शुभांगी शिंदे, नाशिक,
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार बंगाली आणि आसामी कवींना प्रदान,
अँकर ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीदवाक्य असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनातर्फे देण्यात येणारा २०२२ आणि २०२३ चा कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार बंगाली भाषेतील प्रसिद्ध कवी अमिताभ गुप्ता यांना २०२२ साठी आणि
असामी भाषेतील प्रसिद्ध कवी नीलम कुमार यांना २०२३ साठी विद्यापीठाचे कुलगुरू आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजीव सोनवणे यांच्या हस्ते आणि प्रसिद्ध कवी व अनुवादक तसेच निवड समितीचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सन्मानचिन्ह मानपत्र एक लाख रु.चा धनादेश व शाल, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्काराच्या धर्तीवर हा पुरस्कार असला तरी हा पुरस्कार फक्त कवितेसाठी विविध भाषातील कवींना दिला जातो २०२१ चा पुरस्कार सुप्रसिद्ध हिंदी कवी गुलजार यांना देण्यात आला होता.१८४ वर्ष जुन्या सार्वजनिक वाचनालयाच्या औरंगाबादकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य संजीव सोनवणे म्हणाले की,अन्य भाषातील साहित्यिकांना कुसुमाग्रजांच्या नावाने दिलेला पुरस्कार हा चांगल्या परंपरा समृद्ध करण्याचा प्रयत्न आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर काय परिवर्तन होणार,ते सर्वांना समजावून सांगणे गरजेचे आहे.भाषा अभिजात झाली तरी ती समृद्ध करणे आणि जगापुढे देणे,हे आपले काम आहे.इतर राज्यातील आणि परदेशातील विद्यापीठात मराठी भाषा विभाग सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रसिद्ध बंगाली कवी अमिताभ गुप्ता म्हणाले की कुसुमाग्रजांच्या नावाने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे,याचा आपल्याला आनंद आहे.कविता कोणत्याही भाषेतील असली तरी सर्वांना सुख व शांती मिळवून देणे, असा कवितेचा उद्देश असायला हवा.यावेळी त्यांनी आपली बंगाली भाषा आणि दोस्त माणूस,या दोन कविता सादर केल्या.असामी भाषेतील प्रसिद्ध कवी निलीम कुमार आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की कुसुमाग्रजांच्या नावाने मिळालेल्या या पुरस्कारामुळे असामी भाषे प्रती आपली जबाबदारी वाढली आहे.कविता ही जगाशी संवाद साधणारी भाषा आहे.त्यांनीही आपल्या बारिश आणि भला आदमी,या कवितांचे वाचन केले. कार्यक्रमांमध्ये दोन्ही कवींनी सादर केलेल्या कवितांचा मराठी अनुवाद श्रीधर नांदेडकर यांनी सादर केला. कार्यक्रमाला साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

