दीपक मोहिते,
दहीहंडी प्रीमियर लीग पर्व : ३ ; उत्साहात संपन्न,
काल न्यू विवा काॅलेज, विरार ( प. ) येथे क्षितीजोत्सव व दहीहंडी प्रिमियर लीग पर्व ३ रे अंतिम सोहळा उत्साह आणि जल्लोषात संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये फक्त पालघर जिल्ह्यातील गोविंदा पथके सहभागी झाली होती. या सोहळ्याचे आयोजक क्षितीजोत्सव समिती व दहीहंडी असोसिएशन पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने उपरोक्त सोहळा पार पडला.माजी आ. हितेंद्र ठाकूर व तसेच माजी आ. क्षितीज ठाकूर व वसई विरार महानगरपालिकेचे महापौर अजीव पाटील व उपमहापौर मार्शल लोपीस यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून या सोहळ्याची सुरूवात झाली. याप्रसंगी युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.सोहळ्यात पद्मश्री प्राप्त भिकल्या धिंडा हे देखील उपस्थित होते.
गेल्या वर्षी १० थर लावुन ज्यांनी विक्रम केला होता,असे मुंबईतील जोगेश्वरी येथील जय जवान गोविंदा पथक व कोकण नगर गोविंदा पथकाना व ठाणे जिल्ह्यातील पहीले ९ थर लावणारा खोपटचा राजा गोविंदा पथकाला विशेष सन्मानित करण्यात आले. खास आकर्षण म्हणजे दक्षिण मुंबईतील माझगाव ताडवाडी गोविंदा पथकाने ४ एक्के लावून ८ थराची सलामी दिली व त्यांनी आणखी एक विक्रम पालघर जिल्ह्यात केला तो म्हणजे सर्व प्रथम ५ एक्के लावून सर्व पालघरवासीयांची मने जिंकली. त्याबद्दल प्रमुख प्रशिक्षक अरुण पाटील यांनी सर्वाचे आभार मानले. या सोहळ्याला मराठी कलावंताची पण हजेरी लावली होती. यामध्ये अशुंमन विचारे, अभिजीत चव्हाण,दिगंबर नाईक, सविता मालपेकर, उमाकांत पाटील,प्रणव रावराणे, यांचा समावेश होता.
या महाअंतिम फेरीत पुरुष १६ व ६ महीला गोविंदा पथके सहभागी झाले होते.

