दीपक मोहिते,
” साहित्यिकांची मांदियाळी,”
दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी संमेलनात कार्यक्रमाची रेलचेल,
मायमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात नुकताच ऐतिहासिक निर्णय झाला.या निर्णयामुळे सुखावलेला मराठी माणूस आता दिल्ली येथे २१ ते २३ जाने.दरम्यान होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला लागला आहे.या संमेलनाध्यक्षपदी लोकसंस्कृती,संत साहित्याच्या गाढा अभ्यासक,संशोधक डॉ. तारा भवाळकर या आहेत.त्यांची साहित्याची वाटचाल ही दैदीप्यमान अशी असून गेल्या सहा दशकाच्या आपल्या साहित्य वाटचालीत संतसाहित्य,लोकसंस्कृती,नाट्यसंशोधन,
ललितलेखन,
लोककला,एकांकिका व लोकसाहित्य इ.विषयावर विपुल लेखन केले आहे.त्यांनी या काळात साहित्याचे अनेक पुरस्कार मिळवले,त्यामध्ये उत्कृष्ट ग्रंथनिर्मीती पुरस्कार,महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वि.मा.गोखले पुरस्कार,गौरव पुरस्कार,श्री.ना.बनहट्टी पुरस्कार,मुंबई विद्यापीठाचा डॉ.अ.ना.प्रियोळकर,
सह्याद्री दूरदर्शन वाहिनीचा रत्नशारदा पुरस्कार, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा विशेष सन्मान पुरस्कार व इतर अनेक पुरस्कारांचा समावेश आहे.त्यांची साहित्य क्षेत्रात झालेली दमदार वाटचाल लक्षात घेता,त्यांची संमेलनाध्यक्षपदी निवड होणे अपेक्षितच होते.सलग तीन दिवस होणाऱ्या या संमेलनात ग्रंथदिंडी,परिसंवाद,प्रकट मुलाखत व अन्य साहित्यविषयक कार्यक्रमाची अक्षरशः रेलचेल आहे.या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे अभिजात मराठीचा ” ऑनलाईन जागर,” हा आगळावेगळा उपक्रम राबवला आहे.

