- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सर्वप्रथम नालासोपारा शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन सुधारा…
- पर्यटकांची जरूर काळजी घ्या, पण शहरातील करदात्यांना वाऱ्यावर सोडू नका,
- सक्रिय नसलेल्या राजकीय पक्षाना हजारो कोटी रु. च्या देणग्या,
- दादांच्या जाण्यावर कोणी राजकारण करू नये – सुनेत्राताई पवार,
- वाढवण बंदर ; तिढा अधिक जटील होत चालला आहे,
- ग्रामीण भागातील खेडी समृद्ध होण्यासाठी शाश्वत विकासाची गरज,
- विरोधी पक्षाकडून ७.८ टक्के जीडीपी वाढीच्या आकडेवारीवर संशय व्यक्त,
- वसईत स्मार्ट मीटर विरोधात ७ सप्टें. रोजी सर्वपक्षीय आंदोलन,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ऋतुचक्र विस्कळीत होणे,अत्यंत धोकादायक, निसर्गाने उधळण केलेल्या संपूर्ण रचनेत हवा,पाणी,जमीन,वनस्पती,पशु,पक्षी, कीटक व माणूस या सर्वांचा समावेश मिळून पर्यावरण तयार होत असते.त्याचे प्रमाण व रचना,ही आपापल्या गरजेनुसार करण्यात आली आहे.हे सर्व घटक एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे त्याचा एकत्रितपणे विचार करण्याची आवश्यकता असते.पूर्वी काळी तो विचार केला जात होता,परंतु जसजशी लोकसंख्या वाढत गेली निसर्गाचे हे चक्र विस्कळीत होत गेले.त्यामुळे आज तुम्हा-आम्हा सर्वाना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहेत.यूरोप खंडातील अनेक शहरे आज अधुन मधून निसर्गाच्या तडाख्यात सापडलेली आपण पाहतो.आधुनिक पद्धतीची शहरे वसली,परंतु ही शहरे वसवताना पर्यावरणावर त्याचा काय परिणाम झाला ? याचा आपण कधीच विचार केला नाही.त्याचे परिणाम सध्या आपल्याला भोगावे…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” पालघर जिल्ह्यातील शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर…” विमा क्षेत्रात खाजगी विमा कंपन्यांना रान मोकळे करून देण्याचा तत्कालीन काँग्रेस सरकारचा निर्णय,शेतकऱ्यांच्या गळ्याचा फास बनला आहे.शेतकऱ्यांना परतावा देण्यास,या विमा कंपन्यांची मानसिकता नसल्यामुळे राज्यातील शेतकरी सध्या हवालदील झाला आहे.या प्रश्नी राज्य सरकारही डोळ्यावर कातडे ओढून बसले आहे.गेल्या महिन्यात पावसाने पुनरागमन केल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.या नैसर्गिक संकटात जिल्ह्यातील भातशेतीचे होत्याचे नव्हते झाले.पण जिल्हा कृषी विभागाचे अधिकारी अद्याप सुप्तावस्थेत आहेत.पाऊस मात्र अद्याप थांबायचे नांव घेत नाही. खाजगी कंपन्यांचा आडमुठेपणा व राज्य सरकारची उदासीनता,त्यामुळे काही वर्षांपूर्वी अनेक जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक भूमिकेत आले होते.शेतकऱ्यांची संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य किसान सभेने याविषयी…
दीपक मोहिते, हे कसले गतिमान सरकार ? हे तर गुन्हेगारांना अभय देणारे सरकार… गेल्या पाच वर्षात आपले राज्य पूर्णपणे रसातळाला गेले असून या परिस्थितीला तीन इंजिनच्या सरकारचा भ्रष्ट व अकार्यक्षम कारभार कारणीभूत आहे.राज्यात सुरू असलेले हत्यासत्र,मोक्याच्या जमिनी बळकावणे,आर्थिक घोटाळे व गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढणे,इ.घटनांमुळे सर्वसामान्य माणसाचे जीवन सध्या असुरक्षित बनले आहे.गेल्या ७७ वर्षात पूर्वीचे एकही सरकार पोलिसांच्या कामात कधीही हस्तक्षेप करत नसत,पण हल्ली देवेंद्र फडणवीस यांचे सरकार त्यास अपवाद ठरले आहे.आजच्या घडीला पोलीस यंत्रणा गृहमंत्रीपदी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना विचारल्याशिवाय एकही निर्णय घेऊ शकत नाही.