Author: दीपक मोहिते

संजय नेवे,विक्रमगड विक्रमगड येथे जनसभेचे आयोजन, शेतकरी व कष्टकरी संघर्ष समिती तर्फे आपल्या विविध मागण्यासाठी विक्रमगड येथे जनसभेचे आयोजन करण्यात आले होते. विक्रमगड येथील आमराई गार्डन येथे संपन्न झालेल्या या जनसभेस कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील,गोदुताई परुळेकर मंचचे कॉ.राजू परांजपे,आदिवासी भूमी सेना एकता परिषदेचे परशुराम चावरे,दत्ता सांबरे,आदिवासी संयुक्त हक्क संरक्षण समिती पालघर जिल्हा समितीचे सचिव राहुल धूम,भालचंद्र मोरघा,यादव गभाले,कुणबी सेनेचे अविनाश पाटील,रणधीर पाटील,शूल झलकारी कातकरी संघटनेचे रमेश सावरा,शेतकरी कष्टकरी संघर्ष समितीचे दिनेश घाटाळ व संघर्ष समितीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पुढील मागण्याबाबत विचारविनिमय करून पाठपुरावा करण्याचे ठरवण्यात आले. सिन्नर,घोटी,जव्हार,मोखाडा, विक्रमगड,मनोर व पालघर रस्त्याच्या भूसंपादनाआधी बेकायदेशीर सुरू केलेले काम त्वरित…

Read More

शुभम सावंत,विरार वसई-विरारमध्ये यशवंत वेलनेस सेंटरचे उदघाटन, वसई-विरार महानगरपालिकेचे माजी महापौर राजीव पाटील यांच्या हस्ते यशवंत वेलनेस सेंटरचे उद्घाटन आज उदघाट्न करण्यात आले. नागरी परिसरात हे १५० खाटांचे अत्याधुनिक केंद्र असून,येथे व्यसनमुक्ती, पुनर्वसन आणि डिमेंशिया केअर यांसाठी विशेष सेवा देण्यात येणार आहेत. हे केंद्र डॉ.सुरेश पाटील ( कन्सल्टंट सायकेट्रिस्ट ), संतोष प्रभू आणि हर्ष मिश्रा यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आले आहे. व्यसनमुक्ती आणि मानसिक आरोग्य पुनर्वसन यावर भर देत, दीर्घकालीन मानसोपचार सेवा देण्याचे या केंद्राचे उद्दिष्ट आहे. उद्घाटन सोहळ्याला स्थानिक नागरिक, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ आणि मान्यवर उपस्थित होते.राजीव पाटील यांनी यशवंत वेलनेस सेंटरच्या संकल्पनेचे कौतुक केले, “मानसिक आरोग्य आणि व्यसनमुक्तीसाठी…

Read More

वसंत भोईर,वाडा वाडा तालुक्यात ईद उत्साहात साजरी वाडा तालुक्यात सामुहिक नमाज पठण व विविध धार्मिक कार्यक्रमाने रमजान ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तालुक्यातील मुस्लिम बहुल लोकवस्ती असलेल्या वाडा शहर,कुडूस,नारे,वडवली व खानिवली या गावात आज उत्साहाचे व आनंदाचे वातावरण होते.हिंदू बांधवांनी आज मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.अनेक मुस्लिम बांधवांकडे आज शिरखुर्मा कार्यक्रमास सर्व धमिॅयांनी उत्साहाने हजेरी लावली.सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भोईर यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.तालुक्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Read More

