वसंत भोईर,वाडा
कोकण कन्येच्या पुस्तकाचा दिल्ली दरबारी गौरव,
महानहस्ती भागोजीशेठ कीर यांच्या चरित्रावर लिहीलेले नवलेखिका श्रध्दा पाटील यांच्या पुस्तकाचे प्रकाशन दिल्ली येथील अ.भा.मराठी संमेलनात खा. सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
भागोजीशेठ कीर स्मृती समितीच्या विद्यमाने महाशिवरात्रीदिनी शोभायात्रा व अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.२६ फेब्रु. रोजी होणा-या या अभिवादन सोहळ्यानिमित्त भागोजीशेठ कीर यांच्या चरित्र लेखनातून त्यांच्या सामाजिक व धार्मिक कार्याची सर्वच वाचकांना ओळख व्हावी,या दृष्टीकोनातून हे पुस्तक लिहीण्याचा प्रयत्न केल्याचे श्रध्दा पाटील यांनी सांगितले.या कार्यक्रमांस साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

