Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, वाढवण बंदर ; नुकसानभरपाई पॅकेजबाबत ८ सप्टें. रोजी हितधारकांची बैठक, वाढवण बंदर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या मच्छीमार समुदायासाठी न्याय्य, पारदर्शक आणि सर्वसमावेशक पुनर्वसन व नुकसानभरपाई प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी पालघर जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे प्रशासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. वाढवण बंदर प्रकल्पाचे नियोजन सुरू झाल्यापासून प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान स्थानिक मच्छीमारांची उपजीविका आणि त्यांचे सामाजिक व आर्थिक हित यांना योग्य प्राधान्य दिले जावे, अशी भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. याप्रकरणी अनेक बैठका घेण्यात आल्या असून, मत्स्यव्यवसाय विभागातर्फे मच्छीमारांशी नुकसानभरपाईच्या मसुद्याबाबत प्राथमिक चर्चाही करण्यात आली आहे. या प्रक्रियेचा एक भाग म्हणून, बाधित क्षेत्रातील मच्छीमार कुटुंबांची उपजीविका मासेमारीवर किती अवलंबून आहे, हे समजून…

Read More

दीपक मोहिते, कायमस्वरूपी पुलासाठी जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनास प्रस्ताव सादर, पालघर जिल्हा प्रशासनाने पालघर तालुक्यातील वाढीव व वैती या गावांसाठी कायमस्वरूपी, सुरक्षित व बारमाही दळणवळण सुविधेचा प्रस्ताव नुकताच सादर केला आहे. क्षेत्रीय पाहणी व तांत्रिक तपासणीनंतर पुलाच्या बांधकामाचा प्रस्ताव व आराखडा पुढील मान्यतेसाठी राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. वाढीव व वैती या गावांची लोकसंख्या अनुक्रमे ७७२ व ७१६ असून ही गावे चोहोबाजूंनी वैतरणा नदीने वेढली आहेत. भरती-ओहोटीच्या वेळी नदीवरील मोठ्या पुलाच्या माध्यमातूनच दळणवळण उपलब्ध करून देणे आवश्यक असलेले, एका विलग बेटवजा वस्तीचे हे वैशिष्ट्यपूर्ण प्रकरण आहे. गावात ७ वी पर्यंत शाळा असून इयत्ता ८ वी ते १२ वी चे…

Read More

दीपक मोहिते, वसई व नालासोपाऱ्याच्या मतदारांमध्ये प्रचंड नैराश्य, गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर वसई – विरारचे राजकारण सध्या वेगळ्या वळणावर येऊन ठेपले आहे. ठाकूर यांच्या ३५ वर्षाच्या राजकीय साम्राज्याला आपण सुरुंग लावू शकतो,असा आत्मविश्वास विरोधकांमध्ये बळावला असून आजच्या घडीला हे विरोधक हितेंद्र ठाकूर यांना घेरण्याची एकही संधी सोडत नाहीत. वसई- विरार शहर महानगरपालिकेच्या प्रत्येक महासभेत भाजप हा बहुजन विकास आघाडी व प्रशासकीय राजवटीतील गैरप्रकार चव्हाट्यावर आणत असल्यामुळे सत्ताधारी व प्रशासन भितीच्या सावटाखाली आले आहेत. अनधिकृत बांधकामे व आर्थिक घोटाळे, या अशा प्रकरणात हे दोघेही आकंठ बुडाले असल्याचे पावलोपावली दिसून येत आहे. दुसरीकडे बहुजन विकास आघाडीचे काही नगरसेवक दहशत व गुन्हेगारी…

Read More

दीपक मोहिते, ६४ कोटींच्या कचरा प्रक्रिया घोटाळ्याप्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल, वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या घनकचरा विभागांतर्गत कचऱ्याच्या जैव-खाणकाम ( बायो-मायनिंग ) प्रकल्पात तब्बल ६४ कोटी रु.हून अधिक रकमेचा मोठा घोटाळा उघडकीस आलाआहे. या प्रकरणी मे. साई युटिलिटी काँट्रॅक्टर्स प्रा.लि. या कंत्राटदार कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी या कोट्यवधी रु.च्या गैरव्यवहाराची सविस्तर माहिती महासभेत पुराव्यांसह मांडली होती.या प्रकरणी संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यासाठी सतत पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्यानंतर महानगरपालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिलेल्या निर्देशानुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याबाबत उपलब्ध असलेल्या अधिकृत माहितीनुसार, बोळींज पोलीस ठाण्यात २७ ऑगस्ट २०२६ रोजी गुन्हा…

Read More

दीपक मोहिते, दहीहंडी प्रीमियर लीग पर्व : ३ ; उत्साहात संपन्न, काल न्यू विवा काॅलेज, विरार ( प. ) येथे क्षितीजोत्सव व दहीहंडी प्रिमियर लीग पर्व ३ रे अंतिम सोहळा उत्साह आणि जल्लोषात संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये फक्त पालघर जिल्ह्यातील गोविंदा पथके सहभागी झाली होती. या सोहळ्याचे आयोजक क्षितीजोत्सव समिती व दहीहंडी असोसिएशन पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने उपरोक्त सोहळा पार पडला.माजी आ. हितेंद्र ठाकूर व तसेच माजी आ. क्षितीज ठाकूर व वसई विरार महानगरपालिकेचे महापौर अजीव पाटील व उपमहापौर मार्शल लोपीस यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून या सोहळ्याची सुरूवात झाली. याप्रसंगी युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.सोहळ्यात पद्मश्री प्राप्त भिकल्या…

