- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” आदिवासी ग्रामीण जीवन,” २८ फेब्रु.रोजी डहाणू तालुक्यात तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचे ( मातीच्या रंगाचे संमेलन ) आयोजन, येत्या २८ फेब्रु.ते २ मार्च २०२५ दरम्यान पालघर जिल्ह्यातील गंजाड,बापूगाव व घोलवड या तीन गावात तीन दिवसीय भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे ( मातीच्या रंगाचे संमेलन )आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवात येथील कला व ऐतिहासिक वारसा याचे दर्शन घडवण्यात येणार आहे. राज्याच्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या या महोत्सवाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्याची संस्कृती,गावांची स्थित्यंतरे,सांस्कृतिक वारसा,विविध जाती-जमातीमधील एकोपा,कला व जीवनशैली लोकासमोर आणण्याचा प्रयत्न आहे. * बापूगाव व गंजाड येथे वारली पेंटिंग,यामध्ये स्थानिक आदिवासी कलावंत आपल्या पेंटिंग सादर करणार आहेत. * त्यानंतर…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” पीएमटी टू मर्सिडीझ,” एक विलक्षण प्रवास, दिल्ली येथे झालेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात डॉ.निलम गोऱ्हे यांनी सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर विखारी शब्दात टीका केल्यामुळे त्या स्वतः अडचणीत आल्याच पण आता संमेलनाचे आयोजकही टीकेचे धनी झाले आहेत.अनेक नेटकऱ्यांनी समाजमाध्यमावर डॉ.गोऱ्हे व संमेलनाचे आयोजक या दोघांवर लक्ष्य केले आहे. या संमेलनात ” असे घडलो आम्ही,” या कार्यक्रमात झालेल्या मुलाखतीमध्ये डॉ.गोऱ्हे यांनी ” सेनेत दोन मर्सिडीझ दिल्या की हवं ते मिळते,” असा थेट आरोप केला.त्यांच्या या आरोपाचे अवघ्या काही तासात राज्यभरात जोरदार पडसाद उमटले.दिवसभर समाजमाध्यमावर गोऱ्हे यांच्यावर तुफान टीका होत होती.या टीकेचा आशय होता,”…
वसंत भोईर,वाडा भाताचे पैसे दोन महिने रखडले ; शेतकरी आंदोलन छेडणार, वाडा तालुक्यात सुरू असलेल्या भात खरेदी केंद्रांना आदिवासी विकास महामंडळाकडून वेळेवर निधी उपलब्ध होत नसल्यामुळे दोन महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला तरी भात विक्रीचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये महामंडळाविरुद्ध प्रचंड संताप आहे. महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळाकडून तालुक्यात भातखरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत.यात गो-हे, पोशेरी,कोनसई,परळी, सारशी,खैरे- आंबिवली, मानिवली,गुहिर या आठ केंद्रांचा समावेश आहे.यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी ई-पिक पाणी केली आहे.अशा शेतकऱ्यांचे भात खरेदी-विक्री केंद्रावर घेण्यात आले आहे.ज्यांच्या नोंदी झालेल्या नाहीत,त्यांचे भात घेतले नाही. शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पूर्तता केंद्रचालकांनी केली, शिवाय भात विक्री होऊन दोन महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला आहे…
वसंत भोईर,वाडा कोकण कन्येच्या पुस्तकाचा दिल्ली दरबारी गौरव, महानहस्ती भागोजीशेठ कीर यांच्या चरित्रावर लिहीलेले नवलेखिका श्रध्दा पाटील यांच्या पुस्तकाचे प्रकाशन दिल्ली येथील अ.भा.मराठी संमेलनात खा. सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. भागोजीशेठ कीर स्मृती समितीच्या विद्यमाने महाशिवरात्रीदिनी शोभायात्रा व अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.२६ फेब्रु. रोजी होणा-या या अभिवादन सोहळ्यानिमित्त भागोजीशेठ कीर यांच्या चरित्र लेखनातून त्यांच्या सामाजिक व धार्मिक कार्याची सर्वच वाचकांना ओळख व्हावी,या दृष्टीकोनातून हे पुस्तक लिहीण्याचा प्रयत्न केल्याचे श्रध्दा पाटील यांनी सांगितले.या कार्यक्रमांस साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
दीपक मोहिते, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला,पण मराठी शाळा हद्दपार का होत आहेत ? पुढील आठवड्यात २७ फेब्रु.रोजी मराठी भाषा दिन साजरा होणार आहे.तसेच दिल्ली येथे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सध्या मराठी भाषेचा गजर करण्यात येत आहे.अशावेळी मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यातील अनेक मराठी शाळानी गेल्या दोन वर्षात माना टाकल्या आहेत,तर अनेक शाळा व्हेन्टीलेटर असून अखेरच्या घटका मोजत आहेत.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा,यासाठी गेली अनेक वर्षे कंठशोष करणारे पुरस्कर्ते या ज्वलंत विषयावर मात्र चकार शब्द काढायला तयार नाहीत. मराठी भाषेचे संवर्धन होण्यासाठी सरकार आणि साहित्य क्षेत्रातील अनेक जण प्रयत्नशील आहेत.सदर बाब नक्कीच कौतुकास्पद अशीच आहे.राज्य…
