दीपक मोहिते,
” आदिवासी ग्रामीण जीवन,”
२८ फेब्रु.रोजी डहाणू तालुक्यात तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचे ( मातीच्या रंगाचे संमेलन ) आयोजन,
येत्या २८ फेब्रु.ते २ मार्च २०२५ दरम्यान पालघर जिल्ह्यातील गंजाड,बापूगाव व घोलवड या तीन गावात तीन दिवसीय भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे ( मातीच्या रंगाचे संमेलन )आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवात येथील कला व ऐतिहासिक वारसा याचे दर्शन घडवण्यात येणार आहे.
राज्याच्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या या महोत्सवाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्याची संस्कृती,गावांची स्थित्यंतरे,सांस्कृतिक वारसा,विविध जाती-जमातीमधील एकोपा,कला व जीवनशैली लोकासमोर आणण्याचा प्रयत्न आहे.
* बापूगाव व गंजाड येथे वारली पेंटिंग,यामध्ये स्थानिक आदिवासी कलावंत आपल्या पेंटिंग सादर करणार आहेत.
* त्यानंतर घोलवड येथे बांबू कला-कुसर, जिल्ह्यातील आदिवासी कलावंत हस्तकलेच्या वस्तू सादर करतील.
* जव्हार येथील कलाकारांनी तयार केलेले बोहाडे मुखवटे,
* आदिवासी नृत्ये,संगीत,तारपा,घोर व संबळ नृत्य,शेहनाई, धुमसा व अन्य वाद्ये,
* ग्रामीण खाद्यसंस्कृती ताजे मासे व जिल्ह्यातील विविध समाजाचे खाद्यपदार्थ,
* या उपक्रमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न आहे.या संमेलनाला पालघर,मुंबई व ठाणे जिल्ह्यातून पर्यटक मोठ्या संख्येने येतील,त्यासाठी पर्यटन विकास महामंडळातर्फे जोरदार तयारी करण्यात येत आ
हे.

