संजय लांडगे,वाडा
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर बारा ज्योतिर्लिंगाचे अनोखे प्रदर्शन,
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय महाविद्यालयाच्या वाडा शाखेतर्फे आयोजित कार्यक्रमात देशातील बारा ज्योतिर्लिंगाचे प्रदर्शन आज पाहायला मिळाले आणि सोबत येथील संचालिका काश्मीरा दीदी यांनी बारा ज्योतिर्लिंगाची विस्तृत माहिती देऊन जणू बारा जोतिर्लिंगाचे प्रत्यक्ष दर्शन घडवले.प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय महाविद्यालय हे धार्मिक कार्य खूप चांगल्या पद्धतीने करत असल्याचे मत खा.डॉ.हेमंत सवरा यांनी व्यक्त केले.ते वाडा येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय महाविद्यालयाच्या वाडा शाखेतर्फे आयोजित बारा ज्योतिर्लिंगाच्या प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
महाशिवरात्रीपूर्वी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या वाडा शाखेतर्फे महाशिवरात्रीपूर्वी आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात शाखा संचालक काश्मीरा दीदी यांनी पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमाचा उद्देश सांगितला.भक्तांना शिवाच्या अध्यात्मिक रहस्याची जाणीव करून देणे आणि त्यांच्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देणे,हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अरुण ठाकरे,नरेश आकारे, वाडा एसटी आगाराचे प्रभारी व्यवस्थापक भूषण बेंद्रे, पोलीस उपनिरीक्षक प्रियंका मांढरे व राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) चे तालुका अध्यक्ष जयेश शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वर्षा दीदी,किरण दीदी यांनी विशेष परिश्रम घेतले.