संजय लांडगे,वाडा बनावट नोटांची अदलाबदल करणाऱ्या टोळीला वाडा पोलीसांनी केली अटक, वाडा पोलीस ठाण्याचे पोलीसांना पाली फाटा येथे खऱ्या व खोट्या नोटांची आदलाबद्दल होणार असून यात मोठ्या प्रमाणात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर दुपारच्या सुमारास सापळा रचून पोलिसांनी तीन आरोपी, एक वाहन व बनावट नोटा जप्त केल्या. पोलीस व पंच,वेष बदलून पाली नाका येथे दबा धरुन बसले.जिल्हा परिषद शाळा पालीच्या मेन गेट जवळ एक इसम अंदाजे ३० ते ३५ वर्ष वयोगटाचा लाल रंगाचा टि-शर्ट व चॉकलेटी रंगाची जिन्स घालेली हातात काळ्या रंगाची प्रवासी बॅग घेवुन संशयास्पद हालचाली करतांना पोलिसांना दिसला.त्याच्यावर पाळत ठेवुन पोलीस पथक दबा धरून…
संजय लांडगे,वाडा महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर बारा ज्योतिर्लिंगाचे अनोखे प्रदर्शन, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय महाविद्यालयाच्या वाडा शाखेतर्फे आयोजित कार्यक्रमात देशातील बारा ज्योतिर्लिंगाचे प्रदर्शन आज पाहायला मिळाले आणि सोबत येथील संचालिका काश्मीरा दीदी यांनी बारा ज्योतिर्लिंगाची विस्तृत माहिती देऊन जणू बारा जोतिर्लिंगाचे प्रत्यक्ष दर्शन घडवले.प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय महाविद्यालय हे धार्मिक कार्य खूप चांगल्या पद्धतीने करत असल्याचे मत खा.डॉ.हेमंत सवरा यांनी व्यक्त केले.ते वाडा येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय महाविद्यालयाच्या वाडा शाखेतर्फे आयोजित बारा ज्योतिर्लिंगाच्या प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. महाशिवरात्रीपूर्वी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या वाडा शाखेतर्फे महाशिवरात्रीपूर्वी आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात शाखा संचालक काश्मीरा दीदी यांनी पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमाचा उद्देश सांगितला.भक्तांना…
जव्हार प्रतिनिधी युवकांनो संकटातून बाहेर कसे पडावे,याची प्रेरणा छत्रपती शिवरायांकडुन घ्यावी- शिवव्याख्याते नितिन आहेर, संकटातून कमबॅक कसे करावे,संकटातून उभारी कशी घ्यावी,हे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजाकडून शिकावे,असे प्रतिपादन शिवव्याख्याता नितीन आहेर यांनी केले. आपल्या व्याख्यानात ते पुढे म्हणाले,पुरंदरच्या तहात शिवरायांना ९० टक्के स्वराज्य मुघलांना द्यावा लागला.२३ वर्षात शिवरायांनी ३५ किल्ले जिंकले होते आणि पाच लक्ष होन वसुलीचा प्रदेश स्वराज्यात जिंकला होता. त्यापैकी २३ किल्ले व चार लक्ष होन वसुलीचा प्रदेश मुघलांना द्यावा लागला होता. त्यामुळे शिवरायांकडे फक्त १२ किल्ले व एक लक्ष होन वसुलीचा प्रदेश शिल्लक होता.परंतु या भयंकर संकटाला न डगमगता संयम,शिस्त, आत्मविश्वास,जिद्द,चिकाटी, अविश्रांत मेहनत याच्या जोरावर १६८०…
जव्हार, प्रतिनिधी, तालुकास्तरीय कब बुलबुल मेळाव्यात झाप शाळेचे उज्ज्वल यश, पंचायत समिती,जव्हार, जिल्हा परिषद पालघर प्राथमिक शिक्षण विभाग आणि पालघर भारत स्काऊट आणि गाईड यांच्या संयुक्त विद्यमाने युनिव्हर्सल स्कूल, जव्हार येथे काल तालुकास्तरीय कब बुलबुल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.दिवसभर झालेल्या या कार्यक्रमात विविध स्पर्धा व उपक्रम पार पडले. या स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद शाळा, झाप येथील विद्यार्थिनींनी ( बुलबुल मुलींनी ) आपल्या उत्कृष्ट कामगिरीने यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.त्यांनी मिळवलेली बक्षिसे खालीलप्रमाणे – संस्कृती दर्शन – प्रथम क्रमांक, तंबू निरीक्षण – प्रथम क्रमांक, शारीरिक कसरती – द्वितीय क्रमांक, सांस्कृतिक कार्यक्रम (नृत्य) – तृतीय क्रमांक, चॅम्पियन ट्रॉफी, या…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” २१ व्या शतकातील डिजिटल भारत, केंद्र सरकार देशात लाखो कोटी रु.खर्च करून रस्त्याचे जाळे विणत आहे.तर दुसरीकडे बुलेट ट्रेन व मेट्रो रेल्वे वर ५० हजार कोटीहून अधिक उधळपट्टी सुरु आहे.मात्र ग्रामीण भागातील पायवाटाचे रस्त्यात रूपांतर करणे,या ज्वलंत विषयी सरकारच्या लेखी शून्य किमत आहे.अनेक गावातील विद्यार्थी दर पावसाळ्यात चिखल तुडवत आपली शाळा गाठत असतात.पण एकाही लोकप्रतिनिधीला त्याची लाज वाटत नाही.या सगळ्यांची मने मुर्दाड झाली आहेत,असे म्हंटल्यास ते वावगे ठरू नये. वरील चित्र हे उत्तर महाराष्ट्रातील असून अशी भयावह परिस्थिती या महसूल विभागातील असंख्य गांवात पाहायला मिळते.या प्रदेशात एकनाथ खडसे,गिरीश महाजनसारखे मुरब्बी राजकारणी जन्माला आले, पण त्यांनी…
