दीपक मोहिते,
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला,पण मराठी शाळा हद्दपार का होत आहेत ?
पुढील आठवड्यात २७ फेब्रु.रोजी मराठी भाषा दिन साजरा होणार आहे.तसेच दिल्ली येथे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सध्या मराठी भाषेचा गजर करण्यात येत आहे.अशावेळी मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यातील अनेक मराठी शाळानी गेल्या दोन वर्षात माना टाकल्या आहेत,तर अनेक शाळा व्हेन्टीलेटर असून अखेरच्या घटका मोजत आहेत.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा,यासाठी गेली अनेक वर्षे कंठशोष करणारे पुरस्कर्ते या ज्वलंत विषयावर मात्र चकार शब्द काढायला तयार नाहीत.
मराठी भाषेचे संवर्धन होण्यासाठी सरकार आणि साहित्य क्षेत्रातील अनेक जण प्रयत्नशील आहेत.सदर बाब नक्कीच कौतुकास्पद अशीच आहे.राज्य सरकारने तर सर्व शासकीय आणि निम-शासकीय कार्यालयात मराठी भाषा अनिवार्य केली आहे.पण या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी होत आहे,असे अनुभवायला मिळत नाही.मुंबईसह ठाणे, पालघर व रायगडसह उर्वरित महाराष्ट्रातील मराठी माध्यमांच्या शाळांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.मुंबई महनगरपालिकेने नुकतेच ” युनिफाइड डिस्ट्रिक्ट इनफॉर्मेशन सिस्टिम फॉर एज्युकेशन ( यूडीआयएसई )” कडे शाळांची माहिती संकलित करून दिली.या आकडेवारीतून मागच्या दशकात मराठी माध्यमांच्या शाळांची अवस्था अत्यंत बिकट झाल्याचे दिसून आले आहे.
२०१४-१५ या शैक्षणिक वर्षात मुंबई महानगरपालिका मराठी माध्यमाच्या ३६८ शाळा चालवत होती.आता २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात शाळांची संख्या २६२ वर आली.१० वर्षांत १०० शाळा बंद पडल्या.ग्रामीण भागात मराठी शाळा बंद पडण्याचे प्रमाण मुंबईहून अधिक आहे.एका बाजूला मराठी भाषेचे संवर्धन होण्यासाठी सरकार आणि साहित्य वर्तुळात प्रयत्न होत आहेत. नुकतेच राज्य सरकारने सर्व शासकीय आणि निम-शासकीय कार्यालयात मराठी भाषा अनिवार्य केली. तसेच दिल्ली येथे होत असेलल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषेचा गजर सुरु आहे.मात्र दुसऱ्या बाजूला मराठी माध्यमांच्या शाळांची संख्या मात्र रोडावत चालली आहे.गेल्या दशकभरातील मराठी माध्यमांच्या शाळांची पार दुर्दशा झाल्याचे दिसून आले आहे.
२०१४-१५ या शैक्षणिक वर्षात मुंबई महानगरपालिका मराठी माध्यमाच्या ३६८ शाळा चालवत होती. आता २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात शाळांची संख्या २६२ वर आली.गेल्या १० वर्षांत १०० शाळा बंद झाल्या आहेत.मराठी शाळांचा टक्का घसरत असल्यामुळे शिक्षक वर्ग आणि मराठी भाषेसाठी आग्रही असणाऱ्या सामाजिक धुरीणांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.२७ फेब्रु.रोजी मराठी भाषा दिन साजरा केला जाणार असताना अनेकांना मुंबईत मराठी भाषेचा ऱ्हास होत असल्याची भिती वाटते.
काही शिक्षकांच्या मतानुसार, मराठी माध्यमाच्या शाळा टिकवून ठेवण्यासाठी सरकारने दमदार पावले टाकण्याची आवश्यकता आहे.सरकारच्या धोरणावर इतर शिक्षकही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
गेल्या वर्षी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर राज्य सरकारने व्यापक मराठी भाषा धोरणाला मान्यता दिली, त्याचाच हा भाग असल्याचे सांगितले जाते.मराठी शाळांचा टक्का घसरत असल्यामुळे शिक्षक वर्ग आणि मराठी भाषेसाठी आग्रह धरणारे लोक अचंबित झाले आहेत.येत्या २७ फेब्रु.रोजी मराठी भाषा दिन साजरा करण्यात येणार आहे.अशावेळी मायबोली मराठी भाषा हद्दपार होणार तर नाही ना,अशाप्रकारची भिती निर्माण झाली आहे.
काही शिक्षकांच्या मतानुसार,मराठी माध्यमाच्या शाळा टिकवून ठेवण्यासाठी सरकारने कठोर निर्णय घेण्याची गरज आहे.

