- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
चोरी, लुटमार करणाऱ्या चौकडीला वाडा पोलिसांनी केली अटक वाडा भिवंडी महामार्गावर आयशर टेम्पो चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या चौकडीला सि.सि.टि.व्ही.कॅमेऱ्याच्या मदतीने स्थानिक नागरिकांच्या मदतीने चौघाना वाडा पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून तीन मोबाईल जप्त केले आहेत. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अंबरनाथ हून आलेला टेम्पो आबिटघरला जात असताना रात्रीच्या सुमारास वाडा तालुक्यातील शिरीषपाडा येथे चहा पिण्यासाठी थांबलेल्या आयशर टेम्पो चालकावर चाकूने वार करून त्याच्याकडून पाच हजार रू व एक ओपो कंपनीचा मोबाईल घेऊन हे चोरटे पसार झाले होते.पुढे आणखी एका ठिकाणी चोरी करत असताना स्थानिक नागरिकांनी दोघांना पकडून चोप दिला व पोलिसांच्या ताब्यात दिले.यावेळी अन्य दोघेजण पळून गेले होते,त्यांना शहापूर तालुक्यातील कांदळी येथून…
सुरेश काटे,तलासरी, बीएमडब्लूची रिक्षाला धडक दोन जखमी,रिक्षाचा चक्काचूर, तलासरी पोलिस स्टेशन हद्दीत महामार्गावर आमगाव येथे भरधाव बीएमडब्लू कारने रीक्षाला आज दुपारी जोरदार धडक दिल्याने रीक्षाचा चक्काचूर झाला.त्यातील दोघा प्रवाशांना जबर दुखापत झाली.त्यांना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र आमगाव उपचारासाठी दाखल केले. सध्या महामार्गाचे व्हाईट टॅपिंगचे काम सुरू असून नित्कृष्ट दर्जाच्या कामामुळे अपघाता चे प्रमाण वाढले आहे बीएमडब्लू कार क्रमांक HR 02, AD 0099 या भरधाव येणाऱ्या कारने रिक्षा क्रमांक GJ 15, XX 1880 ला जोरदार धडक दिल्याने रिक्षाचा चक्काचूर झाला तर अपघातानंतर कार बाजुला असलेल्या खड्डयात पडली. या अपघातात रिक्षामधील प्रवासी इश्वती लक्ष्मण कालात,वय ५० वर्षे,राहणार वरवाडा,आणि निलेश पलज्या शिंगडे वय…
सुगंध भोईर,कामण, वसईतील पर्यटनस्थळांच्या विकासाची पालकमंत्र्याकडे मागणी, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य केदारनाथ म्हात्रे यांनी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन तुंगारेश्वर व परशुराम कुंड या ‘क’ वर्गिय तिर्थक्षेत्र पर्यटन स्थळांच्या विकासाची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणी संदर्भात पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. वनमंत्री गणेश नाईक हे यापूर्वी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तुंगारेश्वर व परशुराम कुंड या तिर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग दर्जा देण्यात आला होता व विकासासाठी प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.त्यानंतर कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद ठाणे यांनी जिल्हाधिकारी ठाणे यांना पत्र पाठवून विकास प्रस्तावासाठी…
वसंत भोईर,वाडा, वाड्यातून अनेक दिंड्यांचे त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान, श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी सोहळा निमित्त २६ जाने.रोजी त्र्यंबकेश्वर येथे यात्रा आहे. त्यासाठी वाडा तालुक्यातून पायी दिंड्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरच्या दिशेने विविध ठिकाणांहून निघाल्या आहेत. जगद्गुरू तुकोबाराय व ज्ञानेश्वर माऊली यांच्या नामाचा जागर करत दिंड्या हळूहळू पुढे जात आहेत.तालुक्यातून निघालेल्या दिंड्यांतील वारकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भाविक मोठी गर्दी करत आहेत.या दिंड्यामुळे संपूर्ण तालुक्यात भक्तिमय वातावरण झाले असून रस्ते भगवेमय झाले आहेत. वाडा तालुक्यातील गुंज दिनकरपाडा,पळसपाडा,मेट, देवघर,नांदनी,अंभरभुई, लोहपे,खानिवली,आबिटघर, तिळसा,खरिवली तर भिवंडी तालुक्यातील झिडके,सावरोली या भागातून पंधराहून अधिक दिंड्या निघाल्या आहेत. कोंढले परिसरातील दिनकरपाडा व पळसपाडा या दिंडीमध्ये पाचशेहून अधिक वारकरी सहभागी झाले आहेत.यामध्ये…
सचिन परब,विरार, विरार येथे सखी सोहोळा संपन्न,महिलांची लक्षणीय उपस्थिती, महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती भारती देशमुख यांच्या स्मृति प्रित्यर्थ बहुजन विकास आघाडी,अमेय क्लासिक क्लब,यंग स्टार ट्रस्ट व विराट फाऊंडेशनतर्फे सखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून सखी सोहोळा आयोजित करण्यात येत असतो.यंदाचा हा सोहोळा रवि.१९ जाने.रोजी आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमात नृत्य,गायन,विविध खेळ तसेच मनोरंजनाचे खेळ ठेवण्यात आले होते.नव्याने सुरु करण्यात आलेल्या होम मिनिस्टर खेळाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.या सोहोळ्यातील महिलांना ३ पैठण्यासोबत लकी ड्रॉ मध्ये विजेत्या महिलेला आकर्षक नथ देण्यात आली. साक्षी नाईक,सुप्रिया धनावडे, भूमिका मयावशी यांनी लकी ड्रॉ मध्ये नथ जिंकली तर स्नेहल पुराणिक,अंजली कदम आणि भाग्यश्री मायावशी…