या अशा परिस्थितीमुळे राज्याची कायदा व सुव्यवस्थेची स्थिती पार खालावली आहे. गेल्या पाच वर्षात संतोष…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” बिघडते पर्यावरण संतुलन ; आपल्यासमोर एक आव्हान… जगभरात ओझोन व पर्जन्यमानाचे प्रमाण सतत कमी होत चालले आहे.त्यामुळे पृथ्वीवरील सजीवाना आता सभोवतालच्या बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घ्यावे लागत आहे.ज्या सजीवाना आपल्यामध्ये बदल घडवण्यात यश मिळते,ते तग धरून राहतात व ज्याना ते शक्य होत नाही,अशाना आपले प्राण गमवावे लागतात.अशी स्थिती का निर्माण झाली ? यावर गेल्या १०० वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावर कोट्यवधी कार्यशाळा,चर्चासत्रे,उपक्रम पार पडले.परंतु पर्यावरणाचा होत असलेला विनाश मात्र रोखणे,एकाही देशाला शक्य झाले नाही.आपल्या पालघर जिल्ह्यात पर्यावरणाचे संतुलन दिवसेंदिवस रसातळाला जाऊ लागले आहे.यंदा मे महिन्यात सुरु झालेला पाऊस नोव्हें.उजाडला तरी थांबण्याचे नांव घेत नाही.त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.…
वसंत भोईर, वाडा, रसायन मिश्रित सांडपाण्यामुळे शेतीचे नुकसान तालुक्यातील निचोळे ग्रामपंचायत हद्दीतील श्री कृष्णा फाॅर्म कंपनीतून बाहेर पडणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या भाताचे नुकसान झाले आहे.प्रशासनाने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना कंपनीकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. निचोळे येथील श्री कुष्णा फॉर्म ही कंपनी येथील शेतकऱ्यांच्या शेतीला लागून असल्याने कंपनीतील प्रक्रियेतील रसायनयुक्त सांडपाणी,कंपनी शेतामध्ये सोडत असल्याने शेतीचे पूर्ण अतोनात नुकसान झाले आहे. याबाबत अनेकदा वाडा तहसीलदारांना निवेदन दिले तरी काही एक उपयोग झाला नाही.पाण्यामुळे दुर्गंधी आणि सांडपाणी शेतात शिरते. त्यामुळे कोणतेही पीक येत नाही.अनेक वेळा तक्रार केली तरी अधिकारी गप्प आहेत. त्यांचे कंपनी मालकांशी साटेलोटे असल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळवून…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आघाडी व युतीच्या माध्यमातून निवडणुका लढवणे,हे दिवास्वप्नच असेल, महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर वसई तालुका हा दिवसेंदिवस संवेदनशील बनत चालला आहे.कोणताही विषय असो,भाजप व बहुजन विकास आघाडी एकमेकांच्या नाकदुऱ्या काढण्यात आघाडीवर आहेत.गेल्या तीस वर्षात वसईकर नागरिकांना अशी स्थिती कधीच पाहायला मिळाली नाही.त्यामुळे आगामी निवडणुकीत निवडणूक आयोग,महानगरपालिका व पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण येण्याची शक्यता आहे.निवडणुकीच्या प्रचारावर पोलिसांना यंदा करडी नजर ठेवावी लागणार आहे. विधानसभा काबीज केल्यानंतर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यामध्ये सध्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडीने देखील भाजपला रोखण्यासाठी कंबर कसली आहे.या दोघांच्या जीवघेण्या स्पर्धेत शिवसेना ( उबाठा ), शिवसेना ( शिंदे गट ),भारतीय राष्ट्रीय…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” सरकारच पक्षांतर कायद्याची मोडतोड करण्यात अग्रेसर, लोकशाही व्यवस्थेमध्ये होणाऱ्या निवडणुकामध्ये कोण जिंकणार व कोण हरणार याच्याशी सर्वसामान्य जनतेला कोणतेही देणेघेणे नाही.आपला हक्काचा लोकप्रतिनिधी निवडून देताना आपल्या दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्या व प्रश्नांची सोडवणूक कोण करतो,आपले गाऱ्हाणं कोण ऐकून घेतो,याचा ते विचार करत असतात.