वसंत भोईर,वाडा वाडा – गारगाव येथे बोलणारा कावळा, तालुक्यातील गारगाव या गावी सरगम मुकणे या चौथीत शिकणा-या मुलाने एक कावळा पाळला असून तो कावळा काका,बाबा,आई,ताई अशी हाक मारत असल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हे आश्चर्य पाहण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. तालुक्यातील गारगाव हे अतिदुर्गम व जंगल परिसरातील गाव आहे.येथील सरगम मंगळू मुकणे या चौथीत शिकणा-या विद्यार्थांने एक कावळा पाळला असून हा कावळा मुलगा करेल तसे हावभाव करतो.तसेच काका आई,बाबा,ताई असे शब्द स्पष्ट बोलतो.जंगलाला लागून एका फार्म हाऊमध्ये सरगम याचे कुटुंब राहत असून त्यांच्याच सोबत हा कावळा राहत आहे. दोन वर्षांपूर्वी सरगमला कावळ्याची दोन पिल्ले एका झाडाखाली सापडली होती.…

Read More

दीपक मोहिते, प्रचंड उकाड्यामुळे जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्याकडे पर्यटकांची पाठ, वाढत्या उकाड्यामुळे पर्यटकांनी यंदा जिल्ह्याच्या पर्यटनस्थळाकडे पाठ फिरवली आहे.त्यामुळे समुद्रकिनारी असलेले रिसॉर्टस व त्यावर अवलंबून असलेले अनेक व्यवसाय धायकुतीला आले आहेत.जिल्ह्यात रिसॉर्टस व रिक्षाव्यवसायात स्थानिक भूमिपुत्र बऱ्यापैकी अर्थाजन करत असतात.पण यंदा पर्यटकांची संख्या रोडावल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. मुलांच्या परीक्षा आटोपल्या की पालघर,मुंबई व ठाणे जिल्ह्यातील पर्यटक आपल्या मुलाबाळांसह एक किंवा दोन दिवसीय पिकनिकची मौजमजा लुटण्यासाठी जिल्ह्याच्या समुद्रकिनारी येत असतात.अर्नाळा,कळंब, राजोडी,नवापूर,केळवे,चिंचणी,डहाणू व बोर्डी हे समुद्रकिनारे पर्यटकांसाठी खास आकर्षणे आहेत.या समुद्रकिनारी असलेले रिसॉर्टस हे खिश्याला परवडणारे असल्यामुळे एप्रिल,मे व जून महिन्यात येथील रिसॉर्टस हाऊसफुल्ल होत असतात.या तीन महिन्यात रिसॉर्टस व्यवसायिक कोट्यवधी रु.ची उलाढाल…

Read More

अनिल देशपांडे,वसई, तुंगारेश्वर अभयारण्यात लागणाऱ्या आगीची चौकशी करून कारवाई करा, वसई तालुक्याच्या पूर्वेस तुंगारेश्वर अभयारण्य हे निसर्गप्रेमी,जंगल भटके आणि भाविकांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे.२४ ऑक्टो.२००३ रोजी या ८५ हजार ७०० चौरस कि.मी.क्षेत्राला अभयारण्याचा दर्जा मिळाला.या अभयारण्यात साग,शिसव, खैर,ऐन,आवळा,हिरडा, बेहडा यांसारख्या वनस्पती आढळतात.तसेच,येथे बिबटे, रानडुक्कर,ससे,भेकर, मकाक,लंगूर यांसारखे प्राणी आणि १५० हून अधिक प्रकारचे पक्षी आढळतात. परंतु,अलिकडच्या काळात या अभयारण्यात तसेच वसईतील महामार्गालगतच्या जंगलात वारंवार आगी लागण्याचे व लावण्याचे प्रकार घडत आहेत. या घटनांमुळे येथील पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत आहे. वनसंपदा,जैवविविधता आणि अभयारण्यात वास्तव्यास असलेल्या वन्य प्राण्यांच्या जीवनाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. तरी,या आगीमागील कारणांचा शोध घेऊन दोषींवर कठोर कायदेशीर…

