जव्हार, प्रतिनिधी,
तालुकास्तरीय कब बुलबुल मेळाव्यात झाप शाळेचे उज्ज्वल यश,
पंचायत समिती,जव्हार, जिल्हा परिषद पालघर प्राथमिक शिक्षण विभाग आणि पालघर भारत स्काऊट आणि गाईड यांच्या संयुक्त विद्यमाने युनिव्हर्सल स्कूल, जव्हार येथे काल तालुकास्तरीय कब बुलबुल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.दिवसभर झालेल्या या कार्यक्रमात विविध स्पर्धा व उपक्रम पार पडले.
या स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद शाळा, झाप येथील विद्यार्थिनींनी ( बुलबुल मुलींनी ) आपल्या उत्कृष्ट कामगिरीने यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.त्यांनी मिळवलेली बक्षिसे खालीलप्रमाणे –
संस्कृती दर्शन – प्रथम क्रमांक,
तंबू निरीक्षण – प्रथम क्रमांक,
शारीरिक कसरती – द्वितीय क्रमांक,
सांस्कृतिक कार्यक्रम (नृत्य) – तृतीय क्रमांक,
चॅम्पियन ट्रॉफी,
या शानदार कामगिरीबद्दल सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनीचे तालुक्यात सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
या यशात गावकऱ्यांचे आणि शालेय व्यवस्थापन समितीचे मोलाचे सहकार्य लाभले. शाळेच्या यशाला हातभार लावणाऱ्या सर्व शिक्षकवृंदांचे, मार्गदर्शकांचे व पालकांचे मनःपूर्वक आभार मानण्यात येत आहेत.