Read More

दीपक मोहिते, श्रावण सुंदरी २०२६ सौंदर्यस्पर्धेची अंतिम फेरी जल्लोषात संपन्न, यंग स्टार्स ट्रस्ट, विरार पुरस्कृत, वसई तालुका कला क्रिडा विकास मंडळ आयोजित, वामन हरी पेठे ज्वेलर्स वसई, यांच्या संयुक्त विद्यमाने विरार श्रावण सुंदरी २०२६ स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच अनंतराव ठाकूर नाट्यगृह, पारनाका वसई पश्चिम येथे पार पडली.मिस श्रावण सुंदरी या गटात प्रथम- भाविका तेंडुलकर, वसई ,द्वितीय – रोनिशा रॅाड्रिग्ज, वसई व तृतीय – तेजस्विनी राजपूत , ग्लॅमरस लुक – रोनिशा रॅाड्रिग्ज, ब्युटीफुल स्माईल – युक्ता वाघ , फोटोजेनिक फेस- तेजस्विनी राजपूत, बेस्ट रॅम्प वॅाक- भाविका तेंडुलकर, सोशल मिडिया फेम- सौम्या शेट्टी यांनी पारितोषिके पटकावली. मिसेस श्रावण सुंदरी या गटात प्रथम…

Read More

दीपक मोहिते, अवाजवी पाणीपट्टी दरवाढीविरोधात भाजपची जोरदार निदर्शने, वसई-विरार शहर महानगरपालिकेची मासिक महासभा काल ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० वाजता पार पडली. मात्र, ही सभा सुरू होण्यापूर्वी महापालिका मुख्यालयाबाहेर भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी अवाजवी पाणीपट्टी, पाणी लाभ कर आणि मलप्रवाह सुविधा कराच्या दरवाढीविरोधात निदर्शने करत महापालिका प्रशासनाचा निषेध केला. यापूर्वीही भाजपतर्फे १६ ऑगस्ट रोजी या करवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले होते. गेल्या महासभेत प्रशासकीय ठराव क्र. १९१७ ( १६/०१/२०२५ ) नुसार शहरातील मालमत्ताधारकांवर पाणीपुरवठा लाभकर व मलप्रवाह सुविधा लाभकर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मालमत्ता करामध्ये ( घरपट्टी ) थेट २० टक्के किंवा त्याहून अधिक वाढ झाली आहे.या…

Read More

दीपक मोहिते ” उच्च दर्जाचे शिक्षण ग्रामीण भागातील मुलांच्या नशिबी नाही.. लेखाचे हेडिंग वाचून तुम्हा सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला असेल, साहजिकच आहे. पण आपल्या शिक्षण व्यवस्थेची सध्याची अवस्था लक्षात घेता, माझ्या या लेखासाठी हेच हेडिंग समर्पक असल्याचे वाटले व ते मी देवून टाकले. पुढे तुमच्या वाचनात येणाऱ्या या लेखात हे हेडिंग देण्यामागचा उद्देश नक्कीच स्पष्ट होणार आहे. गेल्या काही वर्षात आपल्या शिक्षण व्यवस्थेची अवस्था फारशी समाधानकारक नाही. कालानुरूप प्रत्येक क्षेत्रात बदल होत असतो, असा निसर्गाचा नियम आहे व तो मानवी जीवनाशी निगडीत असा आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपल्या शिक्षण व्यवस्थेतही अमुलाग्र बदल होत गेले. आमच्या काळातील प्रचलित शिक्षण व्यवस्था व सध्याची…

Read More

दीपक मोहिते, बॉटमलाईन, आता पक्षांतरबंदी कायद्याची फेररचना करण्याची गरज, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेसंदर्भात तीन वर्षांपूर्वी दिलेल्या निर्णयाविरोधात राज्यात प्रचंड गदारोळ उडाला होता. हा निर्णय कसा पक्षपाती आहे, यावर संविधानाच्या अभ्यासकांनी टिकेची झोड उठवली होती. नार्वेकर यांनी हा निर्णय राजकीय दबावाखाली घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यांच्या या आरोपात तथ्य होते. अनेक घटनातज्ञानीही हा निकाल आपल्या संसदीय व लोकशाही प्रणालीचा गळा घोटणारा आहे,अशी मते नोंदवली होती, तसेच निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयाचे त्यावेळचे सरन्यायधीश दोघांसह राहुल नार्वेकर अशा तिघांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले होते. या प्रश्नावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सलग सुनावणी सुरु आहे. उद्धव ठाकरे यांचे…

Read More

दीपक मोहिते, आपण,आणखी किती काळ ठराविक कुटुंबाची गुलामी करणार आहोत ? स्वातंत्रपूर्व काळात आपण इंग्रजाची गुलामी स्विकारली होती. त्यामुळे देशातील संसाधनाची त्यांनी चांगलीच लूट केली.ईस्ट इंडिया या छोटेखानी कंपनीने दीड ते शतकापूर्वी आपल्या देशात घुसखोरी केली व हां हां म्हणता त्यांनी देश ताब्यात घेतला. १५ ऑगस्ट १९४७ साली आपला देश गुलामगिरीतून मुक्त झाला. गुलामगिरीचे हे जोखड भिरकावण्यासाठी झालेल्या देशव्यापी आंदोलनात अनेक स्वातंत्र्यवीरानी आपले देह ठेवले. अनेकांची कुटुंबे त्या लढ्यात बेचीराख झाली. १४ ऑगस्टच्या मध्यरात्री शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या व आपण मोकळा श्वास घेऊ लागलो. या ऐतिहासिक घडामोडीनंतर आपल्याला खूप काही भोगावे लागले. इंग्रजानी त्यावेळी देशाचे भारत…

Read More