Read More

शुभम सावंत,विरार विरार पूर्व मनवेलपाडा भागात गुढीपाडवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन,महिलांचाब उत्स्फूर्त प्रतिसाद, स्त्री प्रतिष्ठा अभियान तनिष्का व्यासपीठ व बहुजन विकास आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने विरार पूर्व येथे जय दुर्गा महीला मंडळ अध्यक्षा बहुजन विकास आघाडीच्या माजी नगरसेविका संगिता भेरे यांनी परिसरातील महिलांना घेऊन तनिष्का व्यासपीठ गटप्रमुख म्हणून गेली १४ वर्षे अनेक कार्यक्रम राबवत आहेत.महिलांचे हक्क आणि प्रतिष्ठा महिलाच्या हक्काचे संरक्षण,त्यांना समाजात समानतेने जगता यावे, महिलांचे विविध समस्या सोडवण्यावर आजवर झालेल्या अनेक उपक्रमात भर देण्यात आला. राज्यात अनेक ठिकाणी स्त्री प्रतिष्ठेची गुढी उभारली जाते.यंदाही तनिष्काची गुढी उभारताना अनेक संदेश देण्यात आले.स्त्री प्रतिष्ठान अभियान तनिष्का व्यासपीठ जबाबदारीसह घेते भरारी …नाव आहे…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” अजित पवार यांच्या एका वक्तव्याने महायुती सरकार अडचणीत येण्याची शक्यता…. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या एका वक्तव्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांना अक्षरशः उताणे पाडले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊ,असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला अजित पवार देखील उपस्थित होते. पण आता त्यांनी कोलांटी उडी मारत,मी आपल्या भाषणात कर्जमाफीबद्दल कधीही बोललो नाही,असे सांगत फडणवीस व शिंदे या दोघांना चांगलाच धोबीपछाड दिला आहे.अ  अजित पवार हे आपल्या स्पष्टवक्तेपणाबद्दल ओळखले जातात.पण बोलण्याच्या ओघात त्यांची जीभ आजवर घसरली. धरणात पाणी नाहीतर आम्ही मुतायचे का ?असा प्रश्न विचारणाऱ्या अजित…

Read More

दीपक मोहिते, मरगळ झटका आणि सक्रिय व्हा,अन्यथा कपाळमोक्ष ठरलेला आहे… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या असतानाही वसईच्या राजकीय आघाडीवर अद्याप स्मशान शांतता पाहायला मिळत आहे.विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे भाजप वगळता इतर सर्व राजकीय पक्षात प्रचंड मरगळ आल्याचे अनुभवायला मिळत आहे.यातून वेळीच सावरला नाहीत तर कपाळमोक्ष अटळ आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ( उबाठा ) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व बहुजन विकास आघाडी हे तिन्ही पक्ष पराभवाच्या धक्क्यातून अद्याप सावरलेले नाहीत.प्रत्येक माजी नगरसेवक व नगरसेविकांचे मनोधैर्य पार खचले आहे.या अशा बिकट परिस्थितीमध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यानी नाउमेद झालेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये जोश निर्माण करण्यासाठी पुन्हा आवेशात मैदानात उतरणे आवश्यक आहे.पण तसे घडताना दिसत नाही.१९७७ साली…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होईस्तोवर अनाहूत पाहुण्यापासून लांब राहा.. काल गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांच्या आवेशपूर्ण भाषणाने मनसे सैनिक चांगलेच चार्ज झाले आहेत.या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात आपण पुन्हा हिंदुत्वाकडे वळत असल्याचे संकेत दिले आहेत.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर डोळा ठेवून त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचा विषय आपल्या भाषणाचा प्रमुख मुद्दा बनवला होता.तो १०० % यशस्वी ठरला.त्यांच्या घणाघाती भाषणाने मनसे सैनिक अक्षरशः भारावून गेले होते. आपल्या भाषणात फडणवीस सरकारला चांगल्याच कानपिचक्या दिल्या.ते म्हणाले,” फडणवीस तुमच्या हातात चांगले राज्य आले आहे,तर चांगला कारभार करा.राज्यासमोर अनेक ज्वलंत विषय आहेत,ते लक्षात घेऊन कारभार करा.आपल्याला जंगल व…

Read More