सचिन सावंत,विरार
बविआच्या महिला कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा संपन्न,
विरार पूर्व येथे बहुजन विकास आघाडीच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा माजी महापौर प्रवीणा हितेंद्र ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली व संघटक-सचिव तथा प्रवक्ते अजीव पाटील यांच्या उपस्थितीत विरार पूर्व येथील जीडी गार्डन हॉल,विवा तारांगण येथे काल सायं. मोठ्या उत्साहात पार पडला.
या स्नेहमेळाव्याला उपस्थित माजी महापौर प्रवीणा हितेंद्र ठाकूर यांचे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले.त्यानंतर त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.प्रविणा ठाकुर यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या लोकांच्या समस्या सोडवणे यावर भर दिला.लोकांची कामे आपण करत आलो आहोत आणि यापुढेही करतच राहणार आहोत.त्यासाठी जी काही मदत तुम्हाला लागेल,ती आपण नक्कीच करू.

महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबतच या मेळाव्याला बहुजन विकास आघाडीचे विरार पूर्वचे सर्व माजी अध्यक्ष,नगरसेवक, नगरसेविका,अधिकारी, कामगार,पत्रकार आणि हितचिंतक उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या प्रचंड उपस्थितीमुळे सभागृह खचाखच भरले होते. कार्यक्रमाच्या यशाबद्दल बहुजन विकास आघाडीतर्फे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आयोजकांनी मनापासून आभार मानले.

