वसंत भोईर,वाडा,
पालसई ग्रा.पं.च्या उपसरपंचपदी शिवसेनेच्या ( उबाठा )विभूती पाटील यांची बिनविरोध निवड,
तालुक्यातील पालसई ग्रामपंचायत उपसरपंच पदाची निवडणूक काल पार पडली. या निवडणुकीत शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाच्या विभूती पाटील यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
त्यांच्या या निवडीनंतर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे तालुकाप्रमुख निलेश पाटील, lपालसई विभाग प्रमुख विशाल पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
माजी उपसरपंच अंकिता पाटील यांची मुदत संपल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. काल उपसरपंचपदाची निवडणूक पार पडली. त्यात विभूती पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