त्याला घोडेबाजार,एकमेकांची माणसे फोडणे,या अशा विषयात बिलकुल स्वारस्य नसते.चालायला धड रस्ते,पिण्याचे शुद्ध पाणी,रोगराईमुक्त परिसर, दर्जेदार शिक्षण,प्रभावी वैद्यकीय सेवा व अडचणी/ समस्यांचे निराकरण,जे लोकप्रतिनिधी करतील,त्यांच्याच पक्षाला लोक डोक्यावर घेतात,असा आजवरचा अनुभव आहे.सत्तेसाठी होणारी हाराकीरी,एकमेकांच्या उरावर बसणे,आमिष दाखवून एकमेकांची माणसे फोडणे,इ.बाबी या मतदारांच्या लेखी दुय्यम आहेत.जो लोकप्रतिनिधी आपल्या पक्षाच्या विचारसरणीला मूठमाती देत अन्य विचारसरणीच्या पक्षात जातो,तो…
पालघर प्रतिनिधी, मुरबे गावात रात्रभर ड्रोनचा वावर, मौजे मुरबे येथे रात्रीच्या वेळी ड्रोनद्वारे सुरू असलेल्या संशयास्पद वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी ग्रामस्थांनी सातपाटी सागरी पोलीस ठाणेत लेखी तक्रार दाखल करून तात्काळ चौकशीची मागणी केली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, दोन दिवसापूर्वी रात्री सुमारे ११:३० ते १:३० च्या सुमारास तीन ते चार मोठ्या आकाराचे ड्रोन मुरबे गावाच्या परिसरात फिरताना दिसले.हे ड्रोन गावाच्या आतील भागाचे तसेच आजूबाजूच्या परिसराचे छायाचित्रण करत असल्याचे दिसून आले.ड्रोनचे उड्डाण रात्रीच्या वेळी झाल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि घबराट निर्माण झाली होती. या ड्रोनचा उद्देश काय होता, आणि ते कोणत्या संस्थेकडून पाठवण्यात आले होते,याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने…
सुरेश काटे,तलासरी, उधवा ग्रामस्थांनी स्वखर्चाने बनवला रस्ता, उधवा केवडीपाडा येथील रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती,या रस्त्यावरून वाहन चालवणे व साधे चालणेही अवघड झाले होते. हा रस्ता दुरुस्त करण्याबाबत उधवा केवडीपाडा येथील ग्रामस्थानी उधवा ग्रामपंचायत, जिल्हा परिषद बांधकाम विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग यांना अनेक विनंती अर्ज केले पण करतो यापलीकडे कोणतेही उत्तर मिळत नसल्याने अखेर केवडी पाड्यातील ग्रामस्थानी स्वखर्चाने आणि श्रमदानाने केवडीपाड्यात येणारा रस्ता बनवला. उधवा केवडीपाडा येथील कच्चा अत्यंत खराब झाला होता,रस्त्यात मोठे खड्डे पडले होते,खड्ड्यांमुळे वाहनाचे मोठे नुकसान होत होते, पावसाळ्यात चालणेही अवघड झाले होते,हा रस्ता दुरुस्त करावा म्हणून गावातील तरुण वर्ग ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक यांना वारंवार भेटून विनंती अर्ज…
वसंत भोईर,वाडा अवकाळी पावसामुळे वाड्यातील भातशेतीची दैना, तालुक्यात भात कापणी जोमात सुरू असून,अनेक शेतकऱ्यांनी भात कापून शेतात ठेवला आहे.पण सततच्या पावसामुळे कापलेले पीक ओले झाले असून, मुसळधार पावसामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रातील भात पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. संध्याकाळच्या सुमारास पडणाऱ्या या अवकाळी पावसाने भातपिकाचे अतोनात नुकसान होत आहे. तालुक्यात सध्या भातकापणी वेगाने सुरू असून,अनेक शेतकऱ्यांनी भात कापून शेतात ठेवला आहे. पण सततच्या पावसामुळे कापलेले पीक ओले झाले आहे.मुसळधार पावसामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रातील भातपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. संध्याकाळच्या सुमारास पडणाऱ्या पावसामुळे भाताचे पीक सुकत नाही आणि ते आता वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. भिजलेल्या भातपिकांचे कृषी विभागाने लवकरात…
