वसंत भोईर,वाडा
वाड्यातील शेतकऱ्यांना किवावरील मासेमारीचा उत्पन्नाला हातभार,
पालघर जिल्ह्यात हवामान खात्याने १३ ते १८ सप्टें. या दरम्यान पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला आहे.येथील नदी- नाले,ओहोळ तुडूंब भरून वाहत आहेत.तालुक्यातील ग्रामीण भागात छोट्या मोठ्या ओहोळ – नाले,रस्त्यावरील मोरी शेजारी,शेतातील बांधावर ” किव,” करून शेतकरी सध्या मासेमारी करत आहेत.या मासेमारीमुळे काही दिवस शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडत असतो.
तालुक्यातील वाडा, कुडूस,शिरीषफाटा, खानिवली,अंबाडी या बाजारपेठेत माश्यांची विक्री होत असते.३०० ते ३५० रु. किलो या दराने माश्यांची विक्री होत आहे.
वाडा तालुक्यात भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते.पावसाळ्यात भातशेतीची लागवड केल्यानंतर काही दिवसांनी शेतकरी आपल्या शेतात तसेच पुराच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात मासे मिळत असतात.तर काही शेतकरी ताजे मासे खाण्यास मिळतात म्हणून किवावर मासेमारी करत असतात.
वाडा तालुक्यात उसर, घोडविंदे पाडा,तानसा फॉर्म, बोरांडा,पीक,पासोडीपाडा, चिंचघर पाडा आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासे विक्रीस येत असतात.तालुक्यातील काही शेतकरी मसाला -हळद लावून मासे सुकवून विक्री करतात. सुकवलेल्या माशांना प्रति किलो ५०० रु. पर्यंत भाव मिळतो.

