दीपक मोहिते,
श्रावण सुंदरी २०२६ सौंदर्यस्पर्धेची अंतिम फेरी जल्लोषात संपन्न,
यंग स्टार्स ट्रस्ट, विरार पुरस्कृत, वसई तालुका कला क्रिडा विकास मंडळ आयोजित,
वामन हरी पेठे ज्वेलर्स वसई, यांच्या संयुक्त विद्यमाने विरार श्रावण सुंदरी २०२६ स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच अनंतराव ठाकूर नाट्यगृह, पारनाका वसई पश्चिम येथे पार पडली.मिस श्रावण सुंदरी या गटात प्रथम- भाविका तेंडुलकर, वसई
,द्वितीय – रोनिशा रॅाड्रिग्ज, वसई व तृतीय – तेजस्विनी राजपूत , ग्लॅमरस लुक – रोनिशा रॅाड्रिग्ज, ब्युटीफुल स्माईल – युक्ता वाघ , फोटोजेनिक फेस- तेजस्विनी राजपूत, बेस्ट रॅम्प वॅाक- भाविका तेंडुलकर, सोशल मिडिया फेम- सौम्या शेट्टी यांनी पारितोषिके पटकावली. मिसेस श्रावण सुंदरी या गटात प्रथम – विल्मा डाबरे, वसई, द्वितिय – डॅा अर्जिता राऊत व तुतीय – निलम गांगड, ग्लॅमरस लुक – प्राजक्ता इतकर, ब्युटीफुल स्माईल – अजिता जनावले , फोटोजेनिक फेस- ऐश्वर्या लाड, बेस्ट रॅम्प वॅाक-विल्मा डाबरे, सोशल मिडिया फेम- जागृती राऊत या विजेत्या ठरल्या. एलिट श्रावण सुंदरी या गटांत प्रथम- डॅा. सोनाली कोळी, वसई, द्वितिय- सविता कौर ओझला, पूणे, तृतीय – निलिमा भोयर, वर्धा, ग्लॅमरस लुक – निलिमा भोयर ब्युटीफुल स्माईल – दक्षा वाणिया, फोटोजेनिक फेस- डॅा सोनाली कोळी, बेस्ट रॅम्प वॅाक- सायली दवे, सोशल मिडिया फेम- श्रुतिका माशेलकर यांनी बाजी मारली.
प्रसिद्ध सिने व नाट्य अभिनेते तुषार दळवी, पुष्कर श्रोत्री, प्रसिद्ध सिनेअभिनेत्री व नृत्यांगना मानसी नाईक, गारवा फेम प्रसिद्ध कवि व लेखक मिलिंद इंगळे, ॲड एजन्सीचे पराग शहाणे, आणि अदानी ग्रुपच्या एच. आर. चंदा वनमाळी इ. निरनिराळ्या क्षेत्रांतील नामांकीत तज्ञांनी अंतिम फेरीचे परिक्षण केले. गेल्या वर्षी तिन्ही गटांतील विजेत्या तारका स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होत्या. अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या आपल्या मराठी भाषेला सुदृढ करण्यासाठी मराठीत बोला, मराठी साहित्य वाचत चला, मराठी नाटके व सिनेमे पहा, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
सदर प्रसंगी ॲबीगेल ॲम्ब्रोज या नृत्यांगनेने आपल्या शिष्यांसह सादर केलेल्या हुला हुया या नृत्यशैलीतील मराठी लोकसंगीतावरील नेत्रदिपक नृत्यास परिक्षक व सर्व रसिक प्रेक्षकांकडून वाहवा मिळवली.
नेदरलॅंड, मणिपूर, राजस्थान, वर्धा, सातारा, पुणे , परभणी, नाशिक इ. विविध ठिकाणांहून स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते.
माजी आ.क्षितीज ठाकूर, वसई तालुका कला क्रिडा मंडळाचे अध्यक्ष दत्ताराम मणेरीकर, कार्याध्यक्ष प्रकाश वनमाळी, उपाध्यक्ष माणिकराव दोतोंडे, सरचिटणीस केवल वर्तक, संघटक सचिव अनिल वाझ, कला प्रमुख प्रशांत घुमरे, शिर्षक प्रायोजक वामन हरी पेठे ज्वेलर्सचे पांडे, वसई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप पंडित आणि सर्व परिक्षक मान्यवरांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
शिर्षक प्रायोजक वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी पारितोषिक विजेत्यांना विशेष भेटवस्तू देऊन गौरवले. सदर सोहळ्यात वेन्यु पार्टनर विवा महाविदयालय, विरार समाज मंदिर ट्रस्ट, वसई, शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाज मंडळ, वसई, ग्रुमिंग पार्टनर लॅकमे ॲकेडमी मीरारोड, आऊट डोअर मिडीया पार्टनर आर्ट मिडिया, आय.टी. पार्टनर व्ह्युटेक कॅाम्प्युटर्स आणि ॲान टिव्ही डिजिटल मिडिया , फूड पार्टनर पोस्ट ॲाफीस रेस्टॅारंट, कोरिओग्राफर राजेश वर्तक व टीम इत्यादि सहप्रायोजकांच्या प्रतिनीधींना गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितिशा पाटील, आभार प्रदर्शन ॲड तन्मय नेरकर व निवेदनाची जबाबदारी कुणाल रेगे व सायली गावंड यांनी पार पाडली.

