संजय लांडगे,वाडा
बनावट नोटांची अदलाबदल करणाऱ्या टोळीला वाडा पोलीसांनी केली अटक,
वाडा पोलीस ठाण्याचे पोलीसांना पाली फाटा येथे खऱ्या व खोट्या नोटांची आदलाबद्दल होणार असून यात मोठ्या प्रमाणात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर दुपारच्या सुमारास सापळा रचून पोलिसांनी तीन आरोपी, एक वाहन व बनावट नोटा जप्त केल्या.
पोलीस व पंच,वेष बदलून पाली नाका येथे दबा धरुन बसले.जिल्हा परिषद शाळा पालीच्या मेन गेट जवळ एक इसम अंदाजे ३० ते ३५ वर्ष वयोगटाचा लाल रंगाचा टि-शर्ट व चॉकलेटी रंगाची जिन्स घालेली हातात काळ्या रंगाची
प्रवासी बॅग घेवुन संशयास्पद हालचाली करतांना पोलिसांना दिसला.त्याच्यावर पाळत ठेवुन पोलीस पथक दबा धरून बसलेले असतांना दुपारी ३.४५ च्या सुमारांस विक्रमगड बाजुकडुन आलेली सिल्वर रंगाची इरटीगा कार क्रमांक एम.एच.०४ जे.एम.३१३५ ही जि.प.शाळा पालीच्या गेट जवळ येवुन थांबली.त्या कारमधुन दोन इसम खाली उतरले व लाल रंगाचा टि-शर्ट व चॉकलेटी रंगाची जिन्स घातलेली व हातात काळया रंगाची लगेज बॅग असलेल्या इसमाकडे चालत गेले.तीनही इसम एकमेकांशी चर्चा करत असतांना पोलीस पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर इसमांवर झडप घालुन त्यांना ताब्यात घेतले.त्यांची झडती घेतली असता. त्यांच्याकडे १०० रुपये दराच्या नोटांचे ४ बंडले,एका बंडलमध्ये १७ बंडल असे तर ५०० रुपये दराच्या नोटांचे १ बंडल त्या बंडलमध्ये ५०० रुपये दराच्या नोटांचे १६ बंडले असे प्लास्टीकच्या पारदर्शक आवरणाने व रबर बँडच्या सहायाने पॅक केलेल्या सापडल्या.तसेच नोटांच्या आकाराचे काळया रंगाचे पुट्ठयांचे दोन बंडल,पारदर्शक प्लास्टीकच्या पिशव्यांचे दोन बंडल व नोटांचे बंडल तयार करण्यासाठी वापरात असलेल्या पारदर्शक चिकट पट्टया,असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तर गाडीमधुन आलेल्या दोन इसमांकडे ५०० रु.च्या नोटांचे २ बंडल भारतीय चलानातील खऱ्या नोटा,असे एक लाख रु. मिळून सापडले.लाल टि-शर्ट व जिन्स पँन्ट घातलेल्या इसमाच्या ताब्यात असलेल्या नोटांमध्ये ५०० व १०० रु. च्या नोटांच्या बंडलमधील वर असलेल्या व शेवटी असलेली नोटा या खऱ्या नोटा असुन त्यांच्या खाली असलेल्या नोटा ya ” भारतीय बच्चो का बैंक, ” अशा लिहीलेल्या भारतीय चलनातील खऱ्या नोटांप्रमाणेच दिसणाऱ्या नकली नोटा अशा १४ लाख रु.किमतीच्या नकली नोटा सापडल्या.ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांकडे विचारपुस केली असता सदरच्या नोटा या अदला बदल करण्यासाठी वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले. ताब्यात घेतलल्या इसमांची नावे विकास उर्फ विकी प्रकाश पवार, ( वय ३२ ) रा. शिरिषपाडा, ता. वाडा, इम्तीयाज बशीर शेख ( वय ५६ ) रा.कासा बुद्रुक ता.विक्रमगड,वसीम अन्वर सय्यद, ( वय-३६ ) रा. कऱ्हे तलावली,ता. विक्रमगड अशी असुन त्याबाबत वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असुन अधिक तपास सुरु आहे.

सदरची कारवाई दत्तात्रय किंद्रे,पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक सागर मालकर,मयुरेश अंबाजी,मयुर शेवाळे,पोलीस हवालदार गुरुनाथ गोतारणे,विजय मढवी, पोलीस नायक मनोज चौधरी,पोलीस शिपाई गजानन जाधव,भुषण खिल्लारे आणि संतोष वाकचौरे यांनी केली आहे.