अजय दीक्षित, ” बुमरँग,” अक्षय शिंदे फेक एन्काऊंटर प्रकरणी पाच पोलीस दोषी ; गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश, बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याची हत्या ही एक फेक एन्काऊंटर असल्याचा ठपका या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीने पाच पोलिसांवर ठपका ठेवला आहे.या अहवालामुळे राज्यसरकारचे गृहखाते व या प्रकरणातील पाच पोलीस अधिकारी आता अडचणीत आले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणाऱ्या न्यायालयीन समितीने आज आपला अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर केला.या अहवालात समितीने पोलिसांच्या केलेल्या कारवाईवर संशय व्यक्त केला आहे. आरोपी अक्षय शिंदे याने बंदूक खेचल्याचा पोलिसांचा दावा समितीने खोडून काढला.जर अक्षय शिंदे यांनी बंदूक खेचली असेल तर बंदुकीवर त्याच्या हाताचे…
संजय लांडगे,वाडा, वाडा सहयोग नगर येथे सुसज्ज बागायतीचे भूमिपूजन संपन्न शहापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार दौलत दरोडा यांच्या आमदार निधीतून ५३ लाख रु.चा निधी खर्च करून वाडा शहरातील सहयोग नगर येथे अतिशय सुसज्य व सुंदर असा बगीचा तयार करण्यात येणार आहे. या बागायतीच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम काल मोठ्या थाटामाटात पार पडला. रोहिणी शेलार सभापती महिला व बालकल्याण जिल्हा परिषद पालघर,संदीप पवार उपाध्यक्ष भाजप पालघर जिल्हा व निशा सवरा अध्यक्षा आसमंत सेवा संस्था यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमी पूजन करण्यात आले. याप्रसंगी सहयोग नगरच्या रहिवाश्यानी रस्ता व पाण्याचा प्रश्न उपस्थित केला असता संदीप पवार यांनी सांगितले की सध्या वाड्यात एकच टाकी असून…
दीपक मोहिते, पुन्हा सज्ज, माजी आ.हितेंद्र ठाकूर पुन्हा घेताहेत उत्तुंग भरारी, विधानसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर काही काळ निवांत असलेले माजी आ.हितेंद्र ठाकूर पुन्हा लढण्यासाठी सज्ज झाले आहेत.गेल्या दोन आठवड्यात त्यांनी वरिष्ठ पदाधिकारी,माजी नगरसेवक,नगरसेविका व कार्यकर्त्यांचे सलग विभागवार बैठका घेतल्या.त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.या बैठकाच्या माध्यमातून जी ऊर्जा हितेंद्र ठाकूर यांनी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केली आहे.त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच पाहायला मिळतील,असे वाटते. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आरक्षण प्रश्नी येत्या दोन दिवसात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे.मात्र या सुनावणीमध्ये अंतिम निर्णय होईल,असे वाटत नाही.जरी झाला तरी त्यावर हरकती-सूचना आदी प्रक्रिया पूर्ण होण्यास किमान दोन ते तीन महिन्याचा अवधी लागणार आहे.त्यामुळे या निवडणुका…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” अखेर रायगड व नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्त्या रद्द, काल कर्जत येथे झालेल्या एका कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर तीव्र शब्दात टीकास्त्र सोडले होते.त्यामुळे राजकारण ढवळून निघाले होते. त्यामुळे फडणवीस यांनी काल रातोरात नाशिक व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या.रायगडच्या अदिती तटकरे व नाशिकचे गिरीश महाजन या दोघांना नारळ देण्यात आला.आता या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी कोणाच्या नियुक्त्या करण्यात येतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रायगड जिल्ह्याच्या राजकारणात सुनील तटकरे कुटुंबीय व भाजप/ शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) या महायुतीच्या दोन प्रमुख घटक पक्षाचे विळ्या भोपळ्याचे नाते आहे.नुकत्याच पार पडलेल्या…
जव्हार प्रतिनिधी, चांभारशेत येथे जाबर परिवार मेळावा उत्साहात साजरा, जव्हार तालुक्यातील चांभारशेत येथे जाबर कुल परिवार मेळावा ७ वा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात आदिवासीची जुनी परंपरा सांबळ,तारपा व तूर नाच नृत्य सादर करून कुलदेवतांची मिरवणूक काढून पूजन करण्यात आले. महाराष्ट्र,गुजरात व दादरा नगर हवेली वरून आलेले जाबर कुल परिवरांचे सदस्यांचे अनेक ग्रुपने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कुलदेवतेचे पूजन का करावे,याचे महत्व सांगितले.तसेच तरुणांनी पुढाकार घेऊन आपली परंपरा चालू ठेवावी,असे आवाहन प्रमुख पाहुणे रमेश घुटे यांनी केले.हा मेळावा आयोजित करण्याचा उद्देश असा आहे की,जाबर कुल परिवार हा कानाकोपऱ्यात राहत असेल तर तो एकत्र कसा येईल,आपली ओळख कशी होईल,आपले…
