गेली तीन वर्षे या प्रश्नाचा तिढा सुटू शकला नाही. राज्याचे प्रमुख म्हणून फडणवीस यांनी या प्रश्नांची संवेदनशीलता लक्षात घेऊन या दोन्ही समाजाला समान न्याय मिळेल,असा तोडगा काढण्याची गरज होती. पण त्यांनी प्रश्न चिघळत ठेवला. जरांगे सारख्या फाटक्या माणसाला आपण सहज गुंडाळू,अशा भ्रमात ते होते. पण आज त्या फाटक्या माणसाच्या मागे दोन कोटी मराठे एकवटले आहेत व त्यांनी जरांगे सोबत मुंबईला जोरदार धडक दिली आहे. दुसरीकडे ओबीसी…
वसंत भोईर,वाडा गौराईमातेच्या आगमनासाठी वाडा तालुक्यातील बाजारपेठा सजल्या, तालुक्यातील व्यापाऱ्यांनी गौराई मातेच्या स्वागतासाठी बाजारपेठ सजवल्या आहेत. मात्र यंदा वाढलेल्या महागाईने खरेदीसाठी आलेल्या सामान्य भक्तांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तालुक्यात वाडा,कुडूस,खानिवली,कंचाड,शिरीष पाडा,या महत्त्वाच्या बाजारपेठा आहेत.या बाजारातील फळ विक्रेत्याच्या मनमानी व्यवहारावर नियंत्रण नसल्यामुळे व्यापारांच्या मनाप्रमाणे येथे फळांचे भाव असतात.मुंबई,ठाणे,कल्याण पेक्षाही येथे फळे चढ्या भावाने विकण्यात येत असतात. द्राक्षे -३५० रू.कि.लो.सफरचंद-१२० ते १६० रू.कि.लो. केळी ( वेलची )-७०ते ८०रू.डझन, साधी केळी-५०रू.ते ८०रू.डझन, पेरू-१०० रू.कि.लो.चिकू-१००रू.कि.लो.डाळिंब-१६०रू.कि.लो. नासपती-१२० रू.कि.लो.पपई-७०रू.नग, सुपारी-१० रू.नग असे भाव असून हे भाव सामान्य नागरिकाला न परवडत नाहीत.यावर प्रशासनाने नियंत्रण आणून योग्य दराने फळांची विक्री व्हावी.अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील यांनी केली